Monthly Archives: January 2019

आजचं मार्केट – १७ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ६ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १७ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.९५ प्रती बॅरल ते US $६१.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ७१.११ ते US $१=Rs ७१.३७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.१० होता.

आजही मार्केटची स्थिती दोलायमान होती. कारण HUL आणि रिलायन्स यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल मार्केट्ची वेळ संपल्यानंतर येणार होते. खरे पाहता आज विदेशी मार्केट्सची भीती थोडी कमी झाली होती. गोल्डमन सॅक्स आणि बँक ऑफ अमेरिका यांचे निकाल चांगले आल्यामुळे USA मधील मार्केट्स तेजीत होती. UK मध्ये पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला नाही त्यामुळे थेरेसा मे यांचे डळमळीत झालेले सिंहासन स्थिर झाले. चीनने ओपन मार्केट ऑपरेशन्स करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या समस्याच आपल्याला सावरता आल्या नाहीत असे म्हणावेसे वाटते.

RBI ने ECBचे (एक्स्टर्नल कमर्शियल बॉरोइंग) नियम सोपे केले. याचा फायदा हौसिंग फायनान्स कंपन्यांना होईल. उदा LIC हौसिंग, इंडियाबुल्स हाऊसिंग.

प्रमोटरचा स्टेक कमी केला पाहिजे या संदर्भात कोटक महिंद्रा बँकेची आज हायकोर्टात तारीख होती. पण आश्चर्य म्हणजे RBI ने कोर्टाकडे वेळ वाढवून द्या अशी मागणी केली. त्यामुळे आजची कारवाई टळली. पुढील तारीख १२ मार्च २०१९ ठरली. या सर्व घडामोडींचा ट्रेडर्सने असा अर्थ घेतला की हे प्रकरण कोटकच्या बाजूने झुकते आहे. त्यामुळे या शेअरमध्ये अचानक तेजी आली.

स्वाईन फ्ल्यूची साथ असल्यामुळे लॅब कंपन्यांना फायदा होईल अशा अपेक्षेने लाल पाथ लॅब हा शेअर Rs ५० ने वाढला.
जेट एअरवेजचा शेअर हल्ली तेजी मंदीच्या चक्रात अडकलेला असतो. काल जेट एअरवेजच्या विरोधात बातमी होती तर आज मात्र जेट एअरवेजचे CEO नरेश गोयल यांनी स्टेट बँकेला सांगितले की मी कंपनीमध्ये Rs ७०० कोटीची गुंतवणूक करायला तयार आहे पण माझा स्टेक २५% पेक्षा कमी होता कामा नये. आणि प्रमोटर्स स्वतःचे शेअर्स तारण ठेवायला तयार आहेत. जर हे शक्य नसेल तर मी एकही रुपया जास्त गुंतवणूक करणार नाही किंवा माझे शेअर्स तारण म्हणून ठेवणार नाही. त्यामुळे सकाळी मंदीत असलेला शेअर दुपारी चांगलाच तेजीत आला.

माईंड ट्रीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला. चौथ्या तिमाहीसाठी गायडन्स चांगला दिल्यामुळे शेअरमध्ये तेजी आली.

फेडरल बँक. फाईव्ह पैसा.कॉम, मास्टेक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. मोतीलाल ओसवालचे तिसर्या तिमाहीचे निकाल खराब आले. L &T TECH सर्व्हिसेस चा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

शक्ती पम्प या कंपनीच्या प्रमुख प्लॅन्टमधील संप मिटल्यामुळे सर्वसाधारण रित्या काम सुरु झाले त्यामुळे शेअर वाढला.
मार्केटची वेळ संपल्यानंतर HUL आणि रिलायन्स चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले.

HUL चे PAT Rs १४४४ कोटी, नेट सेल्स Rs ९५५८ कोटी झाले .नेट सेल्स १३% ने तर व्हॉल्युम ग्रोथ १०% ने वाढली. EBITDA मार्जिन २१.४% राहिले.

RIL चा कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू Rs १५६००० कोटी तर प्रॉफिट Rs १०२५१ कोटी झाले.( ही प्रॉफिटमध्ये ७.७% ग्रोथ आहे).Rs १०००० कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट मिळवणारी रिलायन्स ही भारतातील पहिली कंपनी आहे. EBITDA Rs २१३१७ कोटी तर मार्जिन १३.६% होते. GRM US $ ८.८० BBL होते.

रिलायन्स जिओचा नफा Rs ८३१ कोटी तर रेव्हेन्यू Rs १०३८३ कोटी, EBITDA Rs Rs ४०५३ कोटी (मार्जिन ३९%) होती. रिलायन्स जिओने २८ कोटी सब्सक्राइबर जोडले. ARPU १३० होते.

रिलायन्सच्या रिटेल डिव्हिजनचा निकालही चांगला आला.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३७४ NSE निर्देशांक निफ्टी १०९०५ बँक निफ्टी २७५२८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १६ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १६ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.५१ प्रती बॅरल ते US $ ६०.६६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs७०.९७ ते US $१=Rs ७१.२३ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.९६ होता.

UK मध्ये ब्रेक्झिट डील रद्द झाले. डील च्या विरोधात ४३२ आणि डीलच्या बाजूने २०२ मते पडली.

आज रुपयाने US $१=Rs ७१ चा स्तर पार केला. आज मार्केटमध्ये अस्थिरता खूप होती. बुल्स आणि बेअर्सच्या लढाईत बेअर्सची सरशी झाली. मार्केट मंदीतच बंद झाले . पण नेहेमी क्लोजिंग चे जे आकडे येतात ती शेवटच्या अर्ध्या तासाची सरासरी असते. त्यामुळे किंचितशी तेजीची किनार आली एवढेच !

IDFC फर्स्ट बँकेचे BSE आणि NSE वर लिस्टिंग झाले.

सरकारने आसाममधील नुमालीगढ रिफायनरीच्या विस्तार योजनेला मंजुरी दिली. या विस्तार योजनेसाठी Rs २२००० कोटी खर्च करणार आहे. यामध्ये BPCL चाहिस्सा ६१.६५% आहे. यामुळे BPCL ला फायदा होईल . BPCL Rs १४ प्रति शेअर लाभांश देण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये भारतात आयर्न ओअरची आयात खूप वाढली. मागणीच्या ६०% आयात होत आहे. भारताला डंपिंग ग्राउंड बनवले जात आहे. म्हणून सरकार आयर्न ओअर आणि अल्युमिनियमवर इम्पोर्ट ड्युटी वाढवणार आहे. आणि एक्स्पोर्ट ड्युटी कमी करणार आहे.

चीन मध्ये स्थिती सुधारते आहे असे म्हटल्यावर आज ग्राफाइट इंडिया आणि हिंदुस्थान ग्राफाइट हे शेअर्स तेजीत होते.
स्वस्त घर योजने खाली २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी सरकारने एक योजना आणली होती. ही योजना मार्च २०१९ अखेर संपत आहे. या योजनेखाली देण्यात येणारी सूट पुढेही चालू राहील असे सरकारने सांगितले. मुंबई, कोलकाता दिल्ली मद्रास या चार शहरात ३० SQUARE मीटरचे घर देत असाल तर यातुन कंपन्यांना जो नफा होईल त्यावर आयकर द्यावा लागणार नाही.

DCB चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. HT मीडियाचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला नाही.

DR रेड्डीज च्या तुतिकोरिन प्लांटमध्ये USFDA ने ४ त्रुटी दाखवल्या.

इंडियाबुल्स इंटिग्रेटेडला विमा व्यवसाय करण्यासाठी IRDA कडून परवानगी मिळाली

विशेष लक्षवेधी

 • उद्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HUL या मोठ्या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल उद्या जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३२१ NSE निर्देशांक निफ्टी १०८९० बँक निफ्टी २७४८३ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १५ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५९.७२ प्रती बॅरल ते US $ ५९.८० प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१=Rs ७०.९२ ते US $१= Rs ७१.१४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.५२ होता.

आज मकर संक्रांतीनिमित्त सर्व वाचकांना शुभेच्छा ! आज प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरु झाला. या महाकुंभाचे स्वागत म्हणून की काय बुल्सनी जोरदार चढाई केली. आणि बेअर्सचा पाडाव केला. ४०० पाईंट सेन्सेक्स तेजीत राहिला.

ओपेक आणि रशियाने क्रूडचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला. टॅरिफ वॉर चा ताण कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती यावी या उद्देशाने चीन सरकारने बर्याच योजना जाहीर केल्या. आणि त्यातच GDP ग्रोथ कमी IIP ग्रोथ कमी आणि महागाई सुद्धा कमी अशा वातावरणात १९ फेब्रुवारीच्या RBI च्या मीटिंगमध्ये रेट कट होण्याची शक्यता आहे ही सर्व कारणे मार्केटच्या तेजीमागे दडलेली आहेत असे वाटते. .

उद्या UK पंतप्रधानांच्या ब्रेक्झिट डीलच्या बाजूने मतदान झाले पाहिजे तरच डील संमत होईल अन्यथा UK युरोपियन युनियन मधून बाहेर पडेल आणि त्यामुळे खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल

भारती एअरटेल ही TELKOM केनया चे अधिग्रहण करेल यामुळे ईस्ट आफ्रिकन टेलिकॉम मार्केटमध्ये भारतीची स्थिती मजबूत होईल. एअरटेल आफ्रिकाचे व्हॅल्युएशन सुधारेल आणि याचा उपयोग मे जून २०१९ मध्ये येणाऱ्या IPO साठी होईल.
विप्रोने बोनस आणि लाभांशावर विचार करण्यासाठी १८/०१/ २०१९ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग घेण्याचे ठरवले आहे.

सरकारने जी खतांसाठी सबसिडी दिली होती तिचा विनियोग गेल्या वर्षीची बाकी देण्यासाठी झाला. म्हणून सरकार पुन्हा Rs ३०००० कोटी सबसिडी देणार आहे. २०१९ मध्ये सबसिडीची रक्कम Rs १००००० कोटी होण्याची शक्यता आहे.म्हणून आज सर्व खताशी संबंधित शेअर्स वाढत होते.

सरकार या वर्षी IRFC,( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन ) RVNL ( रेल विकास निगम लिमिटेड) आणि माझगाव डॉक हे IPO आणणार आहे. यातून सरकारला Rs १५०० कोटी मिळतील.

कोणतीही घटना घडली तरी मार्केट त्यातून आपल्याला काय फायदा आहे हे शोधते. कुंभमेळ्यामुळे सिंटेक्स प्लास्टिक आणि वेलस्पन इंडिया यांना फायदा होईल.

ओपन सेल LED पॅनलवर इम्पोर्ट ड्युटी कमी होईल. याचा फायदा डिक्सन टेक्नॉलॉजीला होईल.

सॅटिन क्रेडिट केअरच्या सॅटिन फिनसर्व या युनिटला NBFC म्हणून मान्यता मिळाली. पण सध्या लोकांनी IL & FS मुळे धसका घेतला आहे. त्यामुळे शेअर पडला.

वकरांगीनी नेक्स्ट जेनची ३३०० सेंटर्स उघडली. ही ऑउटलेट्स २० राज्यांमध्ये आणि ३४० जिल्ह्यांमध्ये उघडली त्यामुळे शेअर वाढला.

ट्रायडंट, झी एंटरटेनमेंट, MCX या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. ट्रायडंट ने Rs १.२० प्रती शेअर लाभांश जाहीर केला.

TVS मोटर्सनी आणि बजाज ऑटोने TWO व्हीलरच्या किमती वाढवल्या तर हिरो मोटोने किमती कमी केल्या.

CLSA ने रिलायन्सचे टार्गेट Rs १५०० दिले. आणि रिटेल ग्रोथ आणि रिलायन्स जिओ यांची प्रगती चांगली होत असल्यामुळे रिलायन्स चे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले येतील असे सांगितले. यामुळे रिलायन्सची भक्कम साथ आजच्या तेजीच्या मार्केटला मिळाली

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३१८ NSE निर्देशांक निफ्टी १०८८६ बँक निफ्टी २७४०० वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १४ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १४ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५९.४० प्रती बॅरल ते US $ ५९.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.६३ ते US $१=Rs ७०.८७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.५७ होता. UK च्या संसदेमध्ये उद्या ब्रेक्झिट करारावर मतदान होईल. त्यामुळे मार्केट मध्ये थोडी अस्वस्थता होती.

IIP नोव्हेंबर २०१८ साठी ०.५ होता. हा निर्देशांक औद्योगिक उत्पादनातील वाढ जवळ जवळ ठप्प झाली आहे असे दर्शवतो.

आज डिसेंबर २०१८ या महिन्यासाठी WPI होलसेल प्राईस इंडेक्सचे आकडे आले. WPI ३.८% झाला ( नोव्हेम्बरमध्ये ४.६४) होता.

डिसेंबर २०१९ या महिन्यासाठीCPI (कन्झ्युमर प्राईस इंडेक्स) २.१९ %(२.३३ नोव्हेंबर २०१८ साठी) होता. हा गेल्या १८ महिन्यातील किमान CPI आहे. CPI आणि WPI हे महागाईचा स्तर दर्शवणारे निर्देशांक कमी झाल्याने RBI आपल्या फेब्रुवारीच्या वित्तीय धोरणात रेट कट करेल अशी मार्केटला आशा निर्माण झाली

CYIENT या कंपनीची १७ जानेवारीला शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

प्रकाश इंडस्ट्रीजचा तिसर्या तिमाहीचा निकाल चांगला आला.

जम्मू आणि काश्मीर बँकेचा तिसर्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आला.

D -MART या कंपनीचा निकाल अपेक्षेनुसार आला नाही. त्यामुळे शेअर पडला.

१ फेब्रुवारी २०१९ रोजी सरकार आपले अंतरीम अंदाजपत्रक संसदेत सादर करेल. हे वर्तमान सरकारच्या ५ वर्षाच्या कालावधीतील शेवटचे अंदाजपत्रक असेल. २०१९ होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार करता सरकार या अंदाजपत्रकात निवडणुकीच्या वातावरणाला साजेश्या सवलतींचा वर्षाव करेल असे वाटते. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या आणि पगारदार करदात्यांसाठी या अंदाजपत्रकात आयकराच्या बाबतीत काही सवलती जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जेट एअरवेजचे CEO नरेश गोयल अखेरीस व्यवस्थापनावरचे आपले नियंत्रण सोडायला तयार झाले आहेत . त्यांचा मुलगा निवान यांच्या हाती कंपनीची सूत्रे येतील. नरेश गोयल यांच्या या निर्णयानंतर एतिहाद आणि कर्ज देणार्या बँकांनी जेट एअरवेजला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली. यामुळे जेट एअरवेजचा शेअर वाढला.

येस बँकेच्या CEO पदासाठी आता RAVNEET GILL याचे नाव घेतले जात आहे. एस बँकेच्या नॉनएक्झ्युटिव्ह चेअरमनपदी ब्रम्हदत्त याची नेमणूक झाली.

ऍक्सिस बँकेचे चीफ क्रेडिट ऑफिसर म्हणून महेश्वरी यांची नेमणूक झाली.

वेध उद्याचा

१७ जानेवारी २०१९ ला रिलायन्स इंडस्ट्रीज आणि HUL यांचे तर १८ जानेवारी २०१९ ला विप्रो आणि १९जानेवारी २०१९ ला HDFC बँक यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८५३ NSE निर्देशांक निफ्टी १०७३७ बँक निफ्टी २७२४८ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ११ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – ११ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.५० प्रती बॅरल ते US $६१.५० प्रति बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.३७ ते US १= Rs ७०.५७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.२० होता

काल संध्याकाळी मार्केटची वेळ संपल्यानंतर लागलेल्या TCS च्या निकालामुळे मार्केट थोडे नाराज झाले होते. आज मार्केट संपल्यानंतर बहुचर्चीत इन्फोसिसच्या शेअर BUY बॅकची घोषणा झाली हा BUY बॅक टेंडर ऑफर पद्धतीने नसून ओपन मार्केट ऑपरेशन पद्धतीने येणार आहे. दोन्हीही पद्धतीच्या BUY बॅक आणि अन्य कॉर्पोरेट एक्शन विषयी माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात सविस्तर आणि खुलासेवार माहिती दिली आहे. इन्फोसिसचे हे निकाल गुंतवणूकदार आणि ट्रेडर्सच्या पसंतीला उतरले नाहीत. आज TCS मुळे मार्केट मंदीत होते सोमवारी इन्फोसिस च्या निकालाची प्रतिक्रिया म्हणून मार्केट पुन्हा पडण्याची शक्यता आहे.

सरकार आपला SUUTI मधील ऍक्सिस बँक आणि ITC मधील स्टेक विकण्याचा विचार करत आहे.

सरकारने असे जाहीर केले की GST अंतर्गत रजिस्टर्ड छोट्या उद्योगांना आणि व्यापाऱ्यांना स्वस्त दरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल ही सूट २% पर्यंत असेल. महिला छोट्या उद्योजक आणि व्यापाऱ्यांना जास्त सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. या उद्योगांच्या आणि व्यापार्याच्या वार्षिक टर्नओव्हरशी निगडीत Rs ५ लाख ते Rs १० लाख अपघात विमा फुकट उपलब्ध करून दिला जाईल. तसेच छोट्या उद्योजकांना आणि व्यापाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केली जाईल.

विशेष लक्षवेधी

आज कर्नाटक बॅंकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. :- प्रॉफिट १४० कोटी, NII Rs ४८८ कोटी, प्रोव्हिजन Rs २०९ कोटी, ग्रॉस NPA ४.४५%, नेट NPA ३%. कर्नाटक बँकेचे निकाल समाधानकारक होते असे म्हणता येईल.

आज इन्फोसिस या IT क्षेत्रातल्या दिग्गज कंपनीने आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ३६०९ कोटी ( *Rs ४११५ कोटी) उत्पन्न Rs २१४०० कोटी ( Rs २११०५ कोटी) EBIT मार्जिन २२.६% ( २३.६%) , EBIT Rs ४८३० कोटी. ऍट्रिशन रेट १९.९% ( पूर्वी २२.२% ) US $ उत्पन्न US $ २९८ कोटी ( Rs २९५ कोटी ) रेव्हेन्यू गायडन्स ८.५ % ते ९% एबीत मार्जिन गायडन्स २२% ते २४% * कंसातील आकडे अपेक्षित आकडे आहेत. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.  कंपनी Rs ८०० प्रती शेअर या भावाने Rs ८२६० कोटी BUY बॅक साठी खर्च करणार. पण हा ओपनमार्केट ऑपरेशन BUY BACK असेल.

एव्हररेडी चे प्रमोटर्स मेजर यांच्याकडे कंपनीचा ४५% स्टेक आहे. ते हा स्टेक विकणार आहेत. म्हणून शुक्रवार सकाळी शेअर १८% वाढला होता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६००९ NSE निर्देशांक निफ्टी १०७९५ आणि बँक निफ्टी २७४५३ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १० जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट – १० जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ६०.७६ प्रती बॅरल ते US $ ६०.९१ प्रती बॅरल तर रुपया US $१=Rs ७०.३७ ते US $१= Rs ७०.६१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.१२ होते.

आज बँक निफ्टीची एक्स्पायरी होती. या एक्स्पायरीला प्रॉफिट बुकिंग आढळले .

सौदी अरेबियाने क्रूडचे उत्पादन कमी केले. त्यामुळे क्रूडचे दर वाढले.

एल आय सी ने एशियन पेंटमधील आपला स्टेक कमी केला.

मारुतीने उत्पादन खर्च वाढल्यामुळे आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमतीत Rs १०००० पर्यंत वाढ केली. ही वाढ १०/०१/२०१९ पासून अमलात आली.

गोवा कार्बन ही कंपनी २०१८-१९ या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत फायद्यातून तोट्यात गेली. कंपनीचे विलासपूर आणि पारादीप हे दोन प्लांट जवळजवळ दीड महिना बंद होते. कंपनीला Rs ५ कोटी तोटा झाला. आणि उत्पन्न Rs ९४ कोटी झाले.

आज बंधन बँकेने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. प्रॉफिट Rs ३३१ कोटी झाला. नेट इंटरेस्ट इन्कम Rs ११३४ कोटी झाले. लोनमध्ये ४६.१% वाढ झाली. नेट NPA ०.७०% तर ग्रोस NPA २.४% होते. बँकेने IL & FS साठी Rs ३८५ कोटी प्रोव्हिजन केली. कसा रेशियो ४१.४% होता.

टी सी एस या IT क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीचा निकाल नेहेमीच सर्वसाधारण असतो. प्रॉफिट Rs ८१०५ कोटी(२४.१%) तर एकूण उत्पन्न Rs ३७३३८ कोटी झाले.अन्य उत्पन्न Rs ११६० कोटी झाले. कॉन्स्टन्ट करन्सी ग्रोथ १.८% होती. ऑपरेटिंग मार्जिन २५.६% होते. EBIT Rs ९५६४ कोटी झाले. ऍट्रीशन रेट ११.२% होता. कंपनीने नवीन ६८२७ कर्मचारी नेमले. कंपनीने Rs ४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. कंपनीजवळ Rs ८६८२ कोटी कॅश आहे

BSE ला सेबीने विकली फ्युचर काँट्रॅक्टस आणि बँकिंग ऑप्शन साठी मंजूर दिली.

चीनमध्ये मागणी कमी झाल्यामुळे टाटा मोटर्स आपला सेल्स आणि रिसर्च फोर्समधील कर्मचारी वर्ग कमी करणार आहे.
ऊर्जा मंत्रालय SJVN आणि NTPC यांच्यामधील डीलच्या PMO कडून येणाऱ्या मंजुरीची वाट पाहात आहे. ती मंजुरी लवकरच मिळेल असे अपेक्षित आहे.

GST रजिस्ट्रेशनसाठीची किमान वार्षिक टर्नओव्हरची मर्यादा Rs २० लाखावरून Rs ४० लाख केली. कॉम्पोझिशन स्कीममध्ये सामील होण्याची वार्षिक टर्नओव्हरची मर्यादा Rs १ कोटींवरून Rs १.५ कोटी केली. कम्पोझिशन स्कीमखाली येणाऱ्या सर्व करदात्यांना दर तिमाहीला GST कर भरावा लागेल पण रिटर्न मात्र वर्षातून एकदाच फाईल करावा लागेल. केरळमध्ये आपदा सेस दोन वर्षांसाठी १ % लावला. हा सेस IGST वर लागेल.

रिअल्टी क्षेत्रात GST कमी करण्यावर शिफारस करण्यासाठी एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्स ची स्थापना केली. GST नियमातील हे बदल १ एप्रिल २०१९ पासून अमलात येतील.

SBI Rs २०००० कोटींचा QIP इशू आणणार आहे.

संसदेचे अंदाजपत्रकीय अधिवेशन ३१ जानेवारी २०१९ ला सुरु होऊन १३ फेब्रुवारी २०१९ पर्यंत चालेल.

वेध उद्याचा

 • उद्या TCS च्या शेअरवर तिसऱ्या तिमाहीच्या निकालाचा काय परिणाम होतो त्यावर लक्ष ठेवावे लागेल.
 • उद्या इन्फोसिस, कर्नाटक बँक यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल येतील. या शेअर्सकडे मार्केटचे लक्ष असेल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१०६ NSE निर्देशांक निफ्टी १०८२१ बँक निफ्टी २७५२८ वर बंद झाले

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट –  ९ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ९ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५९.३२ प्रती बॅरल ते US $ ५९.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.२२ ते US $१=Rs ७०.५७ होते. US $ निर्देशांक ९५.७४ होता. VIX १६.०७ होते.

आज मार्केट ‘ROLLER COASTER RIDE’ सुरु आहे असे वाटावे या पद्धतीने सुरु होते. किंवा मराठीत सांगायचे तर श्रावणातला पाऊस किंवा जत्रेतले वर खाली होणारे पाळणे. त्यामुळे बर्याच जणांचे स्टॉप लॉस हिट झाले असतील आणि काही जणांना स्वस्तात शेअर्स मिळाले असतील.

आज तिसऱ्या दिवशीसुद्धा USA आणि चीन यांच्यामध्ये बोलणी सुरु होती. खरे पाहता दोनच दिवस बोलणी करण्यासाठी ठरवले होते. मार्केट संपता संपता बोलणी पूर्ण झाली असे समजले पण यातून काय निष्पन्न झाले ते मात्र कळू शकले नाही. यावर मार्केट उद्या प्रतिक्रिया देईल.

अंडर कन्स्ट्रक्शनच्या घरांवरील GST १२% वरून ५% करावा पण इनपुट क्रेडिट देऊ नये. हा फायदा घर खरेदी करणाऱ्याला मिळाला पाहिजे असे सरकारचे म्हणणे आहे.

TWO व्हिलर उत्पादकांनी म्हणजेच TVS, बजाज, हिरोमोटो यांनी GST २८% पेक्षा कमी करावा अशी विनंती केली आहे कारण TWO व्हीलर ही आता चैन उरलेली नाही

चीन ऑटो आणि होम अप्लायन्सेस मधील आपली गुंतवणूक वाढवणार आहे.

सरकारने आज प्रिंट मेडियातील जाहिरातींच्या दरात २५%ने वाढ केली.यामुळे छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्रांचा फायदा होईल. त्यामुळे प्रिंट मेडिया क्षेत्रातील शेअर्स तेजीत होते. उदा :- H T मीडिया, D B कॉर्प, जागरण प्रकाशन, संदेश

DR रेड्डीज या कंपनीने त्यांच्या दुआडा युनिटच्या USFDA ने केलेल्या तपासणीच्या रिपोर्टला उत्तर पाठवले. कंपनी USA मधून ११३ औषधांच्या मंजुरीची वाट बघत आहे. कंपनी चीनमध्ये उत्पादन आणि विक्री यांच्यात वाढ करणार आहे.

NMDC ही मेटल उद्योगातील सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी Rs ९८ प्रती शेअर या भावाने १०,२०,४० ८१५ शेअर्स BUY BACK करण्यासाठी Rs १००० कोटी खर्च करेल. या कंपनीत सरकारचा स्टेक ७२.४३% आहे. या BUY BACK मध्ये कंपनी आपले ३.२३% शेअर खरेदी करेल. रेकॉर्ड डेट १८ जानेवारी २०१९ ही या BUY BACK साठी ठरवली आहे.

OBC ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँक Rs ६३६ कोटींच्या NPA च्या विक्रीसाठी बोली मागवणार आहे.

विशेष लक्षवेधी

 • आज इंडस इंड या खाजगी क्षेत्रातील बँकेच्या तिसर्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. बँकेला प्रॉफिट Rs ९८५ कोटी. उत्पन्न Rs २२८८ कोटी, NPA साठी प्रोव्हिजन Rs ६०६ कोटी ( यातील Rs २५५ कोटी IL &FS साठी केली आहे). ग्रॉस NPA आणि नेट NPA अनुक्रमे १.१३% आणि ०.५९% आहे. बँकेने सांगितले की भारत फायनान्सियलचे बँकेबरोबर मर्जर फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होईल.
 • बजाज कॉर्पचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर झाला. प्रॉफिट Rs ६० कोटी, विक्री Rs २३० कोटी, आणि EBITDA Rs ७२ कोटी झाला. कंपनीने Rs १४ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
 • टाटा स्टीलच्या शेअरचा भाव ५२ वीक लो झाला. युरोपमध्ये उत्पादन १२.७% ने कमी झाले म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०१८ या कालावधीत २.३३लाख टन उत्पादन कमी झाले .याचा परिणाम कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालावर होईल.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६२१२ NSE निर्देशांक निफ्टी १०८५५ बँक निफ्टी २७७२० वर होते.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट –  ८ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ७ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ८ जानेवारी २०१९

US $ ५७.२८ प्रती बॅरल ते US $ ५७.८१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ६९.८३ ते US १= Rs ७०.१७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.९५ होता.

आज मार्केट बर्याच प्रमाणात स्थिर होते. रुपयांची घसरण चालू होती क्रूडचा भाव घसरत असतानाही रुपया कां ढासळतो आहे याची उकल होणे कठीण झाले आहे. RBI OPM( ओपन मार्केट ऑपरेशन्स) च्या सहायाने रुपया सावरण्याचा प्रयत्न करीत आहे.

AAI (एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ने १२५ विमानतळांवर प्लास्टिक बॅन आणला आहे. विमानतळाच्या आवारात खाण्यास तयार असलेले अन्नपदार्थ पातळ प्लास्टिकच्या बॅगमध्ये, वेष्टनामध्ये विकण्यास मनाई केली. त्यामुळे आज पेपर शेअर्स तेजीत होते.

११ फेब्रुवारीपासून निफ्टी वीकली एक्स्पायरीची काँट्रॅक्टस चालू होतील. पहिली एक्स्पायरी १४ फेब्रुवारीला होईल.
बंधन बँकेचा गृह प्रवेश मार्केटला पटलेला नाही. १००० गृहफायनान्स शेअर्सला बंधन बँकेचे ५६८ शेअर्स हा रेशियो गृह फायनान्सच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. गृह फायनान्सचे व्हॅल्युएशन कमी केले आहे. हे आपल्याला दोघांचेही फायनान्सियल रेशियो पाहिले की समजते. बंधन बँकैचा P /E रेशियो ३८.२ तर गृह फायनान्सचा ५१.८ आहे P /बुक व्हॅल्यू बंधन बँकेचा ६.२ तर गृह फायनान्सचा १३.५ आहे आणि ROE बंधन बँकेचे २१.६ तर गृह फायनान्सचे २८.९ आहे.
साखर उद्योगाला इथेनॉलसाठी Rs १०,००० ते २०,००० कोटींचे पॅकेज देण्याची शक्यता आहे. सरकार ६% व्याजावर ५ वर्षांसाठी कर्ज देणार आहे.

अफोर्डेबल हौसिंग फंड सध्या Rs १०,००० कोटी आहे. अंतरिम अंदाजपत्रकामध्ये ह्याची रक्कम Rs १५००० कोटी करण्याची शक्यता आहे. या फंडातून पहिल्या वेळेला घर घेणाऱ्या लोकांना व्याजात सूट दिली जाते.

ल्युपिन एप्रिल-जून या तिमाहीत UK मध्ये ‘NOMUSCLE’ या नावाचे नवीन औषध मार्केटमध्ये आणेल. कंपनीला यासाठी UK रेग्युलेटरची परवानगी मिळाली आहे.

वेदांताचा तुतिकोरीन प्लांट पुन्हा सुरु करण्याच्या NGT च्या आदेशाविरुद्ध स्टे द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. तामिळनाडू राज्य सरकारने या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोटात अर्ज केला होता.

झायडस या कंपनीला त्यांच्या डिप्रेशनवरील ‘ARIPIPRAZOLE’ या औषधाला USFDA ची मंजुरी मिळाली. या औषधाचे उत्पादन कंपनीच्या ‘मोरेय्या’ युनिटमध्ये केले जाईल.

DR रेड्डीजच्या विशाखापट्टणम SEZ युनिटची USFDA कडून तपासणी चालू झाली आहे.

L & T च्या BUY बॅक ला अजून सेबीकडून परवानगी मिळाली नाही. सरकार SUUTI(स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफयुनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) मधील शेअर्स BUY BACK मध्ये देणार की नाही हे अजून समजले नाही जर सरकारने BUY बॅकमध्ये शेअर्स दिले तर पब्लिक साठी असलेला एक्सेप्टन्स रेशियो कमी होईल. त्यामुळे ज्या लोकांनी BUY बॅक मध्ये शेअर्स देता येतील म्हणून शेअर्स खरेदी केले होते ते लोक कंटाळून शेअर्स विकू लागले आहेत.

महिंद्रा आणि महिंद्रा वर फियाट कंपनीने USA येथील कोर्टात दावा केला आहे. त्यांनी ‘JEEP’ मॉडेलची नक्कल केली असा त्यांच्यावर आरोप आहे. हा दावा कोर्टाने दाखल करून घेतला.

विशेष लक्षवेधी

आज टाटा एलेक्सीचा निकाल आला. निकाल ठीक लागला पण अपेक्षेच्या मानाने म्हणजे Rs ८२ कोटींऐवजी Rs ६५ कोटी प्रॉफिट झाले.

PTC इंडिया फायनान्सियल सर्व्हिसेसला SBI ने Rs १४०० कोटींची क्रेडिट फॅसिलिटी दिली. त्यामुळे शेअर वाढला.

पावसाळा आला वनस्पती वाढीच्या दृष्टीने वातावरण चांगले झाले की सगळी झाडे वाढतात टवटवीत दिसू लागतात. पण गवत कोणते आणि औषधी वनस्पती कोणत्या हे आपल्याला शोधता आले पाहिजे. आज पेपर उत्पादक कंपन्यांचे शेअर्स वाढत होते अशावेळी पेपर कंपन्यांचे शेअर कोणते आणि कोणती कंपनी कोणत्या प्रकारचा पेपर तयार करते हे माहीत असले पाहिजे आणि त्याच बरोबर स्वस्त काय आणि महाग काय ? हे ओळखता आले पाहिजे त्यासाठी फायनान्सियल रेशियोज बघावे लागतात. मी तुम्हाला काही कंपन्यांचे फायनान्सियल रेशियोज देत आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायला शिका.

कंपनीचे नाव                      CMP ( Rs)        P /E रेशियो               P /B रेशियो 
शेषशायी  पेपर                    १०४५                  ८.६७                           १.७५
J K पेपर                             १४८                    ७.६३                           १.४७ 
वेस्टकोस्ट पेपर                   ३०३                    ६.८२                           २.०४
स्टार पेपर                           १५३                    ५.४७                           ०.५९
इंटरनॅशनल पेपर                 ४५०                   १२.६८                          २.४५ 
TNPL                                २४२                    १८.३८                         १.०५
ओरिएंट पेपर                      ४३.६०                १२.३९                         ०.७०


या पद्धतीने आपण सर्व कंपन्यांचा अभ्यास करावा

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९८० NSE निर्देशांक १०८०२ तर बँक निफ्टी २७५०९ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट –  ७ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ७ जानेवारी २०१९

आज क्रूड US $ ५७.६६ प्रती बॅरल ते US $५८.०७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US १=Rs ६९.३५ ते US $१= Rs ६९.८५ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९५.९८ होता.

आज मार्केटचा मूड चांगला होता. ऑस्ट्रेलिया मध्ये असलेली क्रिकेटची कसोटी मालिका भारताने जिंकली. त्यामुळे दुधात साखर पडली. निफ्टी मध्ये हॅमर पॅटर्न तयार झाला होता ट्रम्प साहेबानी ट्रेड वॉरचे कोडे उलगडत आणले. फेडच्या पॉवेलनी थोडी माघार घेतली. आता USA मध्ये दरवाढ करणे बंद होऊन कदाचित दर कमी करण्याची शक्यता निर्माण झाली. पण त्याच वेळेला त्यांनी फार्मा कंपन्यांवर आपली नजर वळवली. याचा पहिला धक्का ग्लेनमार्क फार्माला मिळाला. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यामधील प्रत्यक्ष कर वसुली १४.१% ने वाढली.

ASM च्या यादीमधून MERCK आणि NELCO या कंपन्या बाहेर पडतील.

कमोडिटी मार्केट सकाळी ९ वाजता उघडायला सुरुवात झाली.

क्लास EIGHT ट्रकची विक्री USA मध्ये कमी झाली. त्यामुळे भारत फोर्जचा शेअर पडला.

शेतकऱ्यांना DBT योजनेतून कॅश ट्रान्स्फर केली जाईल याचा बॉण्ड यिल्डवर परिणाम होईल.

१४ ऑइल ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली ऑइल इंडिया आणि ONGC यांना उत्पादन वाढवण्यास सांगितले. यामुळे हे शेअर्स वाढले.

NHPC चे चमेरा युनिट (३) हे ६ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान बंद राहील. .

घरडा केमिकल्स मधील ५७.७% स्टेक घेण्यासाठी गोदरेज अग्रोव्हेट आणि युपीएल यांनी बिडिंग केले आहे.

९ तारखेला येस बँक आपल्या MD &CEO साठी नावाची निवड करून RBI ला कळवेल. या शर्यतीत MAX लाईफ इन्शुअरन्स चे MD &CEO राजेश सूद आणि येस बँकेचे वर्तमान एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रजत मोंगा हे आघाडीवर आहेत.

जानेवारी १० २०१९ रोजी होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट आणि बिल्डिंग मटेरियल यांच्यावरील GST कमी होणार अशी बातमी आल्यामुळे रिअल्टी क्षेत्र आणि सिरॅमिक्स बनवणारे शेअर्स तेजीत होते. त्यात नीटको टाईल्स, कजारिया सिरॅमिक्स, सेरा सॅनिटरीवेअर, ओरिएंट बेल, सोमानी, मुरुडेश्वर आदी शेअर्स तेजीत होते. या GST च्या बैठकीत कॅलॅमिटी कर फक्त केरळमध्ये २ वर्षांकरता लावला जाईल.

UK मधील JLR ची विक्री ६.९% वाढली विक्री ६६२५ युनिट झाली.

RBI च्या गव्हर्नरनी MSME असोसिएशन्स बरोबर बैठक केली. RBI ने सांगितले की RBI लिक्विडिटीविषयी चिंतीत आहे. अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी लिक्विडीटी असणे आवश्यक आहे. पण ही लिक्विडीटी जरुरीपेक्षा जास्त होणार नाही याची RBI काळजी घेईल. RBI ने असेही सांगितले की त्यांची सहकारी बँकांबरोबरही बोलणी चालू आहेत. तसेच राज्य सरकारांनी कर्ज माफी करण्याआधी त्यांच्या राजस्वचा विचार करणे आवश्यक आहे.

RBI ने MSME युनिटला रिस्ट्रक्चरिंग पॅकेज मंजूर करताना ते MSME युनिट व्हायेबल आहे कां ? याचा विचार करणे जरुरीचे आहे.असे बँकांना सांगितले.

उद्या RBI गव्हर्नर NBFC बरोबर बैठक करणार आहेत. तेव्हा NBFC चे प्रश्न चर्चेस घेतले जातील.

RBI सरकारला Rs ४०००० कोटी अंतरिम लाभांश देणार आहे अशी बातमी आहे.

विशेष लक्षवेधी

बंधन बँक गृह फायनान्स ही कंपनी ALL शेअर स्वॅपपध्दतीने घेणार आहे. या डीलमुळे बंधन बँकेच्या प्रमोटर्सचा स्टेक ८२% वरून ६१% वर येणार आहे. मर्ज्ड एंटिटीमध्ये १५% HDFC चा स्टेक असेल. गृह फायनान्सचे १००० शेअर असतील तर बंधन बँकेचे ५६८ शेअर्स मिळतील. HDFC चा गृह फायनान्समध्ये ५७.८६% स्टेक आहे तो मर्जरनंतर १४.९६% एवढा होईल. ही दोघांच्याही दृष्टीने ‘विन विन’ सिच्युएशन आहे. बंधन बँक स्थापन झाल्यानंतर ३ वर्षांच्या आत प्रमोटर्सचा स्टेक ४०% पर्यंत कमी करायला हवा होता. तो कमी केला नव्हता म्हणून त्यांना नवीन शाखा उघडण्यासाठी परवानगी नव्हती आणि त्याचबरोबर बँकेच्या MD &CEO चे रेम्यूनरेशन फ्रीझ केले जाईल असे RBI ने कळवले होते. केवळ प्रमोटर्सचा स्टेक कमी करण्यासाठी हे अक्विझिशन केले आहे असे समजते. पण आज मार्केटमध्ये दोन्हीही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती पडत होत्या. यावरून मार्केटला हे मर्जर फारसे पसंत पडले नाही असे वाटते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८५० NSE निर्देशांक १०७७१ तर बँक निफ्टी २७३०४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट –  ४ जानेवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

तुमच्यापकी कोणी नवीन वर्षात काही नवीन शिकायचं ठरवलं असेल तर आपला पुढचा कोर्स २६-२७ जानेवारीला आहे. हा कोर्से १० जणांसाठी आहे आणि आता फक्त ८ सीट्स उरलेल्या आहेत .  तुम्हाला अधिक माहिती या ब्लॉग पोस्ट मध्ये मिळेल 

आजचं मार्केट –  ४ जानेवारी २०१९

आज क्रूड US $५६.०७ प्रती बॅरल ते US $ ५७.०१ या दरम्यान तर रुपया US $ १=Rs ६९.७८ ते US $१=Rs ६९.९१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.३६ होता.

USA च्या संसदेने सरकारी खर्चाला मंजुरी दिल्यामुळे गेले दोन आठवडे चालू असलेले ‘शट डाऊन’ संपुष्टात आले. चीनच्या सेंट्रल बँकेने CRR १% ने कमी केला. यामुळे सर्व मेटल्सशी संबंधित शेअर्स वाढले. उदा :- हिंदाल्को, JSW स्टील, टाटा स्टील आणि SAIL.

मंदी येण्याची चिन्हे दिसू लागली की प्रत्येक देश प्रयत्न करतो. हळू हळू बँका रुळावर येत आहेत. PCA आणि NPA विषयीचे नियम सोपे करावेत असा विचार चालू झाला आहे. अर्थव्यवस्थेत लिक्विडिटीचा पुरवठा वाढत आहे. यामुळे बँकांचे शेअर्स वाढले आणि गेला आठवडाभर मार्केट सातत्याने पडत असल्यामुळे थोडेसे ओव्हरसोल्ड अवस्थेत गेले होते. त्यामुळे दुपारनंतर मार्केटमध्ये सुधारणा झाली. आणि १५० पाईंट मार्केट तेजीत बंद झाले.

३ जानेवारी ते १२ जानेवारी पर्यंत NHPC चा दुलहस्ती प्लांट बंद राहील त्यामुळे शेअर पडला.

टाटा मोटर्सची USA मधील JLR ची विक्री २४% ने वाढली. टाटा मोटर्सचे डोमेस्टिक विक्रीचे आकडे खराब आले होते त्यामुळे शेअर पडला होता. नेहेमी असेच होते की टाटा मोटर्सचे विक्रीचे आकडे ४ ठिकाणाहून येतात. USA, चीन, युरोप आणि भारत. त्यातील काही ठिकाणचे आकडे चांगले तर काही आकडे खराब येतात आणि शेअरची किंमत आहे तेथेच राहते.

HAL या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला ‘तेजस’ या विमानाचे वेपनायझेशन करण्यासाठी मंजुरी मिळाली. सरकारने HAL ला Rs ४४९८ कोटी उभारण्यासाठी मंजुरी दिली

बँक ऑफ बरोडाच्या कर्मचारी युनियनने ७ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर केलेला संप मागे घेतला

एडेलवाईसच्या AMC ला (ऍसेट मॅनेजमेंट कंपनी) ETF आणण्याची परवानगी मिळाली.

RBI ने MSME च्या दिलेल्या कर्जाचे रिस्ट्रक्चरिंगचे नियम जातील असे सांगितले. याचा फायदा DCB आणि फेडरल बँकेला होईल.

सरकार सोन्याविषयीचे नवे धोरण जाहीर करणार आहे. जर हिशेबात न दाखवलेले सोने तुम्ही जाहीर केलेत तर त्यात करामध्ये सवलत मिळेल. पण याला ५ वर्षांचा लॉकइनपिरियड आहे. मंदिरे आणि संस्था यांना सुद्धा ही सवलत मिळेल. सरकार गोल्ड बँक स्थापन करेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल. जवळ जवळ ३००००टन सोने देशामध्ये असावे असा अंदाज आहे. पण त्याचा उपयोग उत्पादकता वाढवण्यासाठी होत नाही म्हणून सरकारची ही योजना आहे.
आता अशोक लेलँड विषयी थोडेसे या कंपनीचा शेअर गेले दोन महिने सतत पडत आहे. या कंपनी विषयी थोडीशी माहिती घेऊ या.

 1. सरकारने हेवी व्हेहिकल्स किती माल वाहून नेऊ शकतील याविषयीचे नियम बदलले. नव्या नियमाप्रमाणे आता या गाड्या २०% ते २५% लोड जास्त घेऊ शकतात. त्यामुळे नवीन गाड्यांसाठीची मागणी कमी झाली.
 2. कंपनीचे CEO विनोद दसारी यांनी १३ नोव्हेम्बर २०१८ ला राजीनामा दिला. दसारींचा राजीनामा ३१ मार्च २०१९ पासून अमलात येईल. त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होणार आहे हे निश्चित नसल्यामुळे कंपनीचा शेअर पडत आहे.
 3. कंपनीने त्यांचा ऑब्जेक्ट CLAUSE बदलला त्यानुसार कंपनी आता ( ७.५ टॅन वजन असणाऱ्या लाईट कमर्शियल व्हेहिकल, पॉवर ट्रेन( LCV साठी) डेव्हलपिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि विक्री आणि स्पेअरपार्टसच्या व्यवसायात उतरणार आहे.
 4. कंपनीमध्ये तिचे तीन भाग मर्ज होणार आहेत.
 5.  BS VI एमिशन स्टॅंडर्ड लागू झाल्यावर किमती ८% ते १०% ने वाढतील.
  डिसेंबर २०१८ महिन्यासाठीची विक्री कमी झाल्यामुळे शेअरची किंमत Rs १०० च्या खाली घसरली.

वेध उद्याचा

 • पुढील आठवड्यात येणाऱ्या कॉर्पोरेट निकालांचे वेळापत्रक या आधीच भागात दिले होते.
 • पुढील आठवड्यात ७ तारखेला USA चे एक शिस्तमंडळ चीनला भेट देईल.
 • ८ जानेवारी २०१९ रोजी LIC ची IDBIच्या शेअर्ससाठी ओपन ऑफर बंद होईल.
 • ९ जानेवारी २०१९ रोजी येस बँक आपल्या CEO आणि MD साठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव RBI ला कळवेल.
 • १० जानेवारी २०१९ रोजी GST कौन्सिलची बैठक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५६९५ NSE निर्देशांक निफ्टी १०७२७ बँक निफ्टी २७१९५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!