आजचं मार्केट –  ७ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ७ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५७.६६ प्रती बॅरल ते US $५८.०७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ६९.३५ ते US $१= Rs ६९.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.९८ होता.

आज मार्केटचा मूड चांगला होता. ऑस्ट्रेलिया मध्ये असलेली क्रिकेटची कसोटी मालिका भारताने जिंकली. त्यामुळे दुधात साखर पडली. निफ्टी मध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला होता ट्रम्प साहेबानी ट्रेड वॉरचे कोडे उलगडत आणले. फेडच्या पॉवेलनी थोडी माघार घेतली. आता USA मध्ये दरवाढ करणे बंद होऊन कदाचित दर कमी करण्याची शक्यता निर्माण झाली. पण त्याच वेळेला त्यांनी फार्मा कंपन्यांवर आपली नजर वळवली. याचा पहिला धक्का ग्लेनमार्क फार्माला मिळाला. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यामधील प्रत्यक्ष कर वसुली १४.१% ने वाढली.

ASM च्या यादीमधून MERCK आणि NELCO या कंपन्या बाहेर पडतील.

कमोडिटी मार्केट सकाळी ९ वाजता उघडायला सुरुवात झाली.

क्लास EIGHT ट्रकची विक्री USA मध्ये कमी झाली. त्यामुळे भारत फोर्जचा शेअर पडला.

शेतकऱ्यांना DBT योजनेतून कॅश ट्रान्स्फर केली जाईल याचा बॉण्ड यिल्डवर परिणाम होईल.

१४ ऑइल ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली ऑइल इंडिया आणि ONGC यांना उत्पादन वाढवण्यास सांगितले. यामुळे हे शेअर्स वाढले.

NHPC चे चमेरा युनिट (३) हे ६ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान बंद राहील. .

घरडा केमिकल्स मधील ५७.७% स्टेक घेण्यासाठी गोदरेज अग्रोव्हेट आणि युपीएल यांनी बिडिंग केले आहे.

९ तारखेला येस बँक आपल्या MD &CEO साठी नावाची निवड करून RBI ला कळवेल. या शर्यतीत MAX लाईफ इन्शुअरन्स चे MD &CEO राजेश सूद आणि येस बँकेचे वर्तमान एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रजत मोंगा हे आघाडीवर आहेत.

जानेवारी १० २०१९ रोजी होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट आणि बिल्डिंग मटेरियल यांच्यावरील GST कमी होणार अशी बातमी आल्यामुळे रिअल्टी क्षेत्र आणि सिरॅमिक्स बनवणारे शेअर्स तेजीत होते. त्यात नीटको टाईल्स, कजारिया सिरॅमिक्स, सेरा सॅनिटरीवेअर, ओरिएंट बेल, सोमानी, मुरुडेश्वर आदी शेअर्स तेजीत होते. या GST च्या बैठकीत कॅलॅमिटी कर फक्त केरळमध्ये २ वर्षांकरता लावला जाईल.

UK मधील JLR ची विक्री ६.९% वाढली विक्री ६६२५ युनिट झाली.

RBI च्या गव्हर्नरनी MSME असोसिएशन्स बरोबर बैठक केली. RBI ने सांगितले की RBI लिक्विडिटीविषयी चिंतीत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी लिक्विडीटी असणे आवश्यक आहे. पण ही लिक्विडीटी जरुरीपेक्षा जास्त होणार नाही याची RBI काळजी घेईल. RBI ने असेही सांगितले की त्यांची सहकारी बँकांबरोबरही बोलणी चालू आहेत. तसेच राज्य सरकारांनी कर्ज माफी करण्याआधी त्यांच्या राजस्वचा विचार करणे आवश्यक आहे.

RBI ने MSME युनिटला रिस्ट्रक्चरिंग पॅकेज मंजूर करताना ते MSME युनिट व्हायेबल आहे कां ? याचा विचार करणे जरुरीचे आहे.असे बँकांना सांगितले.

उद्या RBI गव्हर्नर NBFC बरोबर बैठक करणार आहेत. तेव्हा NBFC चे प्रश्न चर्चेस घेतले जातील.

RBI सरकारला Rs ४०००० कोटी अंतरिम लाभांश देणार आहे अशी बातमी आहे.

विशेष लक्षवेधी

बंधन बँक गृह फायनान्स ही कंपनी ALL शेअर स्वॅपपध्दतीने घेणार आहे. या डीलमुळे बंधन बँकेच्या प्रमोटर्सचा स्टेक ८२% वरून ६१% वर येणार आहे. मर्ज्ड एंटिटीमध्ये १५% HDFC चा स्टेक असेल. गृह फायनान्सचे १००० शेअर असतील तर बंधन बँकेचे ५६८ शेअर्स मिळतील. HDFC चा गृह फायनान्समध्ये ५७.८६% स्टेक आहे तो मर्जरनंतर १४.९६% एवढा होईल. ही दोघांच्याही दृष्टीने ‘विन विन’ सिच्युएशन आहे. बंधन बँक स्थापन झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत प्रमोटर्सचा स्टेक ४०% पर्यंत कमी करायला हवा होता. तो कमी केला नव्हता म्हणून त्यांना नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी नव्हती आणि त्याचबरोबर बँकेच्या MD &CEO चे रेम्यूनरेशन फ्रीझ केले जाईल असे RBI ने कळवले होते. केवळ प्रमोटर्सचा स्टेक कमी करण्यासाठी हे अक्विझिशन केले आहे असे समजते. पण आज मार्केटमध्ये दोन्हीही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती पडत होत्या. यावरून मार्केटला हे मर्जर फारसे पसंत पडले नाही असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८५० NSE निर्देशांक १०७७१ तर बँक निफ्टी २७३०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.