आजचं मार्केट – २५ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २५ जानेवारी २०१९

आज क्रूड US $६१.५८ प्रती बॅरल ते US $ ६१.७७ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०७ ते US $ =Rs ७१.२१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.४१ होता.

USA आता व्हेनिझुएलावर आर्थीक निर्बंध घालणार आहे. इराणनंतर व्हेनिझुएला हा दुसरा देश आहे ज्यावर USA आर्थीक निर्बध घालणार आहे.

आज गुड फ्रायडे होईल असे वाटलं होतं पण बॅड फ्रायडे म्हणायची वेळ मार्केटने आणली. आज झी एंटर प्रायझेस ने पहिला धक्का दिला. Rs ४३८ ला ओपन झालेला झी चा भाव दुपारी Rs २९० होता. डिमॉनेटायझेशनच्या काळात झीच्या अकौंटवर कोणीतरी रक्कम जमा केली अशी अफवा होती. त्याचबरोबर आता केबल ग्राहकांसाठी जी पॅकेजची योजना आणली आहे त्याचा परिणाम दर्शकांच्या संख्येवर आणि जाहिरातींपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर होईल. या बातमीचा परिणाम सन टी व्ही, झी मेडिया, झी लर्न, यांच्या शेअरवर झाला. झी एंटरटेनमेंटचा शेअर पडायला सुरुवात झाली आणि मार्केटची वेळ संपेपर्यंत पडतच राहिला.

सुप्रीम कोर्टाने इंसॉल्व्हंसी कोड तसेच ठेवले.IBC ला आव्हान देणार्या सर्व याचिका रद्द केल्या.रेझोल्यूशन प्रक्रियेत प्रमोटर्स भाग घेऊ शकणार नाहीत हे निश्चित झाले.

SAIL आणि आर्सेलर मित्तल यांच्यात जॉईंट व्हेंचर होणार आहे.

लिंडे इंडियाचा डीलीस्टिंग प्लॅन रद्द झाला. लिंडे इंडियाची डिस्कव्हर्ड प्राईस Rs २०२५ झाली.हे प्रमोटर्सना पटले नाही म्हणून कंपनीने डीलीस्टिंग प्लॅन रद्द केला.

सवर्ण वर्गातील आर्थीक दुर्बल घटकांना दिल्या गेलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला.

HUL आणि GSK कन्झ्युमर यांच्या मर्जरला CCI ची परवानगी मिळाली.

कोपरानला त्यांच्या मदाड युनिटसाठी क्लीन चिट मिळाली.

मारुतीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल निराशाजनक होते. प्रॉफिट Rs १४८९ कोटी ( यात Rs ९१७ कोटी इतर उत्पन्नाचा समावेश आहे.) उत्पन्न Rs १९६६८ कोटी तर EEBITDA मार्जिन ९.८% होते.

कच्चा माल आणि इतर ACCESORIES चा भाव वाढल्यामुळे मार्जिनवर ताण आला. फॉरेक्स उत्पन्नही कमी झाले. मारुतीची विक्रीही थोड्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे शेअर १०% ने पडला.

आज स्पेन्सरचे Rs २२५ वर लिस्टिंग झाले. CESC व्हेंचरचे लिस्टिंग Rs ५४५ वर लिस्टिंग झाले

फायझर, PNB हौसिंग, जिंदाल सॉ, बायोकॉन, NELCO, कोपरान, MPHASIS , हट्सन ऍग्रो, किर्लोस्कर ऑइल या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. रिलायन्स पॉवर, ICRA, कोकियो कॅम्लिन, सँटेक रिअल्टी, GSFC , राणे एंजिन यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

इंडियन बँक, IOB यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल निकाल सर्व साधारण होते. DHFL चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल खराब होते. लिक्विडिटीची समस्या आहे. DLF च्या ऑफिसवर आज CBI ने छापे टाकले. म्हणून शेअर ५% पडला.

लार्सन आणि टुब्रोचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. प्रॉफिट Rs २०४२ कोटी,( YOY ३७% वाढ झाली). उत्पन्न २४% ने वाढून Rs ३५७०८ कोटी झाले. नव्या ऑर्डर्स Rs ४२२३३ कोटींच्या मिळाल्या. टोटल ऑर्डर बुक २.८४लाख कोटींचे झाले. EBITDA Rs ३९९७ कोटी, इतर उत्पन्न Rs ६०६ कोटी झाले.

IPO

CHALET या रहेजा ग्रुपच्या कंपनीचा IPO २९ जानेवारी ते ३१ जानेवारी ते ३१जानेवारी २०१९ या कालावधीत ओपन राहील. प्राईस बँड Rs २७५ ते Rs २८० असून मिनिमम लॉट ५३ शेअर्सचा आहे. दर्शनी किंमत Rs १० आहे. ५ फेब्रुवारीला अलॉटमेंट केली जाईल आणि ८ फेब्रुवारीला लिस्टिंग होईल.

वेध उद्याचा

  • मार्केटची वेळ संपल्यानंतर लार्सन & टुब्रो चे निकाल चांगले आले. या शेअरवर लक्ष ठेवा.
  • जानेवारी २९ HCLTECH , बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, ऍक्सिस बँक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. तसेच CHALET हॉटेलचा IPO ओपन होईल.
  • जानेवारी ३० ला IOC,NTPC, ICICI बँक, बजाज ऑटो यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.
  • १ फेब्रुवारी SBI टायटन याचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील. तसेच संसदेत सरकार अंतरिम अंदाजपत्रक सादर करेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०२५ NSE निर्देशांक १०७८० बँक निफ्टी २७११५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – २५ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.