आजचं मार्केट – ७ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ५९.३० प्रती बॅरल ते US $ ६०.४० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७०.४९ ते US $१= Rs ७०.७५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८४ होता.

आज मार्केटमध्ये लपंडाव चालू होता. कधी मार्केट एकदम २०० पाईंट वरती तर एकदम सगळी तेजी नाहीशी होऊन मंदी सुरु झालेली. जसा ऊन पावसाचा खेळ ! ही तेजी मंदी सुद्धा २००-२०० पाईंटची होती. शेवटी तर मार्केटने कमाल केली सगळ्यांचे अंदाज चुकले आणि मार्केटने निफ्टीने १०७०० चा टप्पाही पार केला. ४०० पाईण्टपेक्षा जास्त तेजी सेन्सेक्समध्ये आली. याला कोटक महिंद्रा बँकेचा आणि फार्मा कंपन्यांचा चांगला हातभार लागला.

वॉरेन बफेट यांची कंपनी बर्कशायर हाथवे कोटक महिंद्रा बँकेत १०% स्टेक घेणार आहे. या बातमीमुळे शेअर Rs १०० वाढला. कारण कोटक बँकेचे प्रमोटर उदय कोटक यांना त्यांचा स्टेक २०% ने कमी करायचा आहे.

HCL टेकने मात्र निराश केले. HCL टेक ही कंपनी IBM कडून ७ सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स US $१.८ बिलियनला खरेदी करणार आहे. यासाठी अर्धे कर्ज आणि अर्धी कॅश देऊन हे डील करणार आहे. E- कॉमर्स आणि ह्युमन रिसोर्सेसच्या बाबतीत ही प्रॉडक्ट्स आहेत. ५ प्रॉडक्ट्सच्या संबंधात लायसेन्सिंग पार्टनरशिप सुरु राहील असे कंपनीने सांगितले. पण मार्केटला हे डील फारसे पसंत पडले नाही कारण कर्जाचा भार कंपनीवर पडेल आणि रेव्हेन्यू मिळण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे शेअर पडला.

SJVN मधील सरकारचा स्टेक NTPC खरेदी करेल. त्यामुळे ऑपरेशनल कॉस्ट कमी होईल आणि सरकारचे डायव्हेस्टमेन्ट लक्ष्य पुरे होण्यास मदत होईल.

PFC आणि REC चे जे मर्जर होणार आहे त्यात ओपन ऑफर आणण्यापासून सूट द्यावी अशी सरकारने सेबीला विनंती केली आहे.

OPEC ने क्रूडचे उत्पादन कमी करायचा निर्णय घेतला तरी त्यातून इराण, व्हेनिझुएला, लिबिया या सदस्य देशांना सूट दिली जाईल. तसेच पंतप्रधान मोदींनी विनंती केल्याप्रमाणे ही उत्पादन कपात करताना भारताच्या हिताचे भान ठेवले जाईल असे सौदी अरेबियाने सांगितले

दिलीप बिल्डकॉन या कंपनीला महानदी कोलफिल्डस कडून Rs १००० कोटींची ऑर्डर मिळाली.

सरकार IL &FS ची जी १९ रोड प्रोजेक्ट पुरी झाली आहेत ती विकण्याचा विचार करत आहे. यामुळे Rs ३००००कोटी ते Rs ३५००० कोटी मिळतील असा अंदाज आहे.

टाटा मोटर्सची JLR विक्री युरोप आणि USA मध्ये थोड्या प्रमाणावर वाढली पण चीन मध्ये विक्री ५१% कमी झाली एकूण JLR ची विक्री ८% ने कमी झाली. म्हणून टाटा मोटर्सचा शेअर पडला.

गुजरात अल्कली ही कंपनी Rs ८२५ कोटी गुंतवणूक करून त्यांच्या दाहेज प्लांटचा विस्तार करणार आहे. यामुळे कंपनीच्या उत्पन्नात Rs ४८० कोटींची वाढ होईल.

विशेष लक्षवेधी

  • आज संध्याकाळी ५ राज्यातील निवडणुकांचे एक्झिट पोल यायला सुरुवात होईल.
  • ओपेक देशांनी त्यांची बोलणी ५ वर्षात प्रथमच अनिर्णीत अवस्थेत संपवली रशियाशी क्रूड उत्पादनात कपात करण्याविषयी सर्व संमती होऊ शकली नाही.

वेध उद्याचा

  • ११ डिसेंबर २०१८ ला ५ राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.
  • ११ डिसेंबर रोजी UK च्या संसदेत ब्रेक्झिट डील वर मतदान होईल.
  • १२ आणि १३ डिसेम्बरला येस बँक आपल्या CEO चे नाव निश्चित करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक घेणार आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७६३ NSE निर्देशांक निफ्टी १०६९४ बँक निफ्टी २५५९४ वर बंद झाले.

आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise  केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे.  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.