आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १८ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ५७.४१ प्रती बॅरल ते US $ ६०.३३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१= Rs ७१.८० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.९३ होता.

आज क्रूडचा भाव कमी झाला आणि रुपया वधारला आणि तीन आठवड्यातील कमाल स्तरावर पोहोचला. USA आणि रशिया या देशातील क्रूडचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर USA मध्ये शेल गॅसचे उत्पादन वाढत आहे. त्यामुळे ओपेक देशांनी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतल्यावरही क्रूडचा भाव खाली येत आहे फेडचे नरमाईचे धोरण या तीन गोष्टींमुळे सुरुवातीला मंदीत असलेले मार्केट सुधारले. बँक निफ्टीने हातभार लावला

स्टरलाईट टेक्नॉलॉजीने जेपी मॉर्गनकडेकडे तारण म्हणून ठेवलेले २० कोटी शेअर्स सोडवले म्हणून शेअर वाढला.

IL & FS ने त्यांचे रोड प्रोजेक्ट विकण्यासाठी उपलब्ध केले आणि त्यातून कर्ज फेडले जाईल असे सांगितले त्यामुळे IL&FS ग्रुपचे शेअर्स वाढले. IL&FS च्या नवीन बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने रोड ASSETS विकण्याची प्रक्रिया सुरु केली. सेबीने IL&FS च्या संदर्भात ३ रेटिंग एजन्सीजना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या. त्यामुळे या रेटिंग एजन्सीजचे म्हणजे CARE, CRISIL आणि ICRA हे शेअर पडले.

NSE च्या संबंधातील को लोकेशन केसचा तपास पुरा झाला आहे.या केसची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर NSE आपला IPO आणेल. सेबीने मंजुरी दिल्यावरही NSE ला आपला Rs ६०००० कोटींचा IPO आणायला उशीर होत आहे याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

माईंड ट्रीने BBC ( ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) बरोबर डिजिटल टेस्टिंग सर्व्हिस साठी केलेल्या कराराची मुदत २ वर्षांनी वाढवली.

नीती आयोगाने असे प्रतिपादन केले की जर इथेनॉलच्या ऐवजी मेथॅनॉलचे ब्लेंडींग असलेल्या पेट्रोलवर वाहने चालवली तर पेट्रोल Rs ८ ते Rs १० स्वस्त उपलब्ध होऊ शकेल.कारण इथेनॉलचा भाव Rs ४० प्रती लिटर तर मेथॅनॉलचा भाव Rs २० प्रती लिटर आहे पुण्यात मारुती आणि हुंडाई या कंपन्यांच्या कार्स १५% मेथॅनॉल ब्लेंडींग असलेल्या पेट्रोलवर चालवण्याचा प्रयोग चालू आहे. RCF, GNFC, आसाम CO हे मेथॅनॉलचे उत्पादन करतात. हे प्रयोग येत्या तीन महिन्यात पूर्ण होऊन त्या प्रयोगाचे निकाल येतील.

ज्योती लॅब ही कंपनी आता आयुर्वेदप्रणित फेस वॉश आणि हॅन्ड वॉश मार्केटमध्ये आणणार आहे. नीम टूथ पेस्ट आणि हेअर केअर आणि हेअर ऑइल मार्केटमध्ये आणणार आहे तसेच नव्या प्रकारची मच्छर अगरबत्ती मार्केटमध्ये आणणार आहे.

शांती गिअर्स या कंपनीची २६ डिसेम्बर २०१८ रोजी शेअर BUY बॅकवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची मीटिंग बोलावली आहे.

IOC च्या शेअर BUYBACK विषयी

IOC Rs ६.७५ अंतरिम लाभांश आणि BUY बॅक अशा दोन्ही गोष्टी देत आहे. दोन वर्षातील किमान स्तरावर IOC च्या शेअरची किंमत म्हणजे Rs १०५ ऑक्टोबर २०१८ मध्ये होती.या कंपनीचे LIC कडे ६० कोटी तर ONGC कडे १३३ कोटी आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडे २८ कोटी शेअर्स आहेत. त्यामुळे ACCEPTANCE रेशियो किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ८७ % राहण्याची शक्यता आहे. कारण एकूण २९.७७ कोटी शेअर BUY बॅक करणार आहेत आणि यातील १५% शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे हा BUY बॅक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे.

वेध उद्याचा

फेडच्या मीटिंग मध्ये काय निर्णय झाला तसेच त्यांच्या नजीकच्या भविष्याविषयी भाष्याकडे मार्केटचे लक्ष असेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३४७ NSE निर्देशांक निफ्टी १०९०८ बँक निफ्टी २७१७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.