आजचं मार्केट – २२ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २२ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६२.०४ प्रती बॅरल ते US $६२.७४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs७१.२७ ते US १=Rs ७१.४४ या दरम्यान होते.

डावोस मध्ये आजपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरु झाली.  सध्या चीनची आर्थीक स्थिती बिघडते आहे असे दिसते. त्यामुळे राजकीय अस्थिरतासुद्धा आली आहे. युआनचे पुन्हा एकदा डिव्हॅल्युएशन केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मलेशियाहुन ग्लासेसचे डम्पिंग होते आहे. हे ग्लास सोलर पॅनेलसाठी वापरले जातात.यावर US $११४.५८ प्रती टन एवढी ANTIDUMPING ड्युटी लावणार आहेत असे समजते. DGTR (डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेड अँड रेमिडीज) यांनी परवानगी दिली की ही ड्युटी लागू होईल. याचा फायदा गुजरात बोरोसिल, आणि बोरोसिल ग्लास यांना होईल.
कोटक महिंद्र बँक RBI बरोबर समझोता करण्याची शक्यता आहे. स्टेक कमी करण्यासाठी वेळ मागून घेतला जाण्याची शक्यता आहे.

मेडिकल इक्विपमेंटवरची ड्युटी १०% वरून २.५% केली जाणार आहे. याचा फायदा BPL, इंद्रप्रस्थ मेडिकल यांना होईल.
टेक्सटाईल क्षेत्रालाही काही सवलती मिळण्याची शक्यता आहे.

प्रभात डेअरी त्यांचा दुग्ध व्यवसाय एका फ्रेंच कंपनीला Rs १७०० कोटींना विकणार आहे. या कंपनीची मार्केट कॅप Rs ९०० कोटी आहे. यामुळे हा शेअर प्रथम अपर सर्किटला होता. Rs १११.६५ भाव होता. पण दुग्ध व्यवसाय या कंपनीच्या उत्पन्नापैकी ९८% उत्पन्न मिळवून देतो. या विक्रीचा मायनॉरिटी शेअर होल्डर्सला काय फायदा होईल हे कंपनीने स्पष्ट केले नाही तसेच शेअर होल्डर्ससाठी ओपन ऑफर येणार नाही. दूरदर्शनच्या वाहिन्यांवर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा प्रश्नआहे असे सांगितले. त्यामुळे हळू हळू हा शेअर आपल्या किमान भाव पातळीवर पोहोचला.

सन फार्माने त्यांच्याविषयी केलेल्या तक्रारीचे स्पष्टीकरण दिल्यावर सन फार्मा आणि स्पार्क हे दोन्ही शेअर्स वाढले.

३० जानेवारी २०१९ रोजी NTPC ही पॉवर क्षेत्रातील सरकारी कंपनी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये बोनस शेअर्स इशू करण्याविषयी विचार करेल.

सरकारने असे सांगितले की IL & FS चा प्रश्न येत्या तीन ते चार महिन्यात सुटेल. IL & FS च्या सब्सिडियरींज तीन भागात वर्गीकृत केल्या आहेत. ज्या सबसिडीअरी रेड म्हणून वर्गीकृत केल्या आहेत त्या विकून टाकल्या जातील. राहिलेल्या सबसिडीअरीज साठी सरकार RBI कडून विशेष मंजुरी घेईल.

रिलायंस कॅपिटलने त्यांचा GIC हौसिंग मधील ३.९% स्टेक विकला.

झेनसार टेक्नॉलॉजी आपला नॉनकोअर बिझिनेसमधील स्टेक विकणार आहे. ही कंपनी आपला ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट आणि भारतातील नॉनकोअर बिझिनेसमधील स्टेक विकेल.

TVS मोटर्सचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. प्रॉफिट Rs १७८ कोटी, उत्पन्न Rs ४६६४ कोटी, EEBITDA मार्जिन ८.१% होते. विक्री २०% ने वाढली. कंपनीने ९.८९ लाख युनिट विकली

काल HDFC AMC या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

हॅवेल्स चे प्रॉफिट Rs १९६ कोटी, उत्पन्न Rs २५१८ कोटी, EBITDA मार्जिन ११.७% होते.या कंपनीला Rs २१ कोटी ONE TIME गेन आहे.

श्री सिमेंट या कंपनीचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला. कंपनीने Rs २५ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
अलेम्बिक फार्मा, रिलायन्स निपोंन या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. रिलायन्स निपोनने Rs ३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.

एशियन पेंट्स या कंपनीचे प्रॉफीटस Rs ६४७ कोटी तर उत्पन्न Rs ५२९४ कोटी झाले. मार्जिन १९.७ % होते.

राणे मद्रास या कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

मूडीजने ऑइल इंडियाचे रेटिंग B aa २ कायम केले.

वेध उद्याचा

  • उद्या ITC, रेमंड्स, भारती इंफ्राटेल, युनायटेड स्पिरिट्स, उज्जीवन, इंडिगो, आणि R कॉम नवीन फ्लोरिन, रेडीको खेतान आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४४४ NSE निर्देशांक निफ्टी १०९२२ बँक निफ्टी २७४८२ वर बंद झाले..

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – २२ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.