आजचं मार्केट – १३ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपला शेअर मार्केट चा दुसरा कोर्से १५-१६ डिसेंबर ला organise  केला आहे ..हा कोर्स फक्त ५ जणांसाठीच आहे आणि रजिस्टर करायची शेवटची तारीख  १३ डिसेंबर आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-Ke

आजचं मार्केट – १३ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ६०.४५ प्रती बॅरल ते US $ ६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७१.३२ ते US $१= Rs ७१.७१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०९ आणि VIX १५.२९ होता.

UK च्या संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांच्या विरोधात आणलेला अविश्वासाचा ठराव फेटाळून लावला गेला. चीनने ट्रेड वॉर जास्त चिघळू नये म्हणून चीनमधील मार्केट ओपन करण्यासाठी बर्याच सुधारणा केल्या.

दोन दिवस सुरु असलेली तेजी आजसुद्धा चालू राहिली. मार्केट सतत काही ट्रिगर्स शोधत असते. त्यानुसार ट्रेडर्स ट्रेडिंग चालू ठेवतात. सध्याचे ट्रेडिंग हे चालू असलेले हिवाळी अधिवेशन आणि दोन महिन्यांनी येऊ घातलेले अंदाजपत्रक या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सुरु आहे. मार्केट बराच काळ मंदीत असल्यामुळे मिडकॅप मधील शेअर्स कमी भावात उपलब्ध आहेत.

MTNL च्या कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक सेवा निवृत्ती, टॉवर भाड्याने देणे, आणि नॉनकोअर असेट्स मॉनेटाईझ संबंधीची योजना टेलिकॉम मंत्रालयाने सरकारला सुपूर्द केली.

यूको बँकेला हॉन्गकॉन्ग सरकारने वार्निंग दिली की यूको बँकेने त्यांचे लिक्विड असेट्स गहाण ठेवू नयेत.

बंधन बँकेला RBI ने ४० नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी दिली.

टाटा कम्युनिकेशनने सिंगापूरच्या ‘विवो हब’ या कंपनीबरोबर मोबाईल सेवा पुरवण्यासाठी करार कला.

सुप्रीम कोर्टाने एरिक्सन खटल्यात Rs ५५० कोटी १५ डिसेंबर पर्यंत भरण्यासाठी मुदत वाढ देण्यास नकार दिला.

बाबा रामदेवने सांगितले की पातंजलीची IPO आणण्यासाठी तयारी झाली आहे. महिन्याभरात आपल्याला चांगली बातमी मिळेल.

IDFC बँक आणि कॅपिटल फर्स्ट यांच्या मर्जरला NCLT ने परवानगी दिली.

येस बँकेने तात्पुरत्या काळासाठी एक तात्पुरता नॉनएक्झिक्युटिव्ह चेअरमनचे नाव RBI ला कळवले. कायम तत्वावर येस बँकेचा MD आणि CEO निवडण्यासासाठी येसबँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ९ जानेवारी २०१९ ला बोलावली आहे.

L &T च्या BUY BACK मध्ये SUUTI २.८९ कोटी शेअर BUY BACK मध्ये देईल यामुळे SUUTI ला Rs ७५० कोटी मिळतील.

डाबरने ने आपल्या लाल दन्त मंजन, सरसो आवळा तेल, ओडोनील आणि इतर उत्पादनांचे भाव वाढवले.

MAX इंडिया हेल्थ इन्शुअरन्स बिझिनेसमधून बाहेर पडणार आहे . या कंपनीची मॅक्स बुपामधील स्टेक नॉर्थ ला विकणार आहे.

विशेष लक्षवेधी

  • नोव्हेंबर २०१८ साठी CPI २.३३% (ऑक्टोबरमध्ये ३.३१%) आणि ऑक्टोबर २०१८ साठी IIP ८.१ ( सप्टेंबरमध्ये ४.५) होती. हे दोन्ही आकडे मार्केटला पसंत पडले असल्यामुळे तेजी बरकरार राहिली.
  • रेमंड ही कंपनी आपल्या २० एकर जमिनीवर अफोर्डेबल हौसिंग प्रोजेक्ट तयार करणार आहे. कंपनी त्यांचा ऑटो अँसिलरी बिझिनेस विकणार आहेत. शेअर होल्डरसाठी व्हॅल्यू अनलॉक होईल असे निर्णय कंपनी घेत आहे.

वेध उद्याचा

RBI चे नवीन गव्हर्नर PCA मधील बँका आणि NBFC ना लिक्विडीटी पुरवण्यासाठी उद्याच्या RBI च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंग मध्ये काय पवित्रा घेतात याकडे मार्केटचे बारकाईने लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९२९ NSE निर्देशांक निफ्टी १०७९१ तर बँक निफ्टी २६८१६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.