आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६२.४४ प्रती बॅरल ते US $ ६२.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.७६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.४४ होता.

चीन, तायवान चे बाजार ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत बंद राहतील. हॉंगकॉंगचे बाजार आज बंद होते. ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सेंट्रल बँकांनी असे सांगितले की मार्केटला उत्तेजन देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही रेट कट करू.

आज RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI नी रेपोरेटमध्ये ०.२५% कपात केली आता ६.२५% झाला. रिव्हर्स रेपोरेट ६% तर CRR ४% वर कायम ठेवला. RBI ने आपला स्टान्स कॅलिबरेटेड वरून न्यूट्रल केला. ग्रोथ रेट आणि महागाईचा स्तर लक्षात घेऊन भविष्यात रेट कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सूचित केले. RBI अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटी वर लक्ष ठेवेल आणि लिक्विडीटी सामाधानकारक स्तरावर राहील याची खबरदारी घेईल असे सांगितले. पेमेंट गेटवे साठी एक वेगळी रेग्युलेटरी ऑथोरिटी नेमू असे सांगितले. करन्सी मार्केटसाठी एक टास्क फोर्स नियुक्त केला जाईल.
बल्क डिपॉझिटची व्याख्या Rs २ कोटी आणि त्यावरील रकमेची डिपॉझिट्स अशी बदलली. या आधी Rs १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या डिपॉझिटला बल्क डिपॉझिट अशी व्याख्या होती.

अर्बन सहकारी बँकांसाठी एक अम्ब्रेला ऑथॉरिटी निर्माण केली जाईल. ही ऑथॉरिटी अर्बन सहकारी बँकांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करील.

NBFC चे आता नव्या निकषांप्रमाणे वर्गीकरण केले जाईल. फेब्रुवारी २०१९ अखेर NBFC साठी नवीन नियम करून अमलात आणले जातील तसेच NBFC ना दिलेल्या कर्जाचे रिस्क ऍसेट वेटेज १०० ऐवजी NBFC च्या रेटिंग वर अवलंबून राहील. यामुळे बँकांना NBFC ला दिलेल्या लोनसाठी कमी कॅपिटलची तरतूद करावी लागेल.

शेतीसाठी शेतकऱयांना देण्यात येणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा Rs १ लाखावरून Rs १.६० लाखापर्यंत वाढवली.
RBI ने जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ मध्ये महागाई (CPI) २.८% तर एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये ३.२% ते ३.४% या दरम्यान तर ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ याकाळात महागाई ३.९% राहील असा अंदाज व्यक्त केला.

FY २०१९-२०२० मध्ये पहिल्या अर्धवर्षात GDP ग्रोथ ७.२% ते ७.४% राहील असे सांगितले. तर वर्षभरात GDP ग्रोथ ७.४% राहील असे सांगितले. FY २०१९-२०२० मध्ये कृषी उत्पादनात घट होईल असे भाकीत केले.

बँकांना PCA मधून बाहेर काढण्यासाठी असलेल्या नियमांचे कसोशीने पालन करून मगच एखाद्या बँकेला PCA च्या बाहेर काढले जाईल असे सांगितले. तसेच RBI आपले सर्व निर्णय कोणत्याही राजकीय किंवा अन्य तऱ्हेच्या कारणांसाठी नव्हे तर ठरवलेल्या धोरणाप्रमाणे आणि नियमात बसतील असे आणि वास्तवतेवर ( फॅक्टस) आधारित असे घेईल असे सांगितले.
RBI ने जाहीर केलेला रेट कट कर्जदारांकडे पास ऑन करण्यासाठी RBI बँकांशी चर्चा करेल पण बँकांना हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहील असे सांगितले. याप्रमाणे RBI ने आपले वित्तीय धोरण ग्रोथ आणि महागाई यांचा समन्वय साधेल तसेच RBI चे धोरण आणि सरकारचे धोरण यात कोणताही संघर्ष राहणार नाही असा संकेत दिला

आज मन्नापूरम फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल ( उत्पन्न, प्रॉफिट, प्रॉफिट मार्जिन वाढले.) , सीमेक, वालचंदनगर इंडस्ट्रीज ( तोट्यातून फायद्यात आली.), ASTRAZENEKA ( तोट्यातून फायद्यात), फ्युचर कंझ्युमर्स, इंद्रप्रस्थ गॅस, कमिन्स, ENIL, MRF ( इतर उत्पन्नात लक्षणीय वाढ, नफा, विक्री कमी), अडाणी एंटरप्रायझेस( नफा कमी उत्पन्न वाढले) , कॅडीला हेल्थकेअर, मेरिको या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

मजेस्को, वेलस्पन इंडिया, प्रॉक्टर अँड गॅम्बल,अरविंद, ग्रासिम यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

अडानी ग्रीन, वोडाफोनआयडिया ( तोटा Rs ५०००/-कोटी), श्रीराम EPC,यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

टाटा मोटर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. उत्पन्न Rs ७७००१ कोटी, EBITDA Rs ६५२२ कोटी, तोटा Rs २६९९१ कोटी झाला (यात Rs २७८३८ कोटींचा ONE टाइम लॉस आहे). मार्जिन ८.५% राहिले. चीनच्या मार्केटमध्ये मागणी कमी झाल्यामुळे कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला.

IREDA (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) चा IPO सप्टेंबर २०१९ पर्यंत येईल.

आज ‘CHALET हॉटेल’ या कंपनीच्या शेअर्सचे Rs २६५ वर लिस्टिंग झाले. हा IPO मध्ये Rs २८० ला शेअर दिला होता.

वेध उद्याचा

उद्या महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील,ABBOT लॅब, अल्केम लॅब,DR लाल पाथ लॅब्स, MIDHANI आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९७१ NSE निर्देशांक निफ्टी ११०६९ बँक निफ्टी २७३८७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.