आजचं मार्केट – १७ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १७ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ६०.१७ प्रती बॅरल ते US $ ६०.३८ प्रती बॅरल  या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५४ ते US $१= Rs ७१.७७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.४२ होता.

आज मार्केट तेजीच्या लाटेवर सवार होते. खरे पाहता ‘फेथाई’ नावाच्या चक्री वादळाची बातमी दुपारी १२ च्या आसपास येऊन थडकली. वाऱ्याचा वेग खूप असेल मुसळधार पाऊस पडेल पिके खराब होतील. याचा परिणाम ओडिशा आंध्र प्रदेश काकीनाडा विशाखापट्टणम येथे जाणवेल. ही बातमी आल्यावर अगदी थोडे मार्केट पडले पण लगेचच सावरले. आणि ३०० पाईंटची रॅली सेन्सेक्सने दिली.

आज तेजीमध्ये असलेल्या कंपन्यात सरकारी कंपन्यांचा भरणा खूप होता. कारण कोणत्या कंपनीत BUY बॅक तर कोणत्या कंपनीत लाभांश मिळण्याची शक्यता आहे.

आज पॉवर क्षेत्रातील शेअर्सही तेजीत होते. कारण CERC (सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन) ने टॅरिफ रेट वाढवायला परवानगी दिली पण जे प्लांट्स २५ वर्षाच्या पूर्वीचे आहेत त्यावरील उत्पादनावर टॅरीफ रेट वाढवता येणार नाहीत. कारण जुन्या प्लांटमुळे प्रदूषण वाढत आहे. या प्लांटमध्ये जर प्रदूषणाचे प्रमाण कमी होते आहे असे दिसले तर टॅरिफ रेट वाढवता येतील.

USA आणि चीनमधील टॅरीफ वॉरने पुढचा टप्पा गाठला चीन मधून आयात होणाऱ्या मालावरील टॅरिफ मध्ये १०% वरून २५% पर्यंत वाढ करण्याची मुदत २ मार्चपर्यंत वाढवली. पूर्वी US $ ५० बिलियन मालावर २५% ड्युटी होतीच. ती आता US $ २०० बिलियन एवढ्या मालावर लागेल

SBI ने जेट एअरवेजचे अकौंट्स तपासण्यासाठी अर्न्स्ट आणि यंग या कंपनीची नेमणूक केली. म्हणून जेट एअरवेजचा शेअर पडला.

विशेष लक्षवेधी

  • जर तुम्ही सिक्युरिटी खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडे असलेल्या अकौन्टमध्ये पैसे ट्रांसफर केले असतील आणि त्याचा उपयोग केला नसेल तर सावधगिरी बाळगा. ब्रोकर या रकमेचा गैर वापर करू शकतो. स्टॉक ब्रोकिंगचे नियम पाळले नाहीत म्हणून सेबीने एका ब्रोकरला Rs १ लाख तर दुसऱ्या ब्रोकरला Rs ११लाख दंड केला. आणि नवीन नियम केला. ३० दिवसांनी किंवा ९० दिवसानंतर न वापरलेली रक्कम क्लायंटला परत केली पाहिजे.
  • हिंदुस्थान झिंक या कंपनीने ‘नॉर्मेट’ बरोबर ६ कोटी युरोचा सर्व्हिससाठी करार केला.
  • IL & FSची NCLAT मधील सुनावणी २० डिसेम्बरला होईल.
  • मुंबई हायकोर्टाने कोटक महिंद्रा बँकेला RBI ने प्रमोटरचा स्टेक २०% पर्यंत कमी करण्यासाठी दिलेली ३ डिसेम्बरची मुदत वाढवून द्यायला नकार दिला.
  • दोनी मलाई खाणी संदर्भात NMDC ने केलेल्या अर्जावर १० जानेवारी २०१९ ला सुनावणी होईल.
  • टाटा मोटर्स त्यांच्या JLR प्लांट मध्ये कामगार कपात करणार आहे. हा कंपनीच्या टर्न अराउंड प्लानचा एक भाग आहे.
  • NGT ने वेदांताला त्यांचा तुतिकोरिन प्लांट सुरु करायला परवानगी दिली आहे. कोर्टाने राज्य सरकारच्या या कंपनीचे काम बंद करण्याच्या ऑर्डरवर स्टे दिला आहे.
  • फोर्टिस कंपनीच्या शेअर होल्डरसाठी येणारी ओपन ऑफर ( जी उद्यापासून येणार होती) ती आता यायला वेळ लागेल.

वेध उद्याचा

  • फेथाई या वादळाचा परिणाम कोठल्या प्रदेशात आणि किती झाला यावर उद्या कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवायचे हे ठरवावे लागेल.
  • RITES या कंपनीने Rs ४.७५ प्रती शेअर्स अंतरिम लाभांश जाहीर केला. या लाभांशासाठी २८ डिसेंबर २०१८ ही ठरवली आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२७० NSE निर्देशांक निफ्टी १०८८८ बँक निफ्टी २७०१५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.