Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ३१ जानेवारी २०१९
आज क्रूड US $ ६२.०७ प्रती बॅरल ते US $ ६२.२६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१= Rs ७०.९२ ते US $१=Rs ७१.१७ या दरम्यान होते. US$निर्देशांक ९५.२३ होता.
आज मार्केटमध्ये शानदार रॅली होती. ‘प्रि बजेट रॅली’ असेच म्हणावे लागेल. लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स कर, किंवा STT रद्द होईल अशी मार्केटची धारणा आहे. मार्केटला खुश करण्याचा अर्थमंत्री नक्कीच प्रयत्न करतील असे वाटल्यामुळे मार्केटमध्ये तेजी सुरु झाली. ती टिकली त्यामुळे ‘शॉर्ट कव्हरिंग’ करावे लागले आणि त्यातच आजपासून सुरु झालेले अंदाजपत्रकीय सत्र आणी F &O ची एक्स्पायरी यामुळे तेजी वाढली आणि मार्केटने (सेंसेक्सने) ६५० पाईंट मुसंडी मारली. हे अंदाजपत्रकीय सत्र १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालणार आहे.
फेडच्या FOMC च्या दोन दिवस चाललेल्या मीटिंग मध्ये रेट न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पुढचे निर्णय सारासार विचार करून घेतले जातील असे सांगितले. फेडच्या धोरणात थोडा सौम्यपणा आला असे वाटते.
‘APPLE’ च्या कामगाराची केस उघडकीस आली आहे. हा कामगार चायनीज होता आणि संवेदनाशील म्हणता येईल असे फोटो काढत होता. ही बाब चीन आणि USA मधील चर्चा गढूळ करू शकते.
व्हेनिझुएला पाठोपाठ आता लिबियाच्या क्रूड पुरवठ्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे क्रूडचा रेट वाढत आहे.इराणकडून क्रूड आयात कारण्यासाठी USA ने जो अवधी दिला होता तो वाढवून मिळावा म्हणून सरकार प्रयत्नशील आहे.
उद्या पासून TRAI चे नवीन टॅरीफ नियम लागू होतील. या नियमाविरुद्ध दाखल केलेली याचिका कोलकाता कोर्टांत रद्द झाली .
RBI च्या १२ फेब्रूवारी २०१८ च्या परिपत्रकाविरुद्ध दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी १९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत पुढे गेली. (कोणत्याही लोनच्या परतफेडीला १ दिवस जरी उशीर झाला तरी ते खाते NPA करावे अशा सूचना RBI ने बँकांना दिल्या होत्या)
M. D. रंगनाथ यांची आज HDFC बँकेचे ऍडिशनल इंडिपेन्डन्ट डायरेक्टर म्हणून नेमणूक झाली.
जेट एअरवेज मध्ये आपला ग्रुप स्टेक घेणार आहे या बातमीचा अडानी ग्रुपने इन्कार केला.
कोब्रा पोस्टने DHFL वर जे आरोप केले आहेत त्याची सरकारतर्फे चौकशी करण्यात येईल असे सरकारने जाहीर केले. त्यामुळे DHFL चा शेअर पडला.
मोहित मल्होत्रा यांची डाबरचे CEO म्हणून नियुक्ती झाली.
L &T टेक्निकल सर्व्हिसेसच्या OFS ला थंडा प्रतिसाद मिळाला.
SQS इंडियाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी आज मीटिंग आहे.
काल मार्केट संपल्यावर ICICI बँकेचे तिसर्या तिमाहीचे निकाल आले. बँकेचे निकाल चांगले आले. ICICI बँकेने तुमच्याजवळ जर १० शेअर्स असतील तर १ बोनस शेअर जाहीर केला.
इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले. कंपनीने Rs १० प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
इझ्राएल एरोस्पेस बरोबर कोची शिपयार्डने US $ ९३ मिलियनचे काँट्रॅक्ट केले.
BEL, जमना ऑटो, IFB इंडस्ट्रीज, शेमारू, LG बाळकृष्ण, सोलारा एक्टीव्ह फार्मा, सुंदरम फायनान्स( Rs ५ प्रती शेअर अंतरिम लाभांश) , पेट्रोनेट एल एन जी, पॉवर ग्रीड, कॅस्ट्रॉल, रत्नमणी मेटल, EIH, इंटरनॅशनल पेपर यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
इमामी, V गार्ड, कलाहस्ती पाईप्स यांचे निकाल असमाधानकारक होते.
देना बँकेचे निकाल घाटा, आणि NPA कमी झाल्यामूळे ठीकच म्हणावे लागतील.
अजंता फार्माचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले. कंपनीने Rs १३०० प्रती शेअऱ या भावाने शेअर BUY बॅक जाहीर केला.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२५७ NSE निर्देशांक निफ्टी १०८३१ बँक निफ्टी २७२९५ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!