आजचं मार्केट – १० जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १० जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.७६ प्रती बॅरल ते US $ ६०.९१ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७०.३७ ते US $१= Rs ७०.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.१२ होते.

आज बँक निफ्टीची एक्स्पायरी होती. या एक्स्पायरीला प्रॉफिट बुकिंग आढळले .

सौदी अरेबियाने क्रूडचे उत्पादन कमी केले. त्यामुळे क्रूडचे दर वाढले.

एल आय सी ने एशियन पेंटमधील आपला स्टेक कमी केला.

मारुतीने उत्पादन खर्च वाढल्यामुळे आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत Rs १०००० पर्यंत वाढ केली. ही वाढ १०/०१/२०१९ पासून अमलात आली.

गोवा कार्बन ही कंपनी २०१८-१९ या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीचे विलासपूर आणि पारादीप हे दोन प्लांट जवळजवळ दीड महिना बंद होते. कंपनीला Rs ५ कोटी तोटा झाला. आणि उत्पन्न Rs ९४ कोटी झाले.

आज बंधन बँकेने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ३३१ कोटी झाला. नेट इंटरेस्ट इन्कम Rs ११३४ कोटी झाले. लोनमध्ये ४६.१% वाढ झाली. नेट NPA ०.७०% तर ग्रोस NPA २.४% होते. बँकेने IL & FS साठी Rs ३८५ कोटी प्रोव्हिजन केली. कसा रेशियो ४१.४% होता.

टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीचा निकाल नेहेमीच सर्वसाधारण असतो. प्रॉफिट Rs ८१०५ कोटी(२४.१%) तर एकूण उत्पन्न Rs ३७३३८ कोटी झाले.अन्य उत्पन्न Rs ११६० कोटी झाले. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ १.८% होती. ऑपरेटिंग मार्जिन २५.६% होते. EBIT Rs ९५६४ कोटी झाले. ऍट्रीशन रेट ११.२% होता. कंपनीने नवीन ६८२७ कर्मचारी नेमले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीजवळ Rs ८६८२ कोटी कॅश आहे

BSE ला सेबीने विकली फ्युचर काँट्रॅक्टस आणि बँकिंग ऑप्शन साठी मंजूर दिली.

चीनमध्ये मागणी कमी झाल्यामुळे टाटा मोटर्स आपला सेल्स आणि रिसर्च फोर्समधील कर्मचारी वर्ग कमी करणार आहे.
ऊर्जा मंत्रालय SJVN आणि NTPC यांच्यामधील डीलच्या PMO कडून येणाऱ्या मंजुरीची वाट पाहात आहे. ती मंजुरी लवकरच मिळेल असे अपेक्षित आहे.

GST रजिस्ट्रेशनसाठीची किमान वार्षिक टर्नओव्हरची मर्यादा Rs २० लाखावरून Rs ४० लाख केली. कॉम्पोझिशन स्कीममध्ये सामील होण्याची वार्षिक टर्नओव्हरची मर्यादा Rs १ कोटींवरून Rs १.५ कोटी केली. कम्पोझिशन स्कीमखाली येणाऱ्या सर्व करदात्यांना दर तिमाहीला GST कर भरावा लागेल पण रिटर्न मात्र वर्षातून एकदाच फाईल करावा लागेल. केरळमध्ये आपदा सेस दोन वर्षांसाठी १ % लावला. हा सेस IGST वर लागेल.

रिअल्टी क्षेत्रात GST कमी करण्यावर शिफारस करण्यासाठी एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ची स्थापना केली. GST नियमातील हे बदल १ एप्रिल २०१९ पासून अमलात येतील.

SBI Rs २०००० कोटींचा QIP इशू आणणार आहे.

संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन ३१ जानेवारी २०१९ ला सुरु होऊन १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालेल.

वेध उद्याचा

  • उद्या TCS च्या शेअरवर तिसऱ्या तिमाहीच्या निकालाचा काय परिणाम होतो त्यावर लक्ष ठेवावे लागेल.
  • उद्या इन्फोसिस, कर्नाटक बँक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येतील. या शेअर्सकडे मार्केटचे लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१०६ NSE निर्देशांक निफ्टी १०८२१ बँक निफ्टी २७५२८ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – १० जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.