आजचं मार्केट –  ९ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ९ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५९.३२ प्रती बॅरल ते US $ ५९.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.२२ ते US $१=Rs ७०.५७ होते. US $ निर्देशांक ९५.७४ होता. VIX १६.०७ होते.

आज मार्केट ‘ROLLER COASTER RIDE’ सुरु आहे असे वाटावे या पद्धतीने सुरु होते. किंवा मराठीत सांगायचे तर श्रावणातला पाऊस किंवा जत्रेतले वर खाली होणारे पाळणे. त्यामुळे बर्याच जणांचे स्टॉप लॉस हिट झाले असतील आणि काही जणांना स्वस्तात शेअर्स मिळाले असतील.

आज तिसऱ्या दिवशीसुद्धा USA आणि चीन यांच्यामध्ये बोलणी सुरु होती. खरे पाहता दोनच दिवस बोलणी करण्यासाठी ठरवले होते. मार्केट संपता संपता बोलणी पूर्ण झाली असे समजले पण यातून काय निष्पन्न झाले ते मात्र कळू शकले नाही. यावर मार्केट उद्या प्रतिक्रिया देईल.

अंडर कन्स्ट्रक्शनच्या घरांवरील GST १२% वरून ५% करावा पण इनपुट क्रेडिट देऊ नये. हा फायदा घर खरेदी करणाऱ्याला मिळाला पाहिजे असे सरकारचे म्हणणे आहे.

TWO व्हिलर उत्पादकांनी म्हणजेच TVS, बजाज, हिरोमोटो यांनी GST २८% पेक्षा कमी करावा अशी विनंती केली आहे कारण TWO व्हीलर ही आता चैन उरलेली नाही

चीन ऑटो आणि होम अप्लायन्सेस मधील आपली गुंतवणूक वाढवणार आहे.

सरकारने आज प्रिंट मेडियातील जाहिरातींच्या दरात २५%ने वाढ केली.यामुळे छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्रांचा फायदा होईल. त्यामुळे प्रिंट मेडिया क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. उदा :- H T मीडिया, D B कॉर्प, जागरण प्रकाशन, संदेश

DR रेड्डीज या कंपनीने त्यांच्या दुआडा युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीच्या रिपोर्टला उत्तर पाठवले. कंपनी USA मधून ११३ औषधांच्या मंजुरीची वाट बघत आहे. कंपनी चीनमध्ये उत्पादन आणि विक्री यांच्यात वाढ करणार आहे.

NMDC ही मेटल उद्योगातील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी Rs ९८ प्रती शेअर या भावाने १०,२०,४० ८१५ शेअर्स BUY BACK करण्यासाठी Rs १००० कोटी खर्च करेल. या कंपनीत सरकारचा स्टेक ७२.४३% आहे. या BUY BACK मध्ये कंपनी आपले ३.२३% शेअर खरेदी करेल. रेकॉर्ड डेट १८ जानेवारी २०१९ ही या BUY BACK साठी ठरवली आहे.

OBC ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक Rs ६३६ कोटींच्या NPA च्या विक्रीसाठी बोली मागवणार आहे.

विशेष लक्षवेधी

  • आज इंडस इंड या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या तिसर्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. बँकेला प्रॉफिट Rs ९८५ कोटी. उत्पन्न Rs २२८८ कोटी, NPA साठी प्रोव्हिजन Rs ६०६ कोटी ( यातील Rs २५५ कोटी IL &FS साठी केली आहे). ग्रॉस NPA आणि नेट NPA अनुक्रमे १.१३% आणि ०.५९% आहे. बँकेने सांगितले की भारत फायनान्सियलचे बँकेबरोबर मर्जर फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल.
  • बजाज कॉर्पचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. प्रॉफिट Rs ६० कोटी, विक्री Rs २३० कोटी, आणि EBITDA Rs ७२ कोटी झाला. कंपनीने Rs १४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
  • टाटा स्टीलच्या शेअरचा भाव ५२ वीक लो झाला. युरोपमध्ये उत्पादन १२.७% ने कमी झाले म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत २.३३लाख टन उत्पादन कमी झाले .याचा परिणाम कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालावर होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२१२ NSE निर्देशांक निफ्टी १०८५५ बँक निफ्टी २७७२० वर होते.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

3 thoughts on “आजचं मार्केट –  ९ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.