आजचं मार्केट – ११ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.५२ बॅरल ते US $ ६१.५५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१५ ते US $१=Rs ७१.२४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६९ होता.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांचे शिष्टमंडळ आणी चीनचे शिष्टमंडळ यांच्यात टॅरिफ संबंधी चर्चा चालू आहे. USA मधील क्रूड आणि शेल गॅस चे उत्पादन वाढल्यामुळे नजीकच्या भविष्यात क्रुडमध्ये मोठा चढ उतार होईल असे वाटत नाही. एप्रिल १७ आणि १८ २०१९ ला ओपेकची महत्वाची बैठक व्हिएन्ना येथे होणार आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे त्यांनी तयार केलेल्या सुधारित ब्रेक्झिट प्लॅनसाठी ब्रिटनच्या पार्लमेंटची २७ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सरकार गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्सटाईल उद्योगाला मोठी सूट देण्याची शक्यता आहे. एका स्कीमद्वारे या उद्योगाला राज्य आणि केंद्र सरकार आकारत असलेल्या करातून मुक्त केले जाईल. तर निर्यातीसाठी असलेलया योजनेची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली जाईल.

सरकार पंतप्रधानांच्या शुभ हस्ते शेतकऱयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा आरंभ २४ फेब्रुवारी २०१९ पासून करेल तर २५ मार्च २०१९ पासून मजूर पेन्शन योजनेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

ल्युपिनच्या गोवा युनिटच्या केलेल्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

DR रेड्डीज या कंपनीच्या हैदराबाद ( बचुपली फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट III ) प्लांट च्या तपासणीत ११ त्रुटी दाखवल्या.

आयकर विभागाने DHFL च्या खात्यात काही संशयास्पद व्यवहार आढळल्यामुळे या व्यवहारांविषयी स्पष्टीकरण मागवले.

टी सी एस ने JDA सॉफ्टवेअर बरोबर सप्लाय चेन सोल्युशनसाठी करार केला.

सुप्रीम कोर्टाच्या एस्सार स्टीलच्या संबंधातील निर्णयामुळे आर्सेलर मित्तल या आंतरराष्ट्रीय कंपनीला एस्सार स्टील विकत घेण्याचा मार्ग सुलभ झाला.

तीन दिवसात १०० उड्डाणे रद्द केल्याच्या संबंधात DGCA ने इंडिगो या कंपनीकडे स्पष्टीकरण मागवले. यातील बहुतांश उड्डाणे खराब हवामानामुळे रद्द झाली होती.

अपोलो हॉस्पिटलने गेल्यावर्षी पेक्षा ५% जास्त शेअर्स गहाण ठेवले. म्हणून शेअर ११% पडला.

महाराष्ट्र सीमलेस, कॅपलीन पाईंट, PFC ( Rs ६४१ कोटी ONE टाइम गेन),मदर्सन सुमी, थरमॅक्स, सूप्राजीत इंजिनीअरिंग, यांचे निकाल चांगले आले.

KNR कन्स्ट्रक्शन, नेक्टर लाईफसायन्सेस इंडिया सिमेंट्स यांचे निकाल ठीक आले.

जयश्री टी (प्रॉफीटमधून लॉसमध्ये) ,सोमाणी सिरॅमिक्स, आरती ड्रग्ज, प्रताप स्नॅक्स,यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

आयशर मोटर्स या कंपनीचे मार्जिन २०१६ नंतर प्रथमच ३०% पेक्षा कमी आले.

स्पाईस जेट उत्पन्न वाढले, पण नफा कमी झाला. मार्जिनवर दबाव आहे.

वेध उद्याचा

उद्या अमृतांजन, बाटा, कोल इंडिया, लक्स इंडस्ट्रीज, काँकॉर, क्रिसिल, धनुका एग्रीटेक, HEG , हायडलबर्ग सिमेंट, IPCA लॅब्स, जिंदाल पॉलि, KRBL ह्या कंपन्या त्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
उद्या CPI आणि IIP चे आकडे येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३९५ NSE निर्देशांक निफ्टी १०८८८ बँक निफ्टी २७२२७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.