आजचं मार्केट – २३ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २३ जानेवारी २०१९

क्रूड US $ ६१.५५ प्रती बॅरल ते US $ ६१.७० प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७१.१९ ते US $१=Rs ७१.३३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३४ होता. इंडिया NIX १८.१४ होते.

आता USA मध्ये चालू असलेल्या ‘शट डाऊन’ ची चिंता सगळ्यांना वाटू लागली आहे. जागतिक अर्थव्यवस्था स्लो डाऊन होत आहे असे मत DAVOS इकॉनॉमिक फोरम मध्ये व्यक्त केले गेले. त्यातच भारतात येऊ घातलेल्या निवडणुका आणि त्यामुळे लोकांना खुश करणाऱ्या अंदाजपत्रकामुळे अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढेल. आज मार्केटमध्ये व्हॉल्युम कमी होते. याला मार्केटच्या भाषेत ड्राय मार्केट म्हणतात. त्यामुळे सुरुवातीला २०ते २५ बेसिस पाईंट्सच्या रेंज मध्ये मार्केट फिरत राहिले. पण शेवटच्या तासात ITC मुळे मार्केट कोसळले.

कर्नाटक हायकोर्टाची NMDC च्या दोनामलाई माईन्स संबंधातील सुनावणी २८ जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली.
भेलला महाराष्ट्रात ६६० MW ची Rs ३७५ कोटीचे भुसावळ युनिटची ऑर्डर मिळाली.

सरकारने GST अपीलेट ट्रायब्युनल बनवायला मंजुरी दिली.

आज विप्रोच्या शेअरची किंमत Rs ३५५.८० या आपल्या १९ वर्षाच्या हायवर होती .

वेगवेगळ्या कंपन्या त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहे. यातील डिशमन फार्मा, रेडीको खेतान, ओरिएंट पेपर, DB कॉर्प, रेमंड्स, प्रीमियर एक्स्प्लोझिव्ज, ITC, कॅनफिना होम्स, एस्सेल प्रोपॅक, या कंपन्यांचे निकाल चांगले आले.  BASF ही कंपनी फायद्यातून तोट्यात गेली. विजया बँकेचे प्रॉफिट, आणि NII वाढले पण ग्रॉस NPA आणि नेट NPA मध्ये वाढ झाली. बँक ऑफ महाराष्ट्रला Rs ३७६४ कोटी तोटा झाला. Rs ४४२२ कोटींची प्रोव्हिजन करावी लागली. त्यांच्या ग्रॉस NPA आणि नेट NPA मध्ये थोडी सुधारणा झाली आहे.

कोटक महिंद्रा बँक RBI बरोबर स्टेक कमी करण्याच्या बाबतीत आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करण्याच्या प्रयत्नात आहे.

ICICI PRU चे CEO संदीप बक्षी यांची ICICI बँकेचे CEO म्हणून नेमणूक झाल्यामुळे तसेच कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे ICICI PRU हा शेअर पडला.

आज मारुतीने न्यू जनरेशन WAGNOR R आणि टाटा मोटर्सने ‘HARRIER’ ही दोन नवीन मॉडेल्स लाँच केली.

ब्रिटानिया निफ्टीमध्ये समाविष्ट होणार आनि HPCL किंवा भारती इन्फ्रा टेल निफ्टीमधून बाहेर पडेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१०८ NSE निर्देशांक निफ्टी १०८३१ बँक निफ्टी २७२५० वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.