आजचं मार्केट – २० डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला इंटरेस्ट असेल तर अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २० डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ५४.८३ प्रती बॅरल ते US $ ५६.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs६९.८५ ते US $१= Rs ७०.६६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६४ होता. VIX १४.५८ होता.पुट/कॉल रेशियो १.५६ होता.

खरे पाहता सकाळी SGX निफ्टी भारतातील मार्केट खूप पडेल असे दर्शवत होता. कारण फेडने ट्रम्पच्या दबावाला न जुमानता ०.२५ % रेट वाढवला. पूर्वीचा रेट २.२५% होता तो आता २.५०% होईल. २०१९ या वर्षात पूर्वी ठरल्याप्रमाणे तीन वेळेला रेट वाढवण्याच्या ऐवजी दोन वेळेला रेट वाढवले जातील पण रेट वाढवण्याआधी डाटा लक्षात घेतला जाईल. पण USA मध्ये रेट वाढवणे ही गोष्ट भारताच्या दृष्टीने चांगली आहे USA मधून पैसा भारतात येईल. FII ची खरेदी वाढेल. आणि या विरुद्ध भारतात मात्र रेट कटची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे मार्केट जेवढे पडेल असे वाटत होते तेवढे पडले नाही. उलटपक्षी रुपया वधारला US $१=Rs ७० च्याही खाली गेला. क्रूड १६ महिन्यांच्या किमान स्तरावर पोहोचले. सरकारी बॉण्ड्स यिल्ड ११ बेसिस पाईंट्स कमी होऊन ७.२३% ला पोहोचले. या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळे मार्केट सुधारले आणि दिवस अखेरीला मार्केटमध्ये मामुली मंदी होती.

सरकारने खर्चासाठी पूरक मागणी संसदेत केली. त्यातून Rs ४१००० कोटी बँकांना रिकॅपिटलायझेशनसाठी देण्यात येणार आहेत . PNB आणि SBI या दोन बँकांचा यात वाटा नाही. IFCI मध्ये सरकार Rs २०० कोटी टाकणार आहे. एअर इंडियाला Rs २३४५ कोटी देणार आहे मनरेगा योजनेसाठी Rs ६०४८ कोटी खर्च करणार. PFC आणि REC च्या बॉण्ड्सच्या व्याजासाठी अनुक्रमे Rs २६.४ कोटी आणि Rs ३२३ कोटी देईल. ऑइल इंडिया आणि IOC ला सबसिडीचा भार उचलावा लागला म्हणून Rs २५० कोटी देणार. ज्या बँकांनी गेल्या तिमाहीत प्रॉफिट दाखवले आहे आणि आर्थीक परिस्थितीत सुधारणा दाखवली आहे अशा ५ बँकांना PCA मधून बाहेर काढण्यात येईल. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, OBC, कॉर्पोरेशन बँक, अलाहाबाद बँक यांचा समावेश असेल असा अंदाज आहे.

DERC (दिल्ली इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन) ने नियमामध्ये काही बदल केले. जर न कळवताच दोन तास लाईट गेले तर Rs ५० आणि दोन तासापेक्षा जास्त वेळ लाईट गेले तर Rs १०० प्रती तास नुकसान भरपाई कंपनीने ग्राहकांना दिली पाहिजे. ही नुकसान भरपाईची रक्कम Rs ५००० पर्यंत वाढू शकते. ही बातमी ग्राहकांसाठी चांगली असली तरी पॉवर क्षेत्रातील कंपन्यांसाठी चांगली नाही. त्यामुळे पॉवर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पडले. याचा परिणाम रिलायन्स इन्फ्रा, टाटा पॉवर, यांच्यावर होईल.

मारुतीच्या व्यवस्थापनाने असे सांगितले की कंपनीचा सेल्स व्हॉल्युम २% ने कमी होईल. पूर्वी ९% होईल असा अंदाज होता ते आता ७% होईल. यामुळे मारुतीचा शेअर पडला.

विशेष लक्षवेधी

गुजरात गॅस या कंपनीच्या शेअर स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट १६ जानेवारी २०१९ जाहीर झाली. शेअर स्प्लिट झाल्यानंतर शेअरची दर्शनी किंमत Rs २ होईल

CONCOR या कंपनीने ४ शेअर्समागे १ बोनस शेअर जाहीर केला. तुमच्याजवळ जर CONCOR चे ४ शेअर्स असले तर १ बोनस शेअर मिळेल. ( BUY BACK, बोनस शेअर, शेअर स्प्लिट इत्यादी कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर माहिती दिलेली आहे)

ONGC ने Rs १५९ प्रती शेअर या किमतीला २५.२९ कोटी किंवा १.९७% इक्विटी शेअर्सचे BUY बॅक जाहीर केले. या BUY BACK साठी कंपनी Rs ४०२२ कोटी खर्च करेल. या BUY बॅक साठी ४ जानेवारी २०१९ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.

संसदेने ग्राहक संरक्षण बिल २०१८ मंजूर केले.

वेध उद्याचा

२१ डिसेंबर पासून निफ्टी ५० ची सात विकली ऑप्शन्स ओपन होतील या ऑप्शनची एक्स्पायरी दर गुरुवारी आणि गुरुवारी सुट्टी असली तर त्या आठवड्यात बुधवारी होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४३१ NSE निर्देशांक निफ्टी १०९५१ बँक निफ्टी २७२७५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

2 thoughts on “आजचं मार्केट – २० डिसेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.