आजचं मार्केट – २ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  २ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५३.३९ प्रती बॅरल ते US $ ५३.५१ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ६९.४४ आणि US $१=Rs ७०.१८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.१६ होता.

आज जागतिक संकेत फारसे चांगले नव्हते. उत्तर कोरियाच्या अध्यक्षांनी USA ला आठवण करून दिली की तुम्ही तुमच्या शब्दाला जागला नाहीत. आम्ही जर डिन्यूक्लिअरायझेशन केले तर आमच्यावर लादलेले निर्बध USA रद्द करेल असे आश्वासन USA ने दिले होते. आपल्या निर्देशाप्रमाणे आम्ही वागलो तरीही निर्बंध अजून रद्द केलेले नाहीत. जर निर्बंध रद्द केले नाहीत तर आमचा मार्ग आम्हाला मोकळा असेल.

USA मध्ये अजूनही सरकारी खर्चाला मंजुरी न मिळाल्यामुळे सरकारचे ‘शट डाऊन’ सुरूच आहे. अशा तंग वातावरणामुळे परदेशी मार्केट्स मंदीत होती. पण भारतीय मार्केट मात्र सुरुवातीला चांगल्या स्थितीत होते. पण विदेशी मार्केट्समधील मंदी वाढत गेली, रुपयामध्ये घसरण सुरु झाली, ऑटो विक्रीचे आकडे अपेक्षेच्या मानाने खराब आले. यामुळे बरोबर मंगळवारच्या विरुद्ध स्थिती निर्माण झाली. सेन्सेक्स ४५० पाईंट ढासळला होता

RBI ने MSME क्षेत्रासाठी काही सवलती जाहीर केल्या. Rs २५ कोटी पर्यंत दिलेले लोन एकदाच रिस्ट्रक्चर करता येईल. ते NPA म्हणून जाहीर करण्याची गरज नाही. या साठी बँकांना ५% प्रोव्हिजन करावी लागेल. आणि सरकारलाही या NPA साठी बँकांना रिकॅपिटलाईज करण्याची गरज नाही. म्हणजे थोडक्यात ‘ATKT’ सारखी अवस्था. या निर्णयाचा फेडरल बँक साऊथ इंडियन बँक बँक ऑफ इंडिया यांना फायदा होईल.

सरकार निर्यातदारांना दिलेल्या कर्जाच्या व्याजाच्या दरात ३% सबसिडी देत आहे. ही सबसिडी वाढवण्याची शक्यता आहे. याचा फायदा KRBL, कोहिनूर फूड्स, गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट्स यांना होईल.

GST कौन्सिलची मीटिंग १० जानेवारी २०१९ रोजी होईल. यामध्ये ‘अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट’ साठी GST ५% करण्याची शक्यता आहे. यामुळे सुरुवातीला बिल्डिंग क्षेत्रातील शेअर्स वाढले होते.

सेबी VOLATILITY कमी करण्यासाठी आणि कर्ज देणे आणि घेणे यांना उत्तेजन देण्यासाठी F & O मार्केट मधील सर्व काँट्रॅक्टस फिझिकली सेटल करावेत असे धोरण ठरवण्याच्या विचारात आहे.

क्रूड पाम ऑइलवरील ड्युटी सरकारनं कमी केली याचा फायदा गोदरेज कन्झ्युमर आणि इमामी यांना होईल.
FADA ( फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोशिएशन) ही दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान ऑटो विक्रीचा डेटा देणार आहे. आजपर्यंत जे आकडे जाहीर केले जात ते आकडे फॅक्टरीमधून कार्स आणि इतर वाहने डिस्पॅच झाल्याची आकडेवारी असते. आता FADA कडून मिळणारी आकडेवारी प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतर वाहनांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतरची असेल. यामुळे इन्व्हेन्टरी आणि प्रत्यक्ष विक्री याचा अचूक अंदाज मिळेल.

आज टाटा मोटर्स, अशोक लेलँड, आयशर मोटर्स, एस्कॉर्टस, बजाज ऑटो, TVS मोटर्स यांचे विक्रीचे आकडे आले. हे आकडे मार्केटच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. आतापर्यंत डिसेम्बरमध्ये फेस्टिव्ह सीझनसाठी किमतीत सूट दिल्यामुळे आणि जानेवारीपासून किमती वाढत असल्यामुळे डिसेंबरमध्ये वाहनांची विक्री जास्त असायची. यावेळेला मात्र लोकांचा अपेक्षाभंग झाला. वाहनांची विक्री कमी झाली.

विशेष लक्षवेधी

  • बँक ऑफ बरोडा, देना बँक आणि विजया बँक यांच्या मर्जरचा स्वॅप रेशियो ठरला.Rs १० दर्शनी किमतीच्या देना बँकेच्या १००० शेअर्ससाठी बँक ऑफ बरोडाचे Rs २ किमतीचे ११० शेअर्स मिळतील. विजया बँकेच्या Rs १० दर्शनी किमतीच्या १००० शेअर्सला बँक ऑफ बरोडाचे Rs २ दर्शनी किमतीचे ४०२ शेअर्स मिळतील. ( मर्जर आणि डीमर्जर आणि इतर कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे)
  • NMDC ची ८ जानेवारी २०१९ रोजी शेअर BUY बॅकवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे.
  • OMC पेट्रोल आणि डिझेलची किंमत Rs १ कमी घेत होत्या. आता ही १ रुपयांची कपात OMC ना करण्याची गरज नाही

वेध उद्याचा

इन्फोसिस, कर्नाटक बँक, ११ जानेवारी २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीर बँक १२ जानेवारीला गोवा कार्बन बंधन बँक, टी सी एस १० जानेवारी रोजी तर टाटा एलेक्सि ८ जानेवारीला, बजाज कॉर्प आणि डेल्टा कॉर्प ९ जानेवारीला आपल्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. इन्फोसिस ११ जानेवारी रोजी शेअर BUY बॅक किंवा लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८९१ NSE निर्देशांक १०७९२ आणि बँक निफ्टी २७१७४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – २ जानेवारी २०१९

  1. एच. शहा

    चांगली माहिती असते. फार उपयोगी. असे दररोज पाठवणे.आभारी आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.