आजचं मार्केट – ६ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ५९.७६ प्रती बॅरल ते US $ ६१.७९ प्रती बॅरल दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७९ ते US $१= Rs ७१.१५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९८ तर VIX १९.२७ होते

देशात आणि देशाबाहेर अनेक घटना एकाच वेळी घडत आहेत. RBI च्या पॉलिसीमध्ये अशी कोणतीही नकारात्मक गोष्ट नव्हती की ज्यामुळे मार्केट ५०० पाईंट पडेल. ओपेक सुद्धा ट्रम्प यांच्या दबावा खाली क्रूडचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कमी करणार नाही. म्हणजे क्रूडची किंमत आहे त्या पातळीवर राहील. पण तरीही मार्केट पडण्याचा वेग जास्त का ? हे समजत नव्हतं. त्यावेळी समजले की HUEWAI या चिनी टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीच्या CFO ला कॅनडामध्ये अटक झाली. ही CFO म्हणजे या कंपनीच्या प्रमोटरची मुलगी आहे. ही कंपनी USA ने निर्बंध घातलेल्या देशांना इक्विपमेंट पुरवत होती यात इराणचाही समावेश होता. या कंपनीने USA ने घातलेल्या निर्बंधांच्या विरोधात इक्विपमेंट पुरवली असा या कंपनीवर आरोप आहे. यामुळे चीन आणि USA यांच्यातील संपत आलेले ट्रेड वॉर पुन्हा पेटेल असे वाटले म्हणून मार्केट पडण्याचा वेग वाढला

ऍग्री एक्स्पोर्ट पॉलिसी येण्याची शक्यता आहे. या मध्ये चहा, कॉफी, तांदूळ, तंबाखू. मरीन प्रॉडक्ट्स आणि पोल्ट्री प्रॉडक्ट्स याची निर्यात वाढावी हा दृष्टिकोण समोर ठेवून हे धोरण असेल. त्यामुळे या संबंधित शेअर्सवर परिणाम होईल.

इथेनॉल चे उत्पादन आणी ब्लेंडींग वाढावे म्हणून सरकार प्रयत्न करत आहे. सरकार सॉफ्ट लोन देणार आहे. गरज असल्यास अतिरिक्त कर्जसुद्धा देईल. या कर्जावरचे व्याज सरकार भरणार आहे. याचा फायदा इंडिया ग्लायकोल आणि प्राज इंडस्ट्रीज यांना होईल.

माईंड ट्रीचे C G सिद्धार्थ यांचा कंपनीमध्ये २६% स्टेक आहे. ते हा स्टेक विकण्याच्या तयारीत आहेत. KKR हा स्टेक घेण्याच्या तयारीत आहे.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या संदर्भात इन्सायडर ट्रेडिंगची तक्रार आली होती.व्यवस्थापनाने असे काही घडले नाही असा खुलासा केला.

विशेष लक्षवेधी

  • नेस्लेने Rs ५० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.
  • मुथूट फायनान्सचा निकाल चांगला आला.
  • उद्या राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यात मतदान आहे.

आता RBI च्या वित्तीय धोरणाविषयी थोडेसे :-

सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँका आणि खाजगी बँका आतापर्यंत त्यांनी ठरवलेल्या (१) प्राईम लेंडिंग रेट (२) बेंचमार्क प्राईम लेन्डिंग रेट (३) बेस रेट (४) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडबेस्ड लेन्डिंग रेट. यापैकी एका रेटवर आपला स्प्रेड मिळवून ते आपला गृह कर्ज ऑटो कर्ज आणि

MSME कर्जावरील फ्लोटिंग व्याजाचा दर ठरवत असत. कोणता रेट ठरवायचा आणि किती स्प्रेड मिळवायचे हे स्वातंत्र्य प्रत्येक बँकेला होते. हे सर्व रेट प्रत्येक बँकेचे व्यवस्थापन ठरवत असल्यामुळे प्रत्येक बँकेचा या कर्जावरील व्याजाचा दर वेगळा असायचा.

५ डिसेंबर २०१८ च्या वित्तीय धोरणात बँकांना असलेले स्वातंत्र्य RBI ने संपुष्टात आणले.

RBI ने असे जाहीर केले की वित्तीय वर्ष २०१९ पासून बँकांनी आपले गृहकर्ज, ऑटो कर्ज आणि MSMEवरील फ्लोटिंग व्याजाचे दर खालीलपैकी कोणत्याही एका रेटशी निगडीत ठेवावेत. बँकेने त्यात आपला स्प्रेड मिळवून वरील कर्जान्वरील फ्लोटिंग व्याजाचा दर ठरवावा. कर्जाची मुदत संपेपर्यंत बँकेला आपला स्प्रेड कायम ठेवावा लागेल. याला अपवाद म्हणजे कर्जदाराच्या क्रेडिट रिस्क प्रोफाइल मध्ये झालेला बदल.

(१)RBI ने आपल्या वित्तीय धोरणात जाहीर केलेला रेपो रेट
(२) भारत सरकारच्या ९१ दिवसांच्या ट्रेजरी बिलावरील FBIL (फायनान्सियल बेंचमार्क इंडिया PVT LTD.) ने जाहीर केलेला यिल्ड रेट
(३) भारत सरकारच्या १८२ दिवसांच्या ट्रेजरी बिलांवरील FBIL ने जाहीर केलेला यिल्ड रेट.
(४) किंवा FBIL ने जाहीर केलेला इतर कोणताही बेंचमार्क मार्केट व्याजाचा रेट.

आता बँकेबाहेरील एजन्सीने ठरवलेल्या दरावर बँक आपला स्प्रेड ( मार्जिन) मिळवेल. यामुळे FBIL ने किंवा RBI ने आपले दर बदलले की बँकांचे गृह, ऑटो, आणि MSME व्याजाचे दर तेवढ्या प्रमाणात बदलतील. हे दर जुन्या तसेच नवीन कर्जाना लागू होतील.पूर्वी RBI ने केलेले रेटकट बँका आपल्या ग्राहकांना पास ऑन करत नव्हत्या आता आपोआप वरील दर बदलले की सर्व बँकांना आपापले गृह ऑटो आणि MSME कर्जावरील व्याजाचे फ्लोटिंग दर बदलावे लागतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३१२ NSE निर्देशांक निफ्टी १०६०१ बँक निफ्टी २६१९८ वर बंद झाले.

आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise  केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.