आजचं मार्केट –  ३ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ३ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५४.१४ प्रती बॅरल ते US $५४.८६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.१५ ते US $१= Rs ७०.७८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५० तर VIX १६.९१ होता.

आज देशी विदेशी दोन्हीही संकेत मार्केटच्या दृष्टिकोनातून फारसे चांगले नव्हते. क्रूड पडत असतानाही रुपया पडत होता कारण जागतिक पातळीवर हलक्याशा मंदीची चिन्हे दिसत आहेत. मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत आहे. काल आलेला चीनचा आणि आशियाई देशांचा डेटा सुद्धा हेच दर्शवतो आहे. त्यातच बॉण्ड यिल्ड (७.४१ झाले) वाढत आहे. सरकार फार्म लोन माफ करेल किंवा त्यावरील व्याज माफ करेल आणि उत्पादकता नसलेल्या गोष्टींवर खर्च करेल आणि कॅड वाढेल अशी मार्केटला भीती आहे.

चीन आणि तैवान यांच्या राजकीय ताणतणावाला सुरुवात झाली. आणि परिणामी आज सुद्धा सेन्सेक्स ४०० पाईंट पडला.
सरकार RBI कडून Rs १०००० कोटींपेक्षा जास्त अंतरिम लाभांशाची मागणी करण्याची शक्यता आहे.

तामिळनाडू राज्य सरकारने वेदांताच्या तुतिकोरीन प्लांट सुरु करण्याच्या NGT च्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता या अर्जाची सुनावणी ८ जानेवारी २०१९ मंगळवार रोजी ठेवली आहे.

महिंद्रा लाईफ स्पेसने महाराष्ट्र राज्य सरकारबरोबर पर्यटन प्रोजेक्ट साठी करार केला.

NMDC ने आपल्या आयर्न ओअर प्रॉडक्ट्सच्या किमती Rs ३५० प्रती टन पर्यंत कमी केल्या.

टाटा पॉवर BEST ला जी वीज पुरवते त्यासाठीचा करार ५ वर्षांनी वाढवला.

एका राज्यातून दुसर्या राज्यात सोन्याची ने आण करण्यासाठी ३% IGST द्यावा लागत होता. आता सरकारने IGST मधून पूर्ण सूट दिली आहे. याचा फायदा थंगमाईल ज्वेलर्स, TBZ टायटन PC ज्युवेलर्स यांना होईल.

हिंदुस्थान कॉपरने कॅथोड आणि वायर रॉडची किंमत ४% ने कमी केली.

विशेष लक्षवेधी

विप्रो US $१.२ बिलियन चा शेअर BUY BACK करणार आहे. हा BUY BACK २०% ते २५% प्रीमियमने जानेवारी ते मार्च २०१९ या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. १२ महिन्याच्या कालावधीमध्ये एकदाच BUY BACK आणता येतो. विप्रोने नोव्हेंबर डिसेंबर २०१७ मध्ये BUY BACK आणला होता. विप्रोने NCLT कडे तिच्या ४ व्यवसायांचे टेक्नॉलॉजीमध्ये मर्जर करण्यासाठी परवानगी मागितली आहे. विप्रो टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया, विप्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑस्ट्रिया, न्यू लॉजिक टेक्नॉलॉजी SARL, APPIRIO इंडिया क्लाऊड सोल्युशन्स या त्या चार कंपन्या होत. जर या मर्जरला NCLT न परवानगी दिली तर BUY BACK येईल असे बोलले जाते. विप्रोचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने BUY बॅक साठी प्रपोजल विचाराधीन आहे असे सांगितले

दिल्ली चंदिगढ हायवेवर EV ( इलेक्ट्रिकल व्हेईकल) साठी ४० चार्जिंग स्टेशन्स बनवली जातील. प्रत्येक १० ते २० किलोमीटर अंतरावर एक चार्जिंग स्टेशन असेल. हे काम BHEL कडे सोपवले जाईल आणि प्रमुख हायवेवर २७० चार्जिंग स्टेशन्स बनवली जातील आणि हे काम REIL ( राजस्थान इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड इन्स्ट्रूमेंट्स लिमिटेड) आणि FAME इंडिया (फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स ऑफ इंडिया) यांना दिले जाणार आहे. नवीन बिल्डिंग बांधताना चार्जिंग स्टेशन असणे अनिवार्य केले जाईल.

सरकारने Rs २८६३० कोटींचे रिकॅपिटलायझेशन बॉण्ड्स सरकारी बँकांना इशू केले. OBC ला Rs ५५०० कोटी, बँक ऑफ इंडियाला Rs १००८६ कोटी दिले आणि ४ बँका PCA मधून निघण्याची तयारी चालू आहे त्यामध्ये बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँक आणि कॉर्पोरेशन बँक यांचा समावेश आहे. कारण या बँकांनी सरकारकडे रिकव्हरी प्लॅन सुपूर्द केला आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५१३ NSE निर्देशांक १०६७२ बँक निफ्टी २६९५९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.