आजचं मार्केट – ४ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ६२.२९ प्रती बॅरल ते US $ ६२.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १ = Rs ७०.३४ ते US $१= Rs ७०.५५ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.८२ होते.

ओपेक आणि रशिया १३लाख टन क्रूडचे उत्पादन घटवणार आहेत असे समजते. त्यामुळे आज क्रूड तेजीत होते. आणि अनिश्चिततेमुळे रुपयांची घसरण चालू राहिली. त्यातल्यात्यात पेपर IT, फार्मा आणि शुगर, फर्टिलायझर या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

फर्टिलायझर मंत्रालयाने बाकी असलेली Rs ३०,००० कोटी रक्कम सरकारकडे मागितली. त्याती ल Rs ५००० कोटी या महिन्यात फर्टिलायझर कंपन्यांना मिळतील. म्हणून फर्टिलायझर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.

UP मध्ये निवडणुका आहेत त्यामुळे उसाची SAP( स्टेट ऍडमीनिस्टर्ड प्राईस) वाढवली जाईल का ? अशी शंका होती. पण तसे घडले नाही. सरकारने SAP वाढवली नाही. त्यामुळे साखर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढले.

NIIT LTD NIIT टेक मधला काही हिस्सा विकणार आहेत. म्हणून आज NIIT लिमिटेड चा शेअर वाढला.

रुपया घसरल्यामुळे आज नव्याने IT क्षेत्रामध्ये तेजी सुरु झाली.

सन फार्मा आणि शंकरा बिल्डींग प्रॉडक्ट्स हे दोंन्ही शेअर्स आज सुधारले नाहीत.

अवंती फीड्स विषयी थोडे. अवंती फीड्सची मार्केट व्हॅल्यू २०१८ मध्ये ५९% कमी झाली.२०११ मध्ये या कंपनीचे लिस्टिंग झाले होते. ही कंपनी ‘SHRIMP’ ( कोलंबी ) च्या व्यवसायात आहे. या वर्षी आतापर्यंत ‘SHRIMP’ च्या किमती कमी झाल्या आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्या. २०११-१२ मध्ये चीन थायलँड आणि व्हिएतनाम येथे ‘SHRIMP’ चे उत्पादन कमी झाले होते. हे तिन्हीही देश ‘SHRIMP’ उत्पादनात अग्रेसर आहेत. आणि त्याच वेळेला भारतात ‘SHRIMP’ चे उत्पादन वाढले होते. पण जशी जशी या तिन्हीही देशातील उत्पादनात वाढ होत गेली तसा भारतातला SHRIMP फार्मिंग चा उद्योग नुकसानदायी ठरू लागला .भारतात USA मधील रेट प्रमाणे व्यवहार चालतो. २०१८ मध्ये USA मध्ये SHRIMP च्या किमती २०% ने घटले. अवंती फीड्स SHRIMP उत्पादकांना आणि प्रक्रिया केलेले SHRIMP निर्यात करणाऱयांना खाद्य पुरवते. जवळ जवळ या खाद्यातून कंपनीला ८०% नफा मिळतो आणि उरलेला नफा SHRIMP वर प्रक्रिया करण्याच्या व्यवसायातून होतो. हे खाद्य बनवण्यासाठी SOYMEAL आणि FISHMEAL वापरले जाते. याच्याही किमती वाढल्या. याचा परिणाम कंपनीच्या अर्निंग वर झाला. त्यामुळे EBITDA ५३% कमी झाला. सामान्यतः एप्रिल २०१९ पासून SHRIMP साठी मागणी वाढेल आणि कच्च्या मालाच्या किमती कमी होतील असा अंदाज आहे.

विशेष लक्षवेधी 

LIC IDBI बँकेच्या शेअरहोल्डरसाठी Rs ६१.७३ प्रती शेअर या भावाने ओपन ऑफर आणणार आहे. या ओपन ऑफरमध्ये सरकार सहभागी होणार नाही.

अल्केम लॅब च्या ST. LOUIS युनिटला USFDAने EIR दिला. या प्लॅन्टचे १२मार्च २०१८ ते १६ मार्च २०१८ या दरम्यान इन्स्पेक्शन झाले होते.

आज मी आपल्यासाठी TCS चा चार्ट देत आहे. TCS मध्ये ‘W ‘ फॉर्मेशन झाले आहे. जर २०१५ ची पातळी पार केली तर चांगली मूव्ह येईल असे चार्ट दाखवतो .

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१३४ NSE निर्देशांक निफ्टी १०८६९ बँक निफ्टी २६७०० वर बंद झाले.

आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise  केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.