आजचं मार्केट – २८ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २८ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.९४ प्रती बॅरल ते US $ ६१.०४ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७१.०७ ते US $१=Rs ७१.१६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.८७ होता. VIX १८.६४ ते १९.४१ यादरम्यान होते.

चीनमध्ये या आठवड्यात सुट्टी आहे. USA मधील शट डाऊन संपुष्टात आले. पण आज भारतीय मार्केट मात्र मंदीत होते. कारण हा एक्स्पायरीचा आठवडा आहे आणि येऊ घातलेल्या अंदाजपत्रकामुळे अनिश्चितता आहे. त्यामुळे सेन्सेक्स ४०० पाईंट मंदीत होते फक्त IT क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते.लोअर हाय आणि लोअर लो सुरु झाल्यामुळे मंदीचा ट्रेण्ड दिसतो आहे. २० दिवसांचे ५० दिवसांचे १००दिवसांचे, २०० दिवसांचे SMA मार्केटने तोडले त्यामुळे मार्केट मध्ये वीकनेस आला. आज VIX ६.४% ने वाढला.

सोन्याचा भाव गेल्या पांच वर्षातील कमाल स्तरावर होता.

आज काळजीवाहू अर्थमंत्री पियुष गोयल यांची सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांच्या प्रमुखांबरोबर बैठक झाली. FY २० च्या पहिल्या भागात द्यावयाच्या भांडवलाची गरज या बैठकीत या बँकांनी व्यक्त केली. सरकार या विषयावर १ फेब्रुवारी २०१९ रोजी निर्णय घेईल. बँकांनी आपल्या अडचणी आणि उपलब्धी या बैठकीत व्यक्त केल्या.

सरकार इलेक्ट्रॉनिक मीडियावर केल्या जाणार्या जाहिरातींचे दर वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सन टीव्ही, झी एंटरटेनमेंट यांच्या शेअर्स वाढले

RBI ने ओपन मार्केट ऑपरेशन करून बॉण्ड यिल्ड कंट्रोलमध्ये ठेवले आहे.

जी औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मेडिकल शॉपमध्ये सहजगत्या उपलब्ध असतात त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी सरकार आता या औषधांसाठी निकष ठरवणार आहे. ही औषधे आता विमानतळ , रेल्वे स्टेशन्स आणि इतर ठिकाणी मिळू शकतील. जर या निकष ठरवण्यामुळे ‘ओव्हर द कौंटर’ औषधांची संख्या वाढली तर सर्वसाधारणच फार्मा कंपन्यांसाठी मार्केटची व्याप्ती वाढेल. फार्मा कंपन्यांना त्यांच्या OTC औषधांची प्रिंट मेडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहिरात करायला परवानगी दिली जाईल.अशी शक्यता आहे.

NIIT टेकच्या प्रमोटर्सनी २२ जानेवारी २०१९ रोजी आपले २५ लाख शेअर्स गहाण ठेवले. कंपनीचे प्रमोटर्स आपले शेअर्स जेव्हा कंपनीला गरज असेल तेव्हा गहाण ठेवतात आणि कंपनीची अडचण संपल्यावर ते सोडवतात. पण हे प्रमाण काहीवेळा सुज्ञतेची मर्यादा ओलांडते तेव्हा मार्केटला ते पसंत पडत नाही. अशा काही कंपन्या पुढीलप्रमाणे :- CG पॉवर, रिलायन्स नाव्हल, झी लर्न, स्टरलाईट टेक्नॉलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, GRANUALS.

IDBI ऑफिसर्स असोसिएशनने एल आय सी आणि IDBI यांच्यातील डीलच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात केलेल्या अर्जाची सुनावणी ४ फेब्रुवारी २०१९ रोजी होईल.

आज सिटी युनियन बँक, TTK प्रेस्टिज, गोदरेज प्रॉपर्टीज ( कंपनी तोट्यातून फायद्यात आली ) सेंच्युरी टेक्सटाईल, KPR मिल्स, एस्कॉर्टस, श्रीराम ट्रान्सपोर्ट, पिरामल इंटरप्रायझेस ( इतर इन्कम Rs १०३ कोटी ), RBL बँक, कॅनरा बँक या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

M M फायनान्स, महिंद्रा लाईफ स्पेस, काँकॉर, यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

राणे ब्रेक्स, बँक ऑफ इंडिया, वोकहार्ड, यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

जेट एअरवेज त्यांना असलेल्या कर्जाचे शेअर्सचे रूपांतर करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१९ रोजी होणाऱ्या EGM ( एक्सट्राऑर्डिनरी जनरल मीटिंग) मध्ये शेअरहोल्डर्सकडून परवानगी मागेल.

BSVI च्या निकषामुळे ऑटो सेक्टरच्या अडचणी वाढतील. सेफ्टी नॉर्म्सचे पालन करण्यासाठी येणारा उत्पादन खर्च १०% ते २०% वाढेल. २ व्हिलर्सला त्रासहोईल. जुनी इंजिन दुरुस्त करण्याऐवजी नवीन इंजिन बसवणे योग्य होईल. कार सेगमेंटमध्ये डिझेल कारचा उत्पादन खर्च Rs १लाखापर्यंत वाढेल. ट्रक्सवर परिणाम होईल.अशोक लेलँड वर परिणाम होईल.

झी ग्रूपचे CEO सुभाष चंद्र यांनी आपल्या काही चुका झाल्या तसेच काही निर्णय चुकीचे सिद्ध झाले याची गुंतवणूकदार, शेअरहोल्डर्स, आणि कर्ज देणार्या बँका यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करत कल्पना दिली. त्याच बरोबर मी आमचा ग्रुपमधला स्टेक विकण्याचा प्रयत्न करत आहे. हे डील झाल्यावर आमच्या ग्रुपची स्थिती सुधारेल असा विश्वास व्यक्त केला. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील अशा प्रकारची ही पहिली घटना आहे. सुभाष चंद्र यांनी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा सुंदर इतिहास रचला त्यांच्या ग्रुपला कर्ज देण्याऱ्या बँकांनी त्यांना त्यांचा स्टेक विकण्याचे डील पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली त्यामुळे या ग्रूपचे पडत असलेले शेअर्स काही प्रमाणात सावरले.

श्री सिद्धार्थ यांना त्यांचा माईंड ट्री मधील स्टेक विकण्यास मनाई केली. याचा परिणाम कॅफे कॉफी डेच्या शेअर वर झाला.
ल्युपिनच्या पिथमपूर युनिटची USFDA कडून दुसऱ्या वेळेला तपासणी झाली. यात ६ त्रुटी दाखवल्या.

इंडोको रेमिडीज च्या गोवा युनिटमध्ये USFDA ने काही त्रुटी दाखवल्या.

DR रेड्डीज च्या मिर्यालगुडा याची तपासणी २८ जानेवारी २०१९ लापूर्ण झाली त्यात १ त्रुटी दाखवली

अल्ट्राटेक सिमेंटने जे बिनानी सिमेंटचे अक्विझिशन केले त्याची फिक्स्ड कॉस्ट त्यांना भारी पडते आहे. सरकारी निर्बंधांमुळे ते सिमेंटच्या किमती वाढवू शकत नाहीत.

आज अडानी ग्रुप आणि अनिल अंबानी ग्रुपचे शेअर्स पडले. हा काही राजकीय कारणांचा परिणाम आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६५६ NSE निर्देशांक निफ्टी १०६६१ बँक निफ्टी २६६५३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.