आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०१८

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०१८

आज क्रूड US $ ५४.६४ प्रती बॅरल ते US $ ५५.१६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $ १= Rs ६९.७० ते US $ १= Rs ७०.२८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.४२ होता.

गेले सात दिवस मार्केटमध्ये सातत्याने तेजी सुरु होती. ११ डिसेम्बरला जेव्हा निवडणुकीचे निकाल हाती आले तेव्हा मार्केट (निफ्टी ) १०३३३ होते. तेथुन निफ्टीने १०९६७ पर्यंत मजल मारली. करेक्शन येणे अपेक्षीत होते. सर्वच्या सर्व बातम्या येऊन गेल्या. त्यामुळे आता तिसऱ्या तिमाहीचे निकाल सुरु होईस्तोपर्यंत मार्केटला ट्रिगर नाही. त्याच बरोबर USA चे सरकार पैशाअभावी बंद होण्याची भीती होती. जागतिक पातळीवर २०१९ मध्ये ग्रोथ कमी राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणि काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होणार याचा अंदाज होता. कारण निफ्टी ११००० च्या जवळपास आला होता.

निफ्टी ११००० चा टप्पा ओलांडणार नाही असे चिन्ह दिसताच आणि नजीकच्या भविष्यात असलेली नाताळची सुट्टी आणि लो व्हॉल्युम हे सर्व लक्षात घेऊन मार्केटने प्रॉफिट बुकिंगला प्राधान्य दिले. त्यातच क्रूड ढासळू लागल्यामुळे रुपया वधारला. आणि IT क्षेत्रातील शेअर्स पडू लागले. उद्या होणाऱ्या GST कौन्सिलच्या मीटिंग मध्ये GST चे दर २८% च्या स्लॅबवरून १८% किंवा १२% करावेत असा दबाव आहे. पण त्याचवेळी सिगारेट आणि मद्यार्क यावरील GST चे दर वाढवले जातील का अशी शंका आल्याने ITC, गॉडफ्रे फिलिप्स, VST आणि युनायटेड स्पिरिट्स, रॅडिको खेतान या कंपन्यांचे शेअर्स पडले. आणि सरतेशेवटी सेन्सेक्स ७०० बेसिस पाईंट पडला .

भारताला क्रूड नेहेमी प्रीमियम देऊन खरेदी करायला लागत असे. पूर्वी हा प्रीमियम US $ ६ होता. भारताने सांगितले की आम्ही आता प्रीमियम देऊन क्रूड खरेदी करणार नाही. आम्ही ग्राहक आहोत भरपूर प्रमाणात क्रूड खरेदी करतो या न्यायाने आम्हाला डिस्काउंट मिळायला हवा.

बँकांचा कॅपिटल/ रिस्क वेटेड ऍसेट रेशियो हा ९% असायला हवा. १८ सप्टेंबर २०१८ रोजी २१ पैकी ५ बँकांनी TIER १ कॅपिटल ७% पेक्षा कमी आहे असे सांगितले. यामुळे जोपर्यंत बँका नियमाप्रमाणे TIER १ बॉण्ड्स इशू करू शकत नाहीत तो पर्यंत त्यांना भांडवल पुरवण्याशिवाय सरकारपुढे दुसरा पर्याय नाही.

विशेष लक्षवेधी

  • HCL TECH आणि बजाज फायनान्स हे शेअर्स २४ डिसेम्बरपासून सेन्सेक्स मध्ये समाविष्ट होतील तर विप्रो आणि अडानी पोर्ट हे शेअर्स २४ डिसेंबर पासून सेन्सेक्स मध्ये असणार नाहीत. बंधन बँक गृह फायनान्स ही कंपनी आपल्यात मर्ज करण्यासाठी HDFC बरोबर बोलणी करत आहे. या मर्जरमुळे बंधन बँकेच्या प्रमोटर्सचा स्टेक २०% पेक्षा कमी होईल असे बंधन बँकेचे म्हणणे आहे.
  • कोल इंडिया या कंपनीने Rs ७.२५ प्रती शेअर्स अंतरिम लाभांश जाहीर केला. याची रेकॉर्ड डेट ३१ डिसेंबर २०१८ ही असेल. ५ जानेवारी २०१८ पासून लाभांश देण्यास सुरुवात होईल. सरकारला यातून Rs ३५०० कोटी मिळतील.
  • धनुका ऍग्रीटेक ही कंपनी प्रती शेअर Rs ५५० या भावाने १५ लाख शेअर्स BUY BACK करण्यासाठी Rs ८२.५० कोटी खर्च करेल. हा BUY बॅक १३.१२% आहे. या BUY बॅक साठी २ जानेवारी २०१९ ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.
  • HUL ने ‘लाईफ बॉय’ साबणाच्या किमतीत २१% ‘लिप्टन’ चहाच्या किमतीत १५% तर फेअर आणि लव्हली च्या किमतीत सुमारे ५% वाढ केली. यामुळे HUL च्या मार्जिनमध्ये वाढ होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७४२ NSE निर्देशांक निफ्टी १०७५४ बँक निफ्टी २६८६९ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – २१ डिसेंबर २०१८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.