आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.८० प्रती बॅरल ते US $६२.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७३ ते US $१=Rs ७१.१७ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.०८ होता.

आज सरकार आपला SUUTI ( स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) मधील ऍक्सिस बँकेचा हिस्सा ओपन ऑफरच्या प्रक्रियेने विकणार आहे. या ओपन ऑफरची फ्लोअर प्राईस Rs ६८९.५२ ठेवली होती. ऑफर साईझच्या १०% शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. १३/०२/२०१९ रोजी ही ऑफर फॉर सेल किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील. सरकार आपला १.९८% हिस्सा प्रथम विकेल आणि प्रतिसाद चांगला मिळाला तर राहिलेला १.०२ % हिस्सा विकेल. आज संस्थागत गुंतवणूकदारांसाठी OFS ओपन झाली आणि १००% सबस्क्राईब झाली. या OFS मधून सरकारला Rs ५३१६ कोटी मिळतील.

आज जानेवारी २०१९ मध्ये CPI २.०५% ( डिसेंबर २०१८ मध्ये २.१९%), IIP डिसेंबर २०१८ मध्ये २.४% ( नोव्हेंबर २०१८ मध्ये ०.५% होता)

PNB आपला PNB हौसिंग फायनान्स मधील २२% स्टेक GA पार्टनर, VARDE पार्टनर यांना Rs ३५०० कोटींना विकणार आहे.

F &O मधील काही शेअर्स साठी सेबी सर्किट फिल्टर लावण्याचा विचार करत आहे. काही शेअर्समध्ये अवाजवी व्हॉल्युम्स आणि किमतीमध्ये चढ उतार आढळून आले आहेत.

SBI ने एस्सार स्टील या NCLT मध्ये गेलेल्या कंपनीला दिलेले US २.२ बिलियन चे कर्ज विकायला बोली मागवल्या होत्या. परंतु योग्य खरेदी करणारा न मिळाल्यामुळे SBI ने आपला हे ऍसेट विकण्याचा निर्णय मागे घेतला.

इंद्रप्रस्थ गॅस आणि महानगर गॅस यांना मिळणारी सबसिडी सरकार बंद करणार आहे. आता ही सबसिडी सरकार आता ग्राहकांच्या खात्यात थेट जमा करेल.

भारत ईटीएफ २२ चा ट्रांच विक्रीला आणत आहे. यातून सरकार Rs ७०००कोटी उभारेल.

सरकार साखरेची किमान विक्री किंमत Rs २९ प्रती किलो वरून Rs ३१ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ही प्राईस Rs ३५ असावी अशी मागणी केली होती

पगार असलेले करदाते किंवा ज्या करदात्यांचा उत्पन्नाचा एकच स्रोत असेल आणि ज्यांचे आयकराची टीडीएस, ऍडव्हान्स टॅक्स, रिटर्न वेळेत भरणे, इत्यादी बाबतीत रेकॉर्ड क्लीन असेल अशा करदात्यांसाठी आता आयकर खाते प्रीफिल्ड आयकर रिटर्न करदात्याला सादर करेल. करदात्याने यातील सर्व माहिती व्हेरिफाय करून हा रिटर्न सबमिट करायचा. अशा करदात्यांना २४ तासाच्या आत आयकर रिफंड त्यांच्या खात्यात जमा होईल. ही सिस्टीम आयकर खाते १८ महिन्यात तयार करेल असे कळते.

टाटा मोटर्सची JLR आणि CV ची विक्री अनुक्रमे १२% आणि ९% कमी झाली.

HEG आणि हिंदाल्को+उत्कल ३ यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल खूप चांगले आले.
कॉर्पोरेशन बँक, PI इंडस्ट्रीज, IPCA लॅब, हायडलबर्ग सिमेंट, राईट्स, रेडिंग्टन, NCC, J कुमार इन्फ्रा, बजाज हिंदुस्थान ,

GE पॉवर ( तोट्यातून फायद्यात आली.) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

हॉटेल लीला (ही कंपनी ब्रूकफील्ड ऍसेट मॅनेजमेंट कम्पनी Rs ४५०० कोटींना खरेदी करेल), मनाली पेट्रो, शक्ती पंप्स,

धनुका ऍग्रीटेक, इंडियन मेटल्स, डॉलर इंडस्ट्रीज, नाटको फार्मा ( Rs ३.५० अंतरिम लाभांश), यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

GNFC, करूर वैश्य बँक ( प्रॉफिट कमी झाले GNPA आणि NNPA वाढले) यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

वेध उद्याचा

भारत फोर्ज, फोर्स मोटर, गोदरेज इंडस्ट्रीज,NBCC,ओरॅकल फायनान्स,रिलायांस कॅपिटल या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

आज आलेले CPI आणि IIP चे आकडे अनुक्रमे कमी होणारी महागाई आणि औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ दर्शवतात. या अर्थव्यवस्थेतील दोन चांगल्या प्रकारच्या प्रगतीमुळे उद्या मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१५३ NSE निर्देशांक निफ्टी १०८३१ बँक निफ्टी २७०११ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.