आजचं मार्केट – १ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६०.९२ प्रती बॅरल ते US $६०.९८ प्रती बॅरल, रुपया US $१= Rs ७१.०० ते US $१=Rs ७१.३२ या दरम्यान होते. VIX १५.५४ होते.

आज काळजीवाहू अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये वर्ष २०१९-२०२० साठी अंतरिम अंदाजपत्रक सादर केले. आजच्या अंदाजपत्रकाने मार्केटला संजीवनी दिली. राजकारण आणि अर्थकारण यांचे कधीही पटत नाही. हे दोन्हीही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जातात. या वेळेला मात्र हुशारीने केलेले राजकारण आणि सुंदर अर्थकारण यांचा चांगला मेळ घातला गेला असे म्हणावेसे वाटते. शेतकऱ्यांना आणि मध्यमवर्गीयांना खुश करताना आर्थीक शिस्त ( फिस्कल DISCIPLINE) पाळली गेली. फिस्कल डेफिसीट ३.४% वर ठेवली जाईल. या साऱ्यामुळे मार्केटने अंदाजपत्रकाचे स्वागत केले. तेजीच्या मार्केटमध्ये DHFL,तसेच वेदांता आणि हिंदुस्थान झिंक आणि स्टरलाईट टेक्नॉलॉजि या वेदांता ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर पडत होते. कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संदर्भात वेदांता ग्रुपमध्ये काही समस्या उद्भवल्यामुळे हे शेअर पडले. .
अंदाजपत्रक सादर करताना त्यांनी गेल्या ५ वर्षातील NDA सरकारच्या विविध योजनांच्या उपलब्धीविषयी आढावा घेतला.

या वर्षी फिस्कल डेफिसिट ३.४% तर करंट अकौंट डेफिसिट २.५% राहील

२ हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना दर वर्षी Rs ६००० ( Rs २००० च्या तीन हप्त्यात) इन्कम म्हणून त्यांच्या खात्यात जमा केले जातील. यासाठी Rs ७५००० कोटी खर्च येईल.

मच्छीमारीच्या व्यवसायासाठी नवीन डिपार्टमेंट तयार केले जाईल.

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजाच्या दरात २% सबव्हेंशन दिले जाईल. कर्जाची परतफेड व्यवस्थित आणि वेळेवर करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी ३% सबव्हेंशन दिले जाईल.

गायींची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोग स्थापन केला जाईल.

सरकारने बोनस मिळण्यासाठी Rs २१००० पर्यंत पगार असेल तर बोनस मिळेल अशी तरतूद केली.

कामगाराचा अचानक अंत झाल्यास त्याला Rs ६०००००/- नुकसानभरपाई म्हणून मिळतील.

सरकारने श्रमयोगी मानधन योजना जाहीर केली. यात असंघटीत क्षेत्रामधील Rs १५००० पर्यंत पगार असलेल्या कामगाराला त्याच्या ६० व्या वर्षांनंतर दरमहा Rs ३००० पेन्शन मिळेल. यासाठी दर महिन्याला त्या कामगाराला Rs १०० भरावे लागतील.
पुढच्या वर्षात ८ कोटी मोफत LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य पुरे केले जाईल.

IT क्षेत्रातील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि इतर नवीन कॉन्सेप्टसाठी नॅशनल सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले जाईल.

पब्लिक सेक्टर एंटरप्रायझेसना आता त्यांच्या गरजापैकी २५% गरजा SME कडून आणि त्यातल्या ३% गरजा महिला उद्योजक असलेल्या SME कडून सोर्स कराव्या लागतील.

आता आयकर खात्याचे संपूर्णपणे डिजिटलायझेशन केले जाईल. आयकर रिटर्न खात्याची स्क्रुटिनी आणि असेसमेंट ऑनलाईन होईल.

सरकारचा पुढल्या वर्षीपर्यंत १ लाख गावे डिजिटल कनेक्शनने जोडण्याचा संकल्प आहे.

‘इझ ऑफ डुईंग बिझिनेस’ बरोबरच इझ ऑफ लिविंग पुरवण्याचा सरकार प्रयत्न करेल. याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना उत्तेजन दिले जाईल. तसेच सोलर आणि इतर ऊर्जा स्रोत वापरणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जाईल.
सरकारने रेल्वेसाठी Rs ६४५८७ कोटींची तर नॅशनल एज्युकेशन मिशन साठी Rs ३८६०० कोटींची तरतूद केली. SC/ST च्या कल्याणासाठी जादा तरतूद केली.

आय करामध्ये ज्या करदात्यांचे उत्पन्न Rs ५ लाखापर्यंत आहे त्यांना आयकर लागू होणार नाही. याचा ३ कोटी करदात्यांना फायदा होईल. पण आयकराच्या ब्रॅकेट्स मध्ये काही फरक केला नाही.

सॅलरीड आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी स्टॅंडर्ड डिडक्शन Rs ४०,००० वरून Rs ५०,०००/- केली. व्याजावरच्या टीडीएस ची लिमिट Rs १००००/- वरून Rs ४०,०००/- तर घरभाड्यावरच्या टीडीएस साठीची रक्कम Rs १८०,०००/- वरून Rs २,४०,०००/- केली.

जर आपल्याला घर विकून Rs २ कोटींपर्यंत कॅपिटल गेन्स झाला असेल तर आपण तो आता एका ऐवजी दोन घरात गुंतवू शकता. पण ह्या सवलतीचा फायदा आयुष्यात एकदाच घेता येईल. ह्या कॅपिटल गेन्सवर कर भरावा लागणार नाही.
अफोर्डेबल होमसाठीची बिल्डर्सना दिली जाणारी सूट एका वर्षापर्यंत वाढवली. तसेच बिल्डरच्या न विकल्या गेलेल्या इन्व्हेंटरीवर कर लागणार नाही.

सरकारचे भारताची अर्थव्यवस्था ५ वर्षात US $ ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था तर ८ वर्षात US$ १० लाख कोटींची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आज स्टेट बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. बँकेला Rs ३९५५ कोटी नफा तर NII Rs २२६९१ कोटी झाली. NPA कमी झाले. लोन ग्रोथ १२.१% झाली.

DR रेड्डीजचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले. मार्जिन २२.५% राहिले.

ज्युबिलंट लाईफचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले. BSE चे निकाल असमाधानकारक होते.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४६९ NSE निर्देशांक निफ्टी १०८९३ बँक निफ्टी २७०८५ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.