आजचं मार्केट – १४ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १४ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५९.४० प्रती बॅरल ते US $ ५९.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६३ ते US $१=Rs ७०.८७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.५७ होता. UK च्या संसदेमध्ये उद्या ब्रेक्झिट करारावर मतदान होईल. त्यामुळे मार्केट मध्ये थोडी अस्वस्थता होती.

IIP नोव्हेंबर २०१८ साठी ०.५ होता. हा निर्देशांक औद्योगिक उत्पादनातील वाढ जवळ जवळ ठप्प झाली आहे असे दर्शवतो.

आज डिसेंबर २०१८ या महिन्यासाठी WPI होलसेल प्राईस इंडेक्सचे आकडे आले. WPI ३.८% झाला ( नोव्हेम्बरमध्ये ४.६४) होता.

डिसेंबर २०१९ या महिन्यासाठीCPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) २.१९ %(२.३३ नोव्हेंबर २०१८ साठी) होता. हा गेल्या १८ महिन्यातील किमान CPI आहे. CPI आणि WPI हे महागाईचा स्तर दर्शवणारे निर्देशांक कमी झाल्याने RBI आपल्या फेब्रुवारीच्या वित्तीय धोरणात रेट कट करेल अशी मार्केटला आशा निर्माण झाली

CYIENT या कंपनीची १७ जानेवारीला शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

प्रकाश इंडस्ट्रीजचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

जम्मू आणि काश्मीर बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आला.

D -MART या कंपनीचा निकाल अपेक्षेनुसार आला नाही. त्यामुळे शेअर पडला.

१ फेब्रुवारी २०१९ रोजी सरकार आपले अंतरीम अंदाजपत्रक संसदेत सादर करेल. हे वर्तमान सरकारच्या ५ वर्षाच्या कालावधीतील शेवटचे अंदाजपत्रक असेल. २०१९ होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करता सरकार या अंदाजपत्रकात निवडणुकीच्या वातावरणाला साजेश्या सवलतींचा वर्षाव करेल असे वाटते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या आणि पगारदार करदात्यांसाठी या अंदाजपत्रकात आयकराच्या बाबतीत काही सवलती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जेट एअरवेजचे CEO नरेश गोयल अखेरीस व्यवस्थापनावरचे आपले नियंत्रण सोडायला तयार झाले आहेत . त्यांचा मुलगा निवान यांच्या हाती कंपनीची सूत्रे येतील. नरेश गोयल यांच्या या निर्णयानंतर एतिहाद आणि कर्ज देणार्या बँकांनी जेट एअरवेजला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. यामुळे जेट एअरवेजचा शेअर वाढला.

येस बँकेच्या CEO पदासाठी आता RAVNEET GILL याचे नाव घेतले जात आहे. एस बँकेच्या नॉनएक्झ्युटिव्ह चेअरमनपदी ब्रम्हदत्त याची नेमणूक झाली.

ऍक्सिस बँकेचे चीफ क्रेडिट ऑफिसर म्हणून महेश्वरी यांची नेमणूक झाली.

वेध उद्याचा

१७ जानेवारी २०१९ ला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HUL यांचे तर १८ जानेवारी २०१९ ला विप्रो आणि १९जानेवारी २०१९ ला HDFC बँक यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८५३ NSE निर्देशांक निफ्टी १०७३७ बँक निफ्टी २७२४८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.