आजचं मार्केट – ५ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ६१.०२ प्रती बॅरल ते US $ ६२.०९ प्रती BARREL या दरम्यान रुपया US $१=Rs ७०.५८ ते US $१= Rs ७०.७२ या दरम्यान होते. चीनने USA मधून LNG आणि सोयाबीनची आयात पुन्हा सुरु करण्यात येईल असे सांगितले.

आज RBI चे वित्तीय धोरण अडीच वाजता येणार म्हणून मार्केट मंदीतच होते. रेट मध्ये छेडछाड करण्याची शक्यता मार्केटला वाटत नव्हती. पण RBI या वेळेला पेचात पडली. RBI ने गेल्या वेळेला जो पवित्रा घेतला होता तो पवित्रा लगेच या वेळेला बदलणे योग्य नव्हते. पण या वेळी परिस्थिती पुर्णपणे बदललीय हे मान्य करणे भाग होते. रुपयांचा विनिमय दर US $१=Rs ७५ क्रॉस करू नये या साठी RBI प्रयत्न करीत होती आणि क्रूड ट्रिपल डिजिटमध्ये येईल असे वाटले होते. पण या वेळेला क्रूड US $ ६० प्रती बॅरल एवढे खाली आले आणि रुपयाही US $१= Rs ७० च्या जवळपास राहिला.

RBI ने त्यांच्या पवित्र्यामध्ये बदल केला नाही पण महागाईविषयीचा अंदाज ३.९% ते ४.५% वरून २.७% ते ३.२% एवढा केला. ग्रोथविषयीचा अंदाज ७.२% ते ७.४% एवढा केला. SLR मात्र जानेवारी २०१९ पासून प्रत्येक तिमाहीला ०.२५% एवढा कमी होईल असे सांगितले. सध्या SLR १९.५% आहे. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR यामध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट ६.५०% , रिव्हर्स रेपो रेट ६.२५% आणि CRR ४% बँक रेट ६.७५% कायम ठेवले. RBI च्या MPC ची पुढील मीटिंग ५ फेब्रुवारी २०१९ ते ७ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान होईल. MSME फायनान्ससाठी वेगळी समिती नेमली जाईल असे सांगितले आणि RBI गरज पडल्यास NBFC साठी ‘लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट’ म्हणून काम करेल असे सांगितले

आज सरकारने अनकोटेड कॉपीयर पेपरवर ३ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी बसवली ही ड्युटी ए ४, ए ३ आणि लीगल कामासाठी वापरल्या जाणार्या पेपरवर लावली जाईल. सुरुवातीला थोडा वेळ पेपर क्षेत्रातील शेअर्स वाढले पण ही तेजी टिकली नाही. असे का झाले ? याचा शोध घेतला असता पुढील गोष्टी समजल्या. दीड वर्षांपूर्वी ही अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याची मागणी पेपर उद्योगाने केली होती. ही ड्युटी बसवण्याची जी प्रक्रिया आहे ती खूपच स्लो आहे असे पेपर उद्योगाचे म्हणणे ! वेळेवर घेतलेल्या निर्णयाचा जेवढा फायदा होतो तेवढ्या उशीरा घेतलेल्या निर्णयाचा फायदा होत नाही कारण परिस्थिती बदलते. सिंगापूर थायलंड इंडोनेशिया येथून पेपर डम्प ( आयात) होतात. सरकारने US $ ८५५ प्रती टनपेक्षा कमी किमतीला आयात झाली तर डम्पिंग ड्युटी द्यावी लागेल असे सांगितले.

केसोराम इंडस्ट्रीज त्यांचा टायर बिझिनेस स्पिन ऑफ करणार आहेत बिर्ला टायर या नावाने कंपनी काढली जाईल.
ONGC ला PDVSA या व्हेनिझुएलातील कंपनीने US $ ३.२ कोटींचे पेमेंट केले.

सुप्रीम कोर्टाने CCI ( कॉम्पिटिशन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने वोडाफोन विरुद्ध दाखल केलेली याचिका रद्दबातल केली.
१० डिसेंबर २०१८ पासून भूषण स्टील या कंपनीचे नाव टाटा स्टील BSL असे असेल.

२७ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्रा रेग्युलेटरने हिंदाल्कोला धनगरवाडी खाणीचे काम बंद करायला सांगितले होते. मुंबई हाय कोर्टाने हिंदाल्कोला या खाणीचे काम सुरु ठेवायला परवानगी दिली.

USFDA ने ल्युपिनच्या मंडीदीप येथील युनिट्सच्या २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१८ या दरम्यान केलेल्या तपासणीत युनिट नंबर १ मध्ये १० त्रुटी तर युनिट २ मध्ये ४ त्रुटी दाखवल्या.

मारुतीचे उत्पादन आणि फोर्स मोटर्सची विक्री नोव्हेंबर महिन्यात कमी झाली.

मारुती जानेवारी २०१९ पासून कार्सच्या किमती वाढवणार आहे. कमोडिटीच्या किमती वाढत असल्यामुळे हा निर्णय घेतला असे कंपनीने सांगितले.

विशेष लक्षवेधी

  • SKF इंडियाची २१ डिसेंबर २०१८ ही BUY बॅकसाठी रेकॉर्ड डेट आहे.
  • REC चा निकाल चांगला आला. सरकारने आपला PFC मधील स्टेक REC ला विकण्याचा निर्णय बदलून आता PFC ही कंपनी REC मधील सरकारचा ५८% स्टेक Rs १४००० कोटींना विकत घेईल अशी घोषणा केली.
  • RBI चे वित्तीय धोरण आले

वेध उद्याचा 

  • आता मार्केट ५ राज्यातील निवडणुकांच्या १२ डिसेंबर २०१८ रोजी जाहीर होणाऱ्या निकालांकडे आणि ११ डिसेंबर २०१८ रोजी ब्रिटिश संसदेमध्ये ब्रेक्झिट वर होणाऱ्या मतदानाकडे लक्ष ठेवून आहे.
  • उद्या निफ्टी बँकेची साप्ताहिक एक्स्पायरी आहे.
  • उद्या ओपेक देशांची आणि ७ डिसेंबर २०१८ रोजी ओपेक आणि अलाइड देशांची मीटिंग आहे. याचा परिणाम क्रूड उत्पादनावर आणि क्रूडच्या किमतीवर होऊ शकतो.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८८४ NSE निर्देशांक निफ्टी १०७८२ बँक निफ्टी २६५१९ वर बंद झाले

आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise  केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.