आजचं मार्केट – ६ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.९४ प्रती बॅरल ते US $६२.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५३ ते US $१=Rs ७१.६४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.१० होता.

आज मार्केटने जणू काही निफ्टी ११००० ही लक्ष्मणरेषा पार केली. गेले दोन महिने निफ्टी ११००० ला स्पर्श करून मागे फिरत होता. आज निफ्टीने ११००० वर क्लोज दिला. शॉर्ट कव्हरिंग रॅली आज मार्केट मध्ये आली. आता मार्केटमधील ट्रेडर्स गुंतवणूकदार आणि विशेषज्ञ निफ्टीसाठी वरची टार्गेट देण्यासाठी मोकळे झाले. जरी निफ्टीने आज ११००० च्यावर क्लोज दिला तरी मिडकॅप शेअर्स आणि स्माल कॅप शेअर्सना तर सोडाच पण निफ्टीमधीलसुद्धा सर्व शेअर्सनाही या तेजीने स्पर्श केला नाही. त्यामुळे काही निवडक मोठ्या CMP च्या शेअर्सपुरतीच ही रॅली मर्यादित आहे. त्यामुळे बहुतेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ तोट्यात आहेत. सर्वसाधारण गुंतवणूकदारांनाच नव्हे तर म्युच्युअल फंडांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. त्यांचे NAV ( नेट ऍसेट व्हॅल्यू) आणि निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्यात तफावत पडत आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली की USA आता ऑइल आणि नैसर्गिक वायू यांचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश होईल. थोड्याच काळात USA या दोन वस्तूंची निर्यात करू लागेल.त्यांनी असेही सांगितले की चीनबरोबरच्या वाटाघाटी सुरळीतपणे चालू आहेत. सौदी अरेबिया, UAE, आणि रशिया हे तीन देश ओपेकला समांतर अशी संस्था स्थापन करेल . ही संस्था या देशांच्या क्रूड उत्पादनाचे धोरण ठरवेल.

सरकारने इथेनॉलच्या उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी Rs १२००० कोटींचे पॅकेज मंजूर केले.या पूर्वी Rs ६००० कोटी मंजूर केले आहेत. यात इथेनॉल उत्पादनासाठी प्लांट उभारणाऱ्या साखर उत्पादक कंपन्यांना तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यां ज्या इथेनॉल प्लांट लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कमी व्याजाच्य दराने कर्ज दिले जाईल. साखर उत्पादक कंपन्या उसाच्या मळीपासून तसेच उसाच्या रसापासून इथेनॉल बनवू शकतील. कर्जावर पहिली पांच वर्षे व्याजाच्या दरात ६% सूट दिली जाईल.

ज्युबिलण्ट फूडने प्रमोटर्सना ‘ज्युबिलण्ट’ या ब्रँडसाठी रॉयल्टी देण्याचा निर्णय रद्द केला. कारण हा निर्णय रद्द केला नसता तर म्युच्युअल फंडांनी या शेअरची विक्री केली असती. शेअर वाढला नाही कारण प्रमोटर्सचा हा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना पसंत पडला नाही.

PVR या कंपनीने त्यांची पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेमधील विस्तार योजना रद्द केली त्रिवेणी इंजिनीअरिंग या कंपनीने ‘शगुन’ या ब्रँड खाली आटा आणि मैदा मार्केट मध्ये लाँच केला.

सरकारने आपला ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील ७३.४७% स्टेक चार मोठ्या पोर्ट ऑथॉरिटीजना विकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या व्यवहारातून सरकारला Rs १०५० कोटी मिळाले.

FITCH या रेटिंग एजन्सीने JLR च्या विक्रीवर UK च्या ब्रेक्झिटचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन टाटा मोटर्सचे रेटिंग निगेटिव्ह केले.

हिंदुस्थान कॉपरने वायर रॉड ची किंमत ३% ने कमी केली.

हॅवेल्सने लॉईड्स AC ची नवीन सिरीज ‘ग्रँड’ या नावाने लाँच केली.

ग्लेनमार्क फार्माने ग्रँड फार्माबरोबर ‘RYALTRIS’ या औषधाची चीन मध्ये विक्री करण्यासाठी करार केला.

IDBI फेडरल लाईफ या IDBI च्या इन्शुअरन्स आर्ममध्ये IDBI बँकेचा ४८% स्टेक आहे. हा स्टेक विकत घेण्यात काही खाजगी बँकांनी स्वारस्य दाखवले आहे. ही स्टेकची विक्री IDBI बँकेला Rs ३००० कोटी ते Rs ३५०० कोटी मिळवून देऊ शकेल.

अल्केम लॅब च्या SAINT लुइस युनिटमध्ये USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.

युनायटेड हेल्थने केलेल्या प्राईस फिक्सिंगच्या आरोपाचा DR रेडीज या कंपनीने इन्कार केला.

DHFL या कंपनीवर व्हिसलब्लोअरने केलेल्या आरोपांची चौकशी प्रथम रजिस्ट्रार ऑफ कंपनीजचे ऑफिस करेल. या

ऑफिसने आपला रिपोर्ट दिल्यानंतर SFIO ( सिरीयस फ्रॉड इव्हेस्टिगेशन ऑफिस) चौकशी करेल असे MCA (मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स)ने जाहीर केले.

आज ल्युपिनने आपल्याला तिसर्या तिमाहीच्या निकालात Rs १५१ कोटी तोटा झाला असे जाहीर केले. कंपनीला ‘PERINDOBRIL’ या औषधाच्या बाबतीत झालेल्या कायदेशीर कारवाईमध्ये Rs ३४२ कोटी ONE टाइम लॉस झाला.
टेक महिंद्र, V -MART, शोभा, मिंडा इंडस्ट्रीज, वेंकीज, BLUE स्टार, वर्धमान टेक्सटाईल्स, मुथूट फायनान्स, ग्राफाइट इंडिया, सिमेन्स, S H केळकर, अडाणी पोर्ट्स, झायडस वेलनेस, JSW स्टील याचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सिप्ला,गेटवे डिस्ट्रिपार्क यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सर्वसाधारण आले.

बॉम्बे डाईंग ( फायद्यातून तोट्यात), टाटा केमिकल्स, मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स, अडानी पॉवर ( तोटा झाला), अलाहाबाद बँक ( तोटा कमी झाला पण NPA वाढले) यांचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

  • उद्या ब्रिटानिया, ऑरोबिंदो फार्मा, कॅडीला हेल्थकेअर, अडानी एंटरप्रायझेस, टाटा मोटर्स या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील.
  • उद्या सकाळी ११-४५ वाजता RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल. RBI नजीकच्या भविष्याविषयी, GDP विषयी, इन्फ्लेशनविषयी तसेच रेट कट विषयी काय धोरण अवलंबते यावर मार्केटचे लक्ष असेल. RBIचे नवीन गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कडून मार्केटला बर्याच अपेक्षा आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९७५, NSE निर्देशांक निफ्टी ११०६२ बँक निफ्टी २७४०२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.