Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ३ डिसेंबर २०१८
आज क्रूड US $ ६१.५० प्रती बॅरल ते US $ ६२.५२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८७ ते US $१= Rs ७०.२६ या दरम्यान होते. VIX १८.६९ PCR १.६९ US $ निर्देशांक ९६.९६ होते.
जेव्हा घरगुती भांडण असते ते कोणावरच परिणाम करत नाही. पण दोन देशांमधील विशेषतः ते जर USA आणि चीन सारख्या महासत्ता असल्या तर भांडणाचा परिणाम सर्व जगाच्या आर्थीक बाबींवर होत आहे. पण भांडण लवकर मिटत नाही आहे. आज G -२० च्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये चीनवर जे टॅरिफ लावण्यात येणार होते ते ९० दिवसांसाठी पुढे ढकलले गेले. चीनसुद्धा USA मधून आयात केलेल्या कार्सवरील टॅरिफ कमी करायला किंवा काढून टाकायला तयार झाला आहे. त्यामुळे मेटल क्षेत्राशी संबंशित शेअर्स तेजीत होते. हे भांडण चालू होते तेव्हा परदेशातून भारतात पैसा येत होता त्यामुळे आज भांडण संपल्यानंतर फारसा फायदा मार्केटला झाला नाही. त्याच बरोबर GDP डाटा ७.१% म्हणजे थोडासा नरमच आला. पूर्वी हा डेटा ८.२% होता. नेहेमी या तिमाहीमध्ये GDP चे आकडे चांगले असतात. म्हणून हे आकडे पाहून थोडे आश्चर्य वाटले. या वेळेला GDP डाटा कमी आल्यामुळे RBI आपल्या ५ डिसेम्बरला घोषीत होणाऱ्या वित्तीय धोरणात कोणताही बदल करेल असे वाटत नाही. फिस्कल डेफिसिट १०४% झाली पण त्याच बरोबरीने कॅपेक्सही वाढलेले आहे.
ओपेकची मीटिंग आज व्हिएन्नामध्ये सुरु झाली. पण सर्व अलाईज बरोबरची मीटिंग ६ आणि ७ डिसेम्बरला आहे. ओपेक मधून १ जानेवारी २०१९ पासून कतार बाहेर पडेल. ओपेकचे कोणतेही नियम किंवा अटी त्यानंतर कतारला लागू होणार नाहीत.
सरकारने ATF च्या किमती ११% ने कमी केल्या. याचा फायदा विमान कंपन्यांना होईल.
या वेळी ट्रॅक्टर विक्रीचे आकडे चांगले आले. प्रवासी वाहनांच्या विक्रीच्या आकड्यांमध्ये सुधारणा झाली. पण कमर्शियल व्हेईकलचे विक्रीचे आकडे खराब आले.
या वर्षी USA ६५००० H १ B व्हिसा वेगवेगळ्या कंपन्यांना इशू करेल. याआधी हे प्रमाण ८५००० व्हिसा एवढे होते. USA मधील मास्टरची डिग्री घेतलेल्या किंवा USA मधील स्नातकोत्तर पदवी असलेल्या कामगारांना प्राथमिकता दिली जाईल. H १ B व्हिसाच्या अर्जाचे इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन करावे लागेल. व्हिसासाठी अर्जाचा रिजेक्शन रेट ६५% आहे. या सर्व गोष्टींमुळे आता परदेशी कंपन्यांना H १ B व्हिसा काढणे अधिक कठीण आणि महाग झाले.
मर्कने आपला कन्झ्युमर हेल्थ बिझिनेस P & G ला ३.४ बिलियन युरोला विकला होता तो व्यवहार पूर्ण झाला
विशेष लक्षवेधी
- मॉन्टेकार्लो ही कंपनी प्रती शेअर Rs ५५० या भावाने शेअर BUY बॅक करेल. यासाठी कंपनी Rs ५५ कोटी खर्च करेल. प्रमोटर्स या शेअर BUY BACK मध्ये भाग घेणार नाहीत. BUYBACK चा रेट ४.६% असेल. BUYBACK ची सविस्तर माहिती आपल्या पुस्तकात दिलेली आहे
- टाटा ग्लोबल बिव्हरेजीस Rs ४०० कोटी खर्च करून प्रभात डेअरीला घेणार अशी बातमी होती. हा प्रस्ताव टाटा सन्सने रद्द केला.
- सन फार्माच्या इन्सायडर ट्रेडिंगकेसविषयी एका व्हिसलब्लोअरने माहिती दिल्यामुळे सेबी आता बंद झालेली ही केस पुन्हा ओपन करणार आहे.
- आता थोडेसे शंकरा बिल्डिंग प्रॉडक्टविषयी या कंपनीचा IPO २२ मार्च ते २४ मार्च २०१७ या काळात आला होता. प्राईस बँड Rs ४४० ते Rs ४६० होता. या शेअरचे लिस्टिंग Rs ५५५ ला झाले होते. आणि वर्षभरात ह्या शेअरची किंमत Rs २३६४ वर गेली होती. आता या कंपनीचे टार्गेट प्रत्येक रेटिंग एजन्सीने कमी केले आहे.कारण शेअरचा भाव आणि कंपनीचे अर्निंग यामध्ये खूप तफावत जाणवू लागली. गेल्या चार दिवसात कोणीतरी ह्या शेअरची जोरदार विक्री करत आहे असे जाणवते.
- कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, साऊथ इंडियात आलेला पाऊस, चॅनेल आणि एंटरप्राइज डिव्हिजनचे कमी झालेले मार्जिन यामुळे अर्निंग ४७% ने कमी झाले EBITDA २.४०% ने कमी झाला. ७.२% वरून ४.८% वर आला. त्यामुळे कंपनी आता बॅलन्सशीट सुधारणे आणि वाढलेल्या स्पर्धेला तोंड देणे या दृष्टीने विचार करत आहे. कमीतकमी किमतीला माल विकणार आहे , लॉयल्टी डिस्कॉउंट देणार आहे. क्रेडिटवर माल विकणे कमी करणार आहे. बेस्ट प्राईस स्टोर्स होण्यासाठी प्रयत्न करत आहे.पण नवीन स्टोर्स मात्र उघडणार नाही. पण यामुळे EPS ३८%ने कमी होईल. कंपनीचे ऑपरेशनल मार्जिन कमी होईल आणि विस्तार योजना कमी केल्यामुळे भांडवल गुंतवणूक केली जाणार नाही. म्हणून शेअर तुफान पडतो आहे. पण कंपनीचे असे म्हणणे आहे की वर्किंग कॅपिटल कमी लागेल, कॅपिटल सायकल ६६ दिवसांवरून ४४ दिवसावर येईल आणि ऑपरेशनल कॉस्ट कमी होईल. पुढील काही दिवस तरी या शेअरची किंमत दबावाखाली राहील असे वाटते.
- GSK कंझ्युमर आणि हिंदुस्थान युनीलिव्हर यांनी आपले मर्जर जाहीर केले. GSK कंझ्युमर च्या १ शेअर साठी HUL चे ४.३९ शेअर्स दिले जातील.दोन्ही कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नी याला मंजुरी दिली.हे मर्जर १ वर्षाच्या कालावधीत पूर्ण केले जाईल.
- ICICI सिक्युरिटीजने एक नवीन सुविधा ग्राहकांना देऊ केली आहे. यामधे E ATM च्या द्वारे Rs ५०,००० पर्यंत तुम्ही शेअर्स विकले असतील तर ३० मिनिटात त्या शेअर्सची रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा केली जाईल. जर तुमच्याकडे फिझिकल फॉर्म मध्ये शेअर्स असतील तर तुम्ही ५ डिसेंबर २०१८ नंतर ते ट्रान्स्फर करू शकणार नाही. ५ डिसेंबर २०१८ नंतर तुम्हाला फक्त DEMAT फॉर्ममध्ये असलेले शेअर्सच ट्रान्स्फर करता येतील. त्यामुळे तुम्ही आपल्याजवळील फिझिकल फॉर्म मधील शेअर्स लवकर DEMAT करून घ्यावे म्हणजे विकताना अडचण आणि विलंब होणार नाही.
वेध उद्याचा
या आठवड्यात RBI आपले वित्तीय धोरण ५ डिसेंबर २०१८ ला जाहीर करेल. सरकारबरोबर झालेल्या विविध मतभेदांच्या पार्श्वभूमीवर RBI आपले धोरण किती आणि कोणत्या बाबतीत लवचिक करते याबद्दल मार्केटला उत्सुकता आहे.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२४१ NSE निर्देशांक निफ्टी १०८८३ आणि बँक निफ्टी २६८५७ वर बंद झाली.
आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!
Your market support is appreciated.l would like to know nifty level last Thursday of the month one or two short term long term stocks.thanks with regards.
आपण 29 नोव्हेंबर निफ्टी असे गुगलला टाका म्हणजे तुम्हाला त्या दिवशीचा निफ्टी मिळेल. मी कोणालाही कोणते share घ्या किंवा घेऊ नका हे सांगत नाही