Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आजचं मार्केट – ५ फेब्रुवारी २०१९
आज क्रूड US $६२.४० प्रती बॅरल ते US $६२.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५७ ते US $१=Rs ७१.८१ या दरम्यान होते. US$ निर्देशांक ९५.८५ तर विक्स १५.६६ होते.
ट्रेड वॉर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज क्रूड वाढतच होते. रुपया घसरत होता. आणि मार्केटमध्ये फारसे व्हॉल्युम नव्हते. अगदी मोजके शेअर्स तेजीत होते. बाकी मार्केट मंदीतच होते असे म्हटले तर चालेल. वाडिया ग्रुपचे शेअर्स म्हणजे ब्रिटानिया, BBTC, नॅशनल पेरॉक्ससाईड, बॉम्बे डायिंग या कंपन्यांचे शेअर्स पडले.
टाटा मोटर्सची JLR विक्री १.४% ने घटली.
ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीने GST मध्ये केलेल्या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही म्हणून अँटी प्रॉफीटीअरिंग ऑथॉरिटीने कंपनीला Rs ४२ कोटी जमा करायला सांगितले. ज्युबिलण्ट फूड मध्ये प्रमोटर्स होल्डिंग ( भरतीया कुटुंबीय) ४५% आहे. कंपनी ज्युबिलंट या शब्दाचा वापर करत असल्यामुळे आणि हा शब्द ब्रँड असल्यामुळे प्रमोटर्सनी आपल्याला विक्रीच्या ०.५% रॉयल्टी मिळावी असे सांगितले आहे. वर्तमान विक्रीचा विचार केला तर या हिशेबाने कंपनीला Rs १५ कोटी रॉयल्टी द्यावी लागेल. ही कंपनी विक्रीच्या ३.३% रक्कम आधीच डॉमिनोज या कंपनीला फ्रँचाइज फी म्हणून देत आहे. या दोन्ही बातम्यांमुळे ज्युबिलण्ट फूड हा शेअर खूप पडला.
कोल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी ४.४६ कोटी शेअर्स Rs २३५ प्रती शेअर्स या भावाने शेअर्स BUY बॅक करेल. कंपनी या BUY बॅक साठी Rs १०५० कोटी खर्च करेल.
सरकारने सेबीला रेटिंग एजन्सीजची जबाबदारी, पारदर्शकता,आणि योग्य वेळेला रेटिंग बदलण्याची जरुरी या बाबतचे नियम याबाबत अभ्यास करून नवीन नियम बनवायला सांगितले आहेत. आतापर्यंत बहुतांश केसेस मध्ये असे आढळून आले की रेटिंग एजन्सीजची ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी परिस्थिती असते. शेअर मार्केट,मार्केटमधील तज्ज्ञ, कर्ज देण्याऱ्या वित्तीय संस्था आणि काही वेळेला सरकारने या कंपन्यांबाबत काळजी व्यक्त केल्यावर रेटिंग एजन्सी जाग्या होतात आणि या कंपन्यांचे रेटिंग बदलतात. यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराचे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबीने यात लक्ष घालावे असे सरकारने सुचवले आहे.
दक्षिण भारतात सिमेंटचे भाव पोत्यामागे Rs ६० वाढवले त्यामुळे इंडिया सिमेंट, अल्ट्राटेक, रामको, ओरिएंट सिमेंट या कंपन्यांना फायदा होईल.
PNB या सार्वजनिक क्षेत्रातील ३ नंबरच्या सरकारी बँकेने आज आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँक लॉस मधून प्रॉफिट मध्ये आली. ग्रॉस NPA आणि नेट NPA यांच्यात थोडी सुधारणा झाली. NII वाढले आणि प्रोव्हिजन कमी करावी लागली. बँकेने गेल्या तिमाहीत Rs १६००० कोटींची वसुली केली.
ट्रेन्ट, CESC ( मार्जिन कमी झाले, Rs १७ प्रती शेअर अंतरिम लाभांश), कामत हॉटेल्स, ACC ( Rs १४ प्रति शेअर अंतरिम लाभांश) अपोलो टायर्स ( Rs ६० कोटींचा ONE टाइम लॉस) ट्यूब इन्वेस्टमेंट्स, गेल ( Rs ६.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), इनॉक्स लिजर, स्नोमॅन लॉजिस्टिक, टेक महिंद्रा, मेरिको ( Rs २.७५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), टाटा ग्लोबल बेव्हरेजीस या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सिम्फनी, सेंच्युरी प्लायवूड, BHEL,लक्ष्मी विलास बँक, यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.
वेध उद्याचा
अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अलाहाबाद बँक, आर्चिज, सिप्ला, कमिन्स इंडिया, ग्राफाइट इंडिया, IGL, JSW स्टील, इंडियन ह्यूम पाईप, ल्युपिन, मुथूट, मन्नापुरम, PTC, सीमेन्स, वेंकीज या कंपन्या आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६१६, NSE निर्देशांक निफ्टी १०९३४, बँक निफ्टी २७२७१ वर बंद झाले.
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!