आजचं मार्केट –  ८ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ८ जानेवारी २०१९

US $ ५७.२८ प्रती बॅरल ते US $ ५७.८१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ६९.८३ ते US १= Rs ७०.१७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.९५ होता.

आज मार्केट बर्याच प्रमाणात स्थिर होते. रुपयांची घसरण चालू होती क्रूडचा भाव घसरत असतानाही रुपया कां ढासळतो आहे याची उकल होणे कठीण झाले आहे. RBI OPM( ओपन मार्केट ऑपरेशन्स) च्या सहायाने रुपया सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

AAI (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने १२५ विमानतळांवर प्लास्टिक बॅन आणला आहे. विमानतळाच्या आवारात खाण्यास तयार असलेले अन्नपदार्थ पातळ प्लास्टिकच्या बॅगमध्ये, वेष्टनामध्ये विकण्यास मनाई केली. त्यामुळे आज पेपर शेअर्स तेजीत होते.

११ फेब्रुवारीपासून निफ्टी वीकली एक्स्पायरीची काँट्रॅक्टस चालू होतील. पहिली एक्स्पायरी १४ फेब्रुवारीला होईल.
बंधन बँकेचा गृह प्रवेश मार्केटला पटलेला नाही. १००० गृहफायनान्स शेअर्सला बंधन बँकेचे ५६८ शेअर्स हा रेशियो गृह फायनान्सच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. गृह फायनान्सचे व्हॅल्युएशन कमी केले आहे. हे आपल्याला दोघांचेही फायनान्सियल रेशियो पाहिले की समजते. बंधन बँकैचा P /E रेशियो ३८.२ तर गृह फायनान्सचा ५१.८ आहे P /बुक व्हॅल्यू बंधन बँकेचा ६.२ तर गृह फायनान्सचा १३.५ आहे आणि ROE बंधन बँकेचे २१.६ तर गृह फायनान्सचे २८.९ आहे.
साखर उद्योगाला इथेनॉलसाठी Rs १०,००० ते २०,००० कोटींचे पॅकेज देण्याची शक्यता आहे. सरकार ६% व्याजावर ५ वर्षांसाठी कर्ज देणार आहे.

अफोर्डेबल हौसिंग फंड सध्या Rs १०,००० कोटी आहे. अंतरिम अंदाजपत्रकामध्ये ह्याची रक्कम Rs १५००० कोटी करण्याची शक्यता आहे. या फंडातून पहिल्या वेळेला घर घेणाऱ्या लोकांना व्याजात सूट दिली जाते.

ल्युपिन एप्रिल-जून या तिमाहीत UK मध्ये ‘NOMUSCLE’ या नावाचे नवीन औषध मार्केटमध्ये आणेल. कंपनीला यासाठी UK रेग्युलेटरची परवानगी मिळाली आहे.

वेदांताचा तुतिकोरीन प्लांट पुन्हा सुरु करण्याच्या NGT च्या आदेशाविरुद्ध स्टे द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तामिळनाडू राज्य सरकारने या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोटात अर्ज केला होता.

झायडस या कंपनीला त्यांच्या डिप्रेशनवरील ‘ARIPIPRAZOLE’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. या औषधाचे उत्पादन कंपनीच्या ‘मोरेय्या’ युनिटमध्ये केले जाईल.

DR रेड्डीजच्या विशाखापट्टणम SEZ युनिटची USFDA कडून तपासणी चालू झाली आहे.

L & T च्या BUY बॅक ला अजून सेबीकडून परवानगी मिळाली नाही. सरकार SUUTI(स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफयुनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) मधील शेअर्स BUY BACK मध्ये देणार की नाही हे अजून समजले नाही जर सरकारने BUY बॅकमध्ये शेअर्स दिले तर पब्लिक साठी असलेला एक्सेप्टन्स रेशियो कमी होईल. त्यामुळे ज्या लोकांनी BUY बॅक मध्ये शेअर्स देता येतील म्हणून शेअर्स खरेदी केले होते ते लोक कंटाळून शेअर्स विकू लागले आहेत.

महिंद्रा आणि महिंद्रा वर फियाट कंपनीने USA येथील कोर्टात दावा केला आहे. त्यांनी ‘JEEP’ मॉडेलची नक्कल केली असा त्यांच्यावर आरोप आहे. हा दावा कोर्टाने दाखल करून घेतला.

विशेष लक्षवेधी

आज टाटा एलेक्सीचा निकाल आला. निकाल ठीक लागला पण अपेक्षेच्या मानाने म्हणजे Rs ८२ कोटींऐवजी Rs ६५ कोटी प्रॉफिट झाले.

PTC इंडिया फायनान्सियल सर्व्हिसेसला SBI ने Rs १४०० कोटींची क्रेडिट फॅसिलिटी दिली. त्यामुळे शेअर वाढला.

पावसाळा आला वनस्पती वाढीच्या दृष्टीने वातावरण चांगले झाले की सगळी झाडे वाढतात टवटवीत दिसू लागतात. पण गवत कोणते आणि औषधी वनस्पती कोणत्या हे आपल्याला शोधता आले पाहिजे. आज पेपर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढत होते अशावेळी पेपर कंपन्यांचे शेअर कोणते आणि कोणती कंपनी कोणत्या प्रकारचा पेपर तयार करते हे माहीत असले पाहिजे आणि त्याच बरोबर स्वस्त काय आणि महाग काय ? हे ओळखता आले पाहिजे त्यासाठी फायनान्सियल रेशियोज बघावे लागतात. मी तुम्हाला काही कंपन्यांचे फायनान्सियल रेशियोज देत आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला शिका.

कंपनीचे नाव                      CMP ( Rs)        P /E रेशियो               P /B रेशियो 
शेषशायी  पेपर                    १०४५                  ८.६७                           १.७५
J K पेपर                             १४८                    ७.६३                           १.४७ 
वेस्टकोस्ट पेपर                   ३०३                    ६.८२                           २.०४
स्टार पेपर                           १५३                    ५.४७                           ०.५९
इंटरनॅशनल पेपर                 ४५०                   १२.६८                          २.४५ 
TNPL                                २४२                    १८.३८                         १.०५
ओरिएंट पेपर                      ४३.६०                १२.३९                         ०.७०


या पद्धतीने आपण सर्व कंपन्यांचा अभ्यास करावा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९८० NSE निर्देशांक १०८०२ तर बँक निफ्टी २७५०९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

3 thoughts on “आजचं मार्केट –  ८ जानेवारी २०१९

  1. Ratnakar Mehendale

    Very good analytical approach
    Please keep it up and give emphasis on fundamental and long term investment ideas.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.