आजचं मार्केट –  १ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट –  १ जानेवारी २०१९

आज २०१९ या वर्षांचा पहिला दिवस. हे वर्ष ब्लॉगच्या वाचकांना, पुस्तकाच्या वाचकांना, आणि प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्याना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे यशाचे आणि आरोग्य संपूर्ण जावो ही शुभेच्छा. आपल्याला शेअर मार्केट मधून भरपूर प्रॉफिट मिळो.

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आज क्रूड US $ ५४ प्रती बॅरल ते US $ ५४.५० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.६२ ते US $१= Rs ६९.७१ या दरम्यान होते US $ निर्देशांक ९६.०७ VIX १६.०९ होते.

२०१८ वर्षाला निरोप देऊन २०१९ ची सुरुवात सर्व ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी केली. गेल्या वर्षीप्रमाणेच २०१९ हे वर्ष दोन विभागात लक्षात घ्यावे लागेल. पहिले सहा महिने अत्यंत चढउताराचे तर पुढील सहा महिने स्थैर्याचे आणि तेजीचे असतील. ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार दोघांनाही स्वस्तात शेअर्स खरेदी करण्याची चांगली संधी मिळेल. पण इंट्राडे ट्रेड किंवा गुंतवणूक यापेक्षा शॉर्ट टर्म ट्रेड मध्ये चांगला पैसा मिळवता येईल. आणि वेळेवर प्रॉफिट बुकिंग करावे लागेल. (गेल्या वर्षी १ जानेवारी ते ५ जानेवारी या आठवड्याच्या समलोचनामध्ये २०१८ हे वर्ष कसे जाईल हे सांगितले होते. तोच प्रत्यय पूर्ण २०१८ वर्षांत आला.)

आज मार्केटमध्ये volatility नव्हती पण व्हॉल्यूमही नव्हते. विदेशी मार्केट्स नववर्षदिनानिमित्त बंद असल्यामुळे त्यांचा परिणाम भारतीय मार्केटवर होण्याची शक्यता नव्हती. फार्मामध्ये थोडीफार खरेदी दिसली. आज मार्केट दोन भागात विभागले गेले. दुपारपर्यंत अतिशय थंडपणे चाललेले मार्केट अचानक मूड बदलून तेजीत आले. बँकांचे शेअर्स वाढले. MTNL आणि HCC हेही शेअर्स तेजीत आले. आणि आज मंदी होती कुठे ? असे विचारण्याची वेळ आली.

आजपासून ओपेक ८ लाख बॅरल प्रती दिवस क्रूडचे उत्पादन घटवणार आहे त्याचवेळी सरकारने ATF च्या किमती १५% ने कमी केल्या. तर कुकिंग गॅसच्या किमती सबसिडीशिवाय मिळणाऱ्या गॅसची किंमत Rs १२० ने तर सब्सिडीसकट मिळणाऱ्या गॅस ची किंमत Rs ६.५० ने कमी केली. त्यामुळे एव्हिएशन सेक्टर आणि गॅस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते.

ऑटो क्षेत्रामध्ये बहुतेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या. त्याच वेळेला डिसेम्बरचे ऑटो विक्रीचे आकडे चांगले आले नाहीत.यामुळे विक्रीच्या आकड्यांचा खूप मोठा परिणाम शेअर्सच्या किमतीवर जाणवला नाही. उलटपक्षी दिवसाच्या शेवटी ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढले.

फ्युचर रिटेल आणि अमेझॉन यांच्या डील मध्ये अनिश्चितता निर्माण झाली. कारण अमेझॉनची प्रॉडक्ट्स फ्युचर रिटेलच्या दुकानातून विकता येणार नाहीत. असा सरकारने फतवा काढला. म्हणून फ्युचर ग्रुपचे शेअर्स पडले.

प्रधानमंत्री आवास योजनेखाली जी सबसिडी दिली जात होती त्याची मुदत २०२० पर्यंत वाढवली. त्यामुळे रिअल्टी इस्टेट क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. यामध्ये विशेषकरून प्रेस्टिज इस्टेट, कोलते पाटील, ओबेराय रिअल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज यांचा समावेश होता.

RBI ने फायनान्सियल स्टॅबिलिटी रिपोर्ट सादर केला. NPA चे प्रमाण कमी होत असून वसुली चांगली होत आहे असे सांगितले.त्यातच सरकारने यूको बँकेत Rs ३०७६ कोटी तर सेंट्रल बँकेत Rs १६७८ कोटी भांडवल घातले. यामुळे बँकिंगक्षेत्रातील शेअर्स नी U टर्न घेतला आणी मार्केट सुधारताच सरकारी बँकांचे शेअर्स वाढले. त्यात युकोबँक, कॅनरा बँक , देना बँक आनि स्टेट बँक, इंडियन बँक यांच्या शेअर्सचा समावेश होता.

ज्या कंपन्यांच्या मार्केट कॅप मध्ये बदल झाला आहे त्यांना मिडकॅप मधून लार्ज कॅपमध्ये घातले जाते. यामध्ये डिव्हीज लॅबचा समावेश होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने IMFL ( इंडियन मेड फॉरीन लिकर) वरील एकसाईझ ड्युटी २०% ने वाढवली. त्यामुळे युनायटेड स्पिरिट्स, रेडीको खेतान, ग्लोबल स्पिरिट्स हे शेअर पडले.

विशेष लक्षवेधी

आज NHPC या कंपनीचा BUY बॅक ओपन झाला. कंपनी Rs २८ प्रती शेअर या भावाने BUY BACK करणार आहे.
आज जस्ट डायल या कंपनीचा Rs ८०० प्रती शेअर या भावाने ओपन असलेला BUY बॅक शेवटची तारीख असल्यामुळे बंद झाला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२५४ NSE निर्देशांक निफ्टी १०९१० बँक निफ्टी २७३९२ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.