Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – २८ फेब्रुवारी २०१९
आज क्रूड US $६६.१३ प्रती बॅरल ते US$६६.२० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१० ते US $१=Rs ७१.२६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६ तर VIX १८.१८ होते.
USA आणि चीन यांच्या टॅरिफ वॉरमध्ये अजून काही समस्या आहेत. त्या मिटल्याशिवाय USA माघार घेईल असे वाटत नाही US $३०००० बिलियन एवढा ऍग्री इम्पोर्ट आम्ही करू असे चीनने सांगितले. पण USA चा प्रश्न तंत्रज्ञानाच्या बाबतीत आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि पेटंट, चलनाच्या किमतीमध्ये वारंवार केले जाणारे बदल हे मुख्य विषय आहेत. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जॉन्ग यांच्यातील बैठक अनिर्णीतावस्थेत संपली.
USA मध्ये क्रूडचे उत्पादन वाढत असल्यामुळे क्रूडची किंमत स्थिरावली आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेविषयीचा डाटा खराब आल्यामुळे मेटल्ससंबंधीत शेअर्स पडले.
बँक ऑफ जपान आणि RBI यांनी करन्सी स्वॅपसाठी करार केला आहे. यामुळे भारतीय मार्केट्समध्ये US $ची मागणी कमी होईल आणि रुपयावरील दबाव कमी होईल.
PEACE डेच्या निमित्ताने तैवानची मार्केट्स बंद होती.
भारताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन USA, फ़्रान्स, आणि UK या राष्ट्रांनी मसूद अझहर याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा प्रस्ताव दिला. जवळजवळ बर्याच राष्ट्रांनी पाकिस्तानवर दबाव वाढवला जिनेवा कराराचे पालन करण्यास सांगितले. त्यामुळे पाकिस्तान पकडलेल्या भारतीय वैमानिकाला बिनशर्त भारताकडे सुपूर्द करण्यास तयार झाले.
आज GDP चे आकडे आले. तिसऱ्या तिमाहीत GDP ग्रोथरेट ६.६% राहिला.पहिल्या तिमाहीचा सुधारित GDP ग्रोथरेट ८% तर दुसऱ्या तिमाहीचा सुधारित GDP ग्रोथरेट ७% राहिला. वित्तीय वर्ष २०१९ साठी GDP ग्रोथरेट ७% ची लक्ष्य निश्चित केले आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील योजना/ धोरण मंजूर होण्याची शक्यता आहे
(१) नॅशनल मिनरल पॉलिसी
(२) FAME २ कार्यक्रमाअंतर्गत इलेक्ट्रिक व्हेईकल साठी सबसिडी दिलि जाईल. ६०,००० EV वर Rs २,५०,००० प्रती EV कार, आणि हायब्रीड कार साठी Rs २०,००० सबसिडी दिली जाईल. सरकार या सबसिडीसाठी Rs १०,००० कोटींची तरतूद करणार आहे.
(3) सॉफ्टवेअर प्रॉडक्टसाठी नॅशनल पॉलिसी मंजूर केली जाईल.
(4) वोडाफोन आयडियामध्ये FDI (US $ ४८९०) ला मंजुरी मिळेल.
थंडी कमी होऊन उन्हाळा सुरु झाला आहे याची नोंद मार्केटने घेतली. हॅवेल्स,ब्लु स्टार, सिम्फनी आणि वोल्टास या कंपन्या आज तेजीत होत्या.
SREI इन्फ्रा आणि R COM हे वायदा मार्केटमधून बाहेर पडतील.
उद्यापासून रावनीत गिल येस बँकेत रिझ्युम होतील आणि कारभाराची सूत्रे सांभाळतीत.
फ्युचर रिटेल आणि ‘7ELEVEN’ मध्ये फ्रॅंचाइज स्टोर्स उघडण्यासाठी करार झाला.
१ मार्च २०१९ रोजी होणाऱ्या सेबी च्या बैठकीत रेटिंग एजन्सीजच्या कामात पारदर्शकता यावी म्हणून काही नियम बदलले जातील तर काही नवीन नियम केले जातील. एका कंपनीचे रेटिंग आळीपाळीने वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीजना द्यावे. IPO जर Rs १०० कोटींचा असेल तर २ आणि ५०० कोटी किंवा जास्त रकमेचा असेल तर ३ रेटिंग एजन्सीजचे रेटिंग लागेल. रेटिंग एजन्सीजनी योग्य वेळेला धोक्याचा इशारा न दिल्यामुळे त्यांची उपयोगिताच संपुष्टात येती.आणि ज्या हेतूने रेटिंग केलेले असते तो हेतू साध्य न झाल्यामूळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते.
एस्सार स्टील या कंपनीच्या रेझोल्यूशन बद्दल ३ मार्चपर्यंत निर्णय घ्या असे NCLAT ने NCLT ला सांगितले. NCLAT मध्ये या केसची सुनावणी १४ मार्चला होईल.
इराण भारताकडून रॉ शुगर खरेदी करणार आहे.
क्विक हील या कंपनीची ५ मार्च २०१९ रोजी शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.
PANACEA बायोटेक ही कंपनी आपला रिअल इस्टेट व्यवसाय वेगळा करणार आहे. कंपनीची व्हॅल्यू Rs १२०० कोटी आहे पण त्यापैकी रिअल इस्टेटीचे व्हॅल्यूएशन Rs ७००कोटींचे आहे. ही कंपनी ‘ NO DEBT’ कंपनी होईल.
मार्च महिन्यातील महत्वाच्या घटना
(१) १ मार्च रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील.
(२) १२ मार्चला IIP आणि CPI चे आकडे येतील.
(३) फेडची FOMC ची मीटिंग १९ आणि २० मार्चला होईल.
(४) २९ मार्च २०१९ या दिवशी ब्रेक्झिट होईल. म्हणजे UK युरोपियन युनियन मधून बाहेर पडेल.
(५) ५ मार्च रोजी राममंदिरासंबंधात सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल.
मार्च महिन्याच्या उत्तरार्धात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली जाईल.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८६७ NSE निर्देशांक निफ्टी १०७९२ वर बँक निफ्टी २६७८९ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!