आजचं मार्केट – २९ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २९ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५९.९६ प्रती बॅरल ते US $६०.०४ प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७१.०५ ते US $१= Rs ७१.१४ या दरम्यान होते.

ओळीने तिसर्या दिवशीसुद्धा मार्केट मंदितच होते. याला कारण म्हणजे सगळीकडे पसरलेली अनिश्चितता ! हे लोकलुभावन अंदाजपत्रक असेल त्यामुळे डेफिसिट वाढेल आणि मूलभूत गोष्टींसाठी पैसा उरणार नाही. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाली तर अनावश्यक बाबींवर खर्च वाढेल. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फारसा पैसा उपलब्ध होणार नाही. त्यातूनच गुरुवारी असलेली एक्स्पायरी, फेडची पॉलिसी यामुळे अनिश्चिततेत झालेली वाढ आणि कंपन्यांच्या तिसर्या तिमाहीच्या निकालांमुळे बसणारे धक्के ही सर्व कारणे मार्केटमधील मंदीमागे आहेत. ‘कोब्रा पोस्ट ‘ ची प्रेस कान्फरन्स दुपारी झाली. त्यांनी DHFL बद्दल बरीच चांगली वाईट विधाने केली. त्यामुळे शेअर पडला. दिवसाच्या अखेरीस मात्र मार्केटने आपला लॉस भरून काढला.

आजपासून फेडच्या FOMC ची दोन दिवसांची मीटिंग चालू झाली.

सरकारने आज एक मोठी घोषणा केली. सरकार अंदाजपत्रकात ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम स्कीम’ आणेल. यात दर महिन्याला योजनेत दिलेल्या निकषांमध्ये बसणार्या नागरिकाला एक विशिष्ट रक्कम बेसिक इन्कम म्हणून दिली जाईल. हे निकष चल संपत्ती, अचल संपत्ती, इन्कम तसेच त्या माणसाचा व्यवसाय या संबंधी असू शकतात. ही योजना अमलात आल्यावर सरकार हळू हळू सर्व प्रकारच्या सबसिडी देणे बंद करेल. सध्या तरी दोन्ही योजना समांतर चालू राहतील.
ONGC ची शेअर बाय बॅक ऑफर २९/०१/२०१९ पासून सुरु झाली. ती ११/०२/२०१९ ला संपेल. आपल्याजवळ जर ONGC चे शेअर असतील तर आपल्याला आपले किती शेअर्स कंपनी बाय बॅक करेल या संदर्भात कंपनीकडून लेटर येईल. आपण आपल्याजवळ असलेल्यापैकी काही किंवा सर्व शेअर्स बाय बॅक साठी देऊ शकता. पण कंपनी लेटरमध्ये असलेल्या संख्येवढेच शेअर्स बाय बॅक करते. जर कंपनीकडे बाय बॅक साठी कमी शेअर्स आले तर कंपनी तुम्ही देऊ केलेले जादा शेयर्स बाय बॅक करू शकते. शेअर बाय बॅक या कॉर्पोरेट एक्शनविषयी आणि त्याच्या प्रक्रियेविषयी खुलासेवार माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे

पर्सिस्टंट सिस्टिमचा तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले. कंपनी Rs ७५० प्रती शेअर या भावाने ३० लाख शेअर्स ओपन मार्केटमध्ये बाय बॅक करेल.

शॉपर्स स्टॉप,प्राज इंडस्ट्रीज, सेरा सॅनिटरी वेअर, इन्फो एज, रामको सिमेंट, OBC, HDFC, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एक्सिस बँक, ‘HCL TECH’ यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

FACT या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल अत्यंत निराशाजनक आला. त्यात त्यांच्या ऑडिटर्सनी कंपनीची नेट वर्थ निगेटिव्ह झाली असा शेरा लिहिल्यामुळे कंपनीच्या सॉल्व्हन्सी विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

स्ट्राइड्स फार्मा, कन्साई नेरोलॅक, सिएट टायर्स, बँक ऑफ बरोडा यांचे निकाल असमाधानकारक होते.

२ सिटी गॅस नेट वर्क संदर्भातील केसमध्ये सुप्रीम कोर्टाने अडानी गॅसच्या बाजूने निकाल दिले.

इक्विटास स्माल फायनान्स बँकेच्या लिस्टिंगची योजना आहे.

जर जेट एअरवेजच्या कर्जाचे शेअर्स मध्ये रूपांतर करायचा निर्णय झाला तर SBIचा त्यात १५% स्टेक असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५५९२ NSE निर्देशांक निफ्टी १०६५२ बँक निफ्टी २६५७३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

3 thoughts on “आजचं मार्केट – २९ जानेवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.