आजचं मार्केट – १८ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ६ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १८ जानेवारी २०१९

आज क्रूड US $६१.७० प्रती बॅरल ते US $६१.८२ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०७ ते US $१=Rs ७१.२१ यादरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.०५ होता. VIX १६.६३ होते.

अतुल लिमिटेड, धनलक्ष्मी बँक ( ही बँक तोट्यातून फायद्यात आली), कजारिया सिरॅमिक्स, NIIT TECH, L &T इन्फोटेक, मुथूट कॅपिटल सर्व्हिसेस या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

खाद्य मंत्रालयाने ८० औषधांवर ( यात मुख्यतः ताप, पोटदुखी यासारख्या आजारांसाठी असलेली) बंदी घातली. यात ग्लेनमार्क फार्मा, ALKEM लॅब, ABBOT लॅब, WOCHKARDT, सिप्ला या कंपन्यांनी बनवलेल्या औषधांचा समावेश आहे. या औषधांची मार्केट कॅप Rs ११५० कोटींची आहे.

वोडाफोनने Rs ४८०० कोटी करपरताव्यासाठी अर्ज केला होता. दिल्ली हायकोर्टाने हा अर्ज रद्दबातल ठरवला होता. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवून सरकारचे स्पष्टीकरण मागवले आहे.

सरकारने चीन, बांगलादेश, इंडोनेशिया, मलेशिया या देशात साखरेची निर्यात करण्याची शक्यता अजमावण्यासाठी एक टीम पाठवली होती. इंडोनेशिया आणि मलेशिया यांनी साखर आयात करण्यासाठी आपला होकार कळवला आहे.
ऑरोबिंदो फार्मा या कंपनीने ७ ऑन्कोलॉजी औषधांचे ( कॅन्सर ट्रीटमेंट) हक्क US $३०० मिलियन ला विकत घेतले. त्यांच्यापैकी US $१६०मिलियन लगेच द्यायचे आहेत.

अडानी BASF या केमिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनीबरोबर मुंद्रा येथे Rs १४००० कोटी खर्च करून पेट्रो केमिकल प्लांट उभा करणार आहे. सध्या जी केमिकल्स आयात करावी लागतात ती आता या प्लांट मध्ये उत्पादित केली जातील.

सन फार्मा या कंपनीविरुद्ध मनिलाईफ या विसलब्लोअरने १७२ पानांची कॉर्पोरेट गव्हर्नन्ससंबंधात सेबीकडे तक्रार केली होती. सन फार्माची औषधे भारतात मेडिसेल्स ही कंपनी वितरीत करते.ही कंपनी आणि सन फार्मा यांच्यात मोठ्या रकमांचे व्यवहार होतात. हे व्यवहार अपारदर्शक रीतीने होतात. तरी सन फार्माने या व्यवहारांविषयी माहिती द्यावी असे तक्रार करणाऱ्याचे म्हणणे आहे. सन फार्माने अशी काही तक्रार आपल्याला मिळाली नाही असे जाहीर केले.

विप्रोने आपल्याजवळ ३ शेअर्स असतील तर त्यावर १ बोनस शेअर जाहीर केला. तसेच Rs १ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. रेव्हेन्यू २%ने वाढला. मार्जिन १९.८% राहिले. EBIT १२.५% ने वाढले. फायदा Rs ३२ % वाढ झाली. फायदा Rs २५४५ कोटी झाले.विप्रोचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३८३ NSE निर्देशांक निफ्टी १०९०६ बँक निफ्टी २७४५६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.