आजचं मार्केट – २४ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – २४ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.८१ प्रती बॅरल ते US $ ६१ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७१.२३ ते US १= Rs. ७१.२८ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.१२ होते.

USA मधील शट डाऊन आणि UK चे ब्रेक्झिट डील हे प्रश्न आता दिवसेंदिवस चिघळत आहेत. अरुण जेटली वैद्यकीय उपचारासाठी USA ला गेले. त्यांच्या जागी आता पियुष गोयल हे रेल्वेमंत्रालयाबरोबरच तात्पुरता अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळतील. अंतरिम अंदाजपत्रकही पियुष गोयलच संसदेत सादर करतील. लागलीच मार्केटने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स कर रद्द व्हावा म्हणून मागणी केली आहे.

व्हिडिओकॉन न्यू पॉवरच्या केसच्या संदर्भात CBI ने व्हिडिओकॉनच्या औरंगाबाद, मुंबई येथील ऑफिसवर छापे टाकले. चंदा कोचर, दीपक कोचर, आणि वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध FIR ( फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट) दाखल केला.

येस बँकेच्या CEO पदाची सूत्रे रावनीत गिल हे १ मार्च २०१९ पासून स्वीकारतील. रावनीत गिल हे सध्या डच बँकेचे CEO आहेत. त्यांना बँकिंग क्षेत्रातील ३३ वर्षांचा अनुभव आहे. मार्केटला येस बॅंकेतला बदल पसंत पडला पण त्याचवेळी येस बँकेचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले नाहीत. पण एक अनिश्चितता संपली. त्यामुळे येस बँकेच्या शेअरची किंमत Rs २५ ने वाढली. येस बँकेने आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेला Rs १००० कोटी प्रॉफिट, NII ( नेट इंटरेस्ट इनकम) Rs २६६७ कोटी झाले. बँकेचे ग्रॉस NPA २.१०% तर नेट NPA १.१८% होते. YES बँकेचा IL & FS ला Rs २५३० कोटीचा एक्स्पोजर आहे.

DR रेड्डीज या कंपनीने USA मध्ये जनरिक इंजेक्शन लाँच केले. त्याबरोबर त्यांनी बेशुद्धी वरचे ‘DIPRIVAN’ हे औषध USA मध्ये लाँच केले.

भारती एअरटेल आणि TTML यांच्या मर्जरला NCLT ने मान्यता दिली.

CESC या कंपनीमधून स्पिन ऑफ केलेल्या स्पेन्सर रिटेलचे २५ जानेवारी २०१९ रोजी लिस्टिंग होईल..

झी इंटरप्राइझेस या कंपनीत स्टेक घेण्यात TENCENT. अलीबाबा, अमेझॉन आणि सोनी यांनी स्वारस्य दाखवले.
ज्योती लॅब, VST इंडस्ट्रीज, कोलगेट, स्टरलाईट टेक्नॉलॉजीज, अल्ट्राटेक सिमेंट, एडेलवाईस फायनान्सियल, NIIT, शारदा क्रॉपकेम यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. सुप्रीम इंडस्ट्रीजचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

डच कोर्टाने टाटा स्टील विरुद्ध ग्रॅफाइट एमिशन च्या तक्रारीचा शोध घेणे सुरु केले.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१९५ NSE निर्देशांक निफ्टी १०८४९ आणि बँक निफ्टी २७२६६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

2 thoughts on “आजचं मार्केट – २४ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.