आजचं मार्केट – २१ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ६ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २१ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६२.४२ प्रती बॅरल आणि US $६२.९२ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७१.२४ ते US १=Rs ७१.४४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३५ होता.

आज मार्टिन ल्युथर किंग डे USA मध्ये साजरा होत असल्यामुळे USA मधील मार्केट्स बंद होती. चीन आणि USA यांच्यातील टॅरीफ बसवण्याला तीन महिन्यांची स्थगिती दिली असल्यामुळे चीन मधील व्यापाऱ्यांनी निर्यातीचे प्रमाण वाढवले. त्यामुळे चीनचा IIP ५.७ आणि GDP ६.६% होता. चीन आणि USA मधील टॅरीफ वॉरचे प्रमुख कारण म्हणजे आयात आणि निर्यातीमध्ये असलेला फरक, पण चीन आता USA मधून करण्यात येणारी आयात वाढवणार आहे. USA लाही आता कळून चुकले आहे की टॅरिफ वॉर मुळे आपलेही नुकसान होत आहे त्यामुळे दोघांनकडूनही थोडे नरमाईचे धोरण अवलंबले जात आहे.

मार्केट मध्ये तेजी येते पण ती टिकाव धरत नाही. कारण हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या शेअर्समध्ये ही तेजी येते. HDFC HDFC बँक TCS अशा मोजक्या शेअर्समध्ये तेजी होती त्यामुळे ब्रेकआऊट टिकत नाही.

L &T चा शेअर BUY बॅक तांत्रिक बाबींमुळे रद्द झाला. सेबीने शेअर BUY बॅक ला परवानगी दिली नाही. BUY बॅक केल्यानंतर डेट इक्विटी रेशियो २ पेक्षा जास्त असता कामा नये असा नियम आहे. सेबीने यासाठी कन्सॉलिडिटेड फायनान्सियल्स विचारात घेतले. यामध्ये L & T फायनान्स या कंपनीचाही समावेश आहे. फायनान्स कंपन्यांचा हा रेशियो नेहेमीच जास्त असतो . शेअर BUY बॅक करण्याच्या बाबतीत कन्सॉलिडिटेड फायनान्सियल्स बघावेत की स्टॅन्डअलोन बेसिस वरचे फायनान्सियलस बघावेत याविषयी नियमात कोठेंही उल्लेख नाही असे L & T चे म्हणणे आहे. मार्केटला मात्र शेअर BUY बॅक आणताना एवढ्या मोठ्या आणि सुप्रस्थापित कंपनीकडून अशी चूक कशी झाली हे समजणे कठीण झाले. त्यामुळे सुरुवातीला शेअर पडला.पण L & T Rs ५३ प्रती शेअर लाभांश जाहीर करण्याची शक्यता आहे असे CLSA ने सांगितल्यावर शेअर वाढला

कोटक महिंद्रा बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. प्रॉफिट Rs १२९० कोटी, NII Rs २९३९ कोटी, GNPA २.०७% तर NNPA ०.७१%, लोन ग्रोथ ४३%, NIM ४.३३% होते. हा कोटक बँकेचा तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणेच आहे.
हुडकोचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. हिंदुस्थान झिंक या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे असले तरी Q ON Q कमी झाले. इतर आय Rs ५५० कोटी होते.

युनियन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल ( तोट्यातून फायद्यात आली) चांगले आले पण फ्रेश स्लीपेजिस(NPA) वाढल्यामुळे शेअर पडला. सौथ इंडियन बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.HDFC बँक, SBI लाईफ आणि ICICI लोंबार्ड यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

LICने IDBI बँकेचे अधिग्रहण पुरे केले. यामुळे आता LIC ला IDBI बँकेच्या प्रमोटरचा दर्जा मिळाला.

रिलायन्स पॉवरने आंध्र डिस्कॉम विरुद्धचा Rs ३०० कोटींचा दावा सुप्रीम कोटातून मागे घेतला. आता याबाबतीत CERC निर्णय घेईल.

RBI ने असे सांगितले की ‘PCA ‘ चे नियम सोपे करणे आणि CRR आणि CRAR ( कॅपिटल टू रिस्क वेटेड असेट्स ) याचे नियम सोपे करणे यावर अर्थ मंत्रालय आणि RBI यांच्यात एकमत झाले आहे. .RBI लवकरच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करेल. हे नियम सोपे केल्यावर ज्या बँकांनी NPA च्या वसुली मध्ये भरीव कामगिरी केली आहे त्यांना PCA मधून बाहेर काढता येईल.

आज सन फार्माने सेबीला पत्र लिहून कळवले आहे की त्यांनी WHISTLEBLOWER ने केले ल्या तक्रारीची पूर्ण चौकशी करावी. त्यांनी असेही सांगितले की कंपनी आदित्य मेडिसेल्स या सबसिडीअरी कंपनीचे पुनर्गठन करेल.

SFIO (सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टीगेशन ऑफिस) ने आज जाहीर केले की NSEL घोटाळ्यात DCB बँकेचाही सहभाग होता. बँकेच्या व्यवस्थापनाने ताबडतोब याचा इन्कार केला. पण शेअर पडायचा तो पडलाच !

विशेष लक्षवेधी

खालील मिडकॅप शेअर्स ३१ डिसेंबर २०१८ ला संपलेल्या सहा महिन्याच्या एव्हरेज मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर लार्जकॅपमध्ये वर्गीकृत झाल्या.

(१) इंडिया बुल्स व्हेंचर्स
(२) पेज इंडस्ट्रीज
(३) डिव्हीज लॅब
(४) L &T इन्फोटेक
(५) बर्गर पेंट्स
(६) युनायटेड ब्रुअरीज
(७) GSK कन्झ्युमर हेल्थकेअर

खालील कंपन्या लार्जकॅप मधून मिडकॅपमध्ये वर्गीकृत झाल्या

(१) BEL
(२) BHEL
(३) भारत फोर्ज
(४) सन टी व्ही
(५) AB कॅपिटल
(६) हिंदुस्थान एरोनॉटिक्स
(७) श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स
(८) टी व्ही एस मोटर्स.

वेध उद्याचा

  • उद्या एशियन पेंट्स, श्री सिमेंट्स, हॅवेल्स, ICICI प्रु, HDFC लाईफ, ICICI बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. याकडे लक्ष ठेवावे.
    तसेच उद्यापासून डावोस येथे मीटिंग चालू होणार आहे
  • BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५७८ NSE निर्देशांक निफ्टी १०९६२ आणि बँक निफ्टी २७५३३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – २१ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.