आजचं मार्केट –  ४ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ४ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५६.०७ प्रती बॅरल ते US $ ५७.०१ या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ६९.७८ ते US $१=Rs ६९.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३६ होता.

USA च्या संसदेने सरकारी खर्चाला मंजुरी दिल्यामुळे गेले दोन आठवडे चालू असलेले ‘शट डाऊन’ संपुष्टात आले. चीनच्या सेंट्रल बँकेने CRR १% ने कमी केला. यामुळे सर्व मेटल्सशी संबंधित शेअर्स वाढले. उदा :- हिंदाल्को, JSW स्टील, टाटा स्टील आणि SAIL.

मंदी येण्याची चिन्हे दिसू लागली की प्रत्येक देश प्रयत्न करतो. हळू हळू बँका रुळावर येत आहेत. PCA आणि NPA विषयीचे नियम सोपे करावेत असा विचार चालू झाला आहे. अर्थव्यवस्थेत लिक्विडिटीचा पुरवठा वाढत आहे. यामुळे बँकांचे शेअर्स वाढले आणि गेला आठवडाभर मार्केट सातत्याने पडत असल्यामुळे थोडेसे ओव्हरसोल्ड अवस्थेत गेले होते. त्यामुळे दुपारनंतर मार्केटमध्ये सुधारणा झाली. आणि १५० पाईंट मार्केट तेजीत बंद झाले.

३ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत NHPC चा दुलहस्ती प्लांट बंद राहील त्यामुळे शेअर पडला.

टाटा मोटर्सची USA मधील JLR ची विक्री २४% ने वाढली. टाटा मोटर्सचे डोमेस्टिक विक्रीचे आकडे खराब आले होते त्यामुळे शेअर पडला होता. नेहेमी असेच होते की टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे ४ ठिकाणाहून येतात. USA, चीन, युरोप आणि भारत. त्यातील काही ठिकाणचे आकडे चांगले तर काही आकडे खराब येतात आणि शेअरची किंमत आहे तेथेच राहते.

HAL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला ‘तेजस’ या विमानाचे वेपनायझेशन करण्यासाठी मंजुरी मिळाली. सरकारने HAL ला Rs ४४९८ कोटी उभारण्यासाठी मंजुरी दिली

बँक ऑफ बरोडाच्या कर्मचारी युनियनने ७ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केलेला संप मागे घेतला

एडेलवाईसच्या AMC ला (ऍसेट मॅनेजमेंट कंपनी) ETF आणण्याची परवानगी मिळाली.

RBI ने MSME च्या दिलेल्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंगचे नियम जातील असे सांगितले. याचा फायदा DCB आणि फेडरल बँकेला होईल.

सरकार सोन्याविषयीचे नवे धोरण जाहीर करणार आहे. जर हिशेबात न दाखवलेले सोने तुम्ही जाहीर केलेत तर त्यात करामध्ये सवलत मिळेल. पण याला ५ वर्षांचा लॉकइनपिरियड आहे. मंदिरे आणि संस्था यांना सुद्धा ही सवलत मिळेल. सरकार गोल्ड बँक स्थापन करेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल. जवळ जवळ ३००००टन सोने देशामध्ये असावे असा अंदाज आहे. पण त्याचा उपयोग उत्पादकता वाढवण्यासाठी होत नाही म्हणून सरकारची ही योजना आहे.
आता अशोक लेलँड विषयी थोडेसे या कंपनीचा शेअर गेले दोन महिने सतत पडत आहे. या कंपनी विषयी थोडीशी माहिती घेऊ या.

 1. सरकारने हेवी व्हेहिकल्स किती माल वाहून नेऊ शकतील याविषयीचे नियम बदलले. नव्या नियमाप्रमाणे आता या गाड्या २०% ते २५% लोड जास्त घेऊ शकतात. त्यामुळे नवीन गाड्यांसाठीची मागणी कमी झाली.
 2. कंपनीचे CEO विनोद दसारी यांनी १३ नोव्हेम्बर २०१८ ला राजीनामा दिला. दसारींचा राजीनामा ३१ मार्च २०१९ पासून अमलात येईल. त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार आहे हे निश्चित नसल्यामुळे कंपनीचा शेअर पडत आहे.
 3. कंपनीने त्यांचा ऑब्जेक्ट CLAUSE बदलला त्यानुसार कंपनी आता ( ७.५ टॅन वजन असणाऱ्या लाईट कमर्शियल व्हेहिकल, पॉवर ट्रेन( LCV साठी) डेव्हलपिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री आणि स्पेअरपार्टसच्या व्यवसायात उतरणार आहे.
 4. कंपनीमध्ये तिचे तीन भाग मर्ज होणार आहेत.
 5.  BS VI एमिशन स्टॅंडर्ड लागू झाल्यावर किमती ८% ते १०% ने वाढतील.
  डिसेंबर २०१८ महिन्यासाठीची विक्री कमी झाल्यामुळे शेअरची किंमत Rs १०० च्या खाली घसरली.

वेध उद्याचा

 • पुढील आठवड्यात येणाऱ्या कॉर्पोरेट निकालांचे वेळापत्रक या आधीच भागात दिले होते.
 • पुढील आठवड्यात ७ तारखेला USA चे एक शिस्तमंडळ चीनला भेट देईल.
 • ८ जानेवारी २०१९ रोजी LIC ची IDBIच्या शेअर्ससाठी ओपन ऑफर बंद होईल.
 • ९ जानेवारी २०१९ रोजी येस बँक आपल्या CEO आणि MD साठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव RBI ला कळवेल.
 • १० जानेवारी २०१९ रोजी GST कौन्सिलची बैठक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६९५ NSE निर्देशांक निफ्टी १०७२७ बँक निफ्टी २७१९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.