आजचं मार्केट – १८ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १८ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६६.२४ प्रती बॅरल ते US $ ६६.६० प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३९ ते US $१=Rs ७१.५० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.७९ तर VIX १८.०९ होते.

USA आणि चीनमधील चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक झाली आता या बोलण्यांची चौथी फेरी वॉशिंग्टनला होईल.सलग ८ सेशन मार्केटमध्ये मंदी आहे. त्यातच विक्स १०% ने वाढून १८च्या वर गेला. क्रुडमध्ये चालू झालेला बुलरन US $ ७५ प्रती बॅरलची पातळी गाठेल असे संकेत आहेत. त्यामुळे रुपयासुद्धा घसरेल. निफ्टीने १०६५० चा सपोर्ट तोडला असल्याने १०५५० पर्यंत निफ्टी जाईल असे तज्ञाचे मत आहे. जर निफ्टीची घसरण येथेही थांबली नाही तर १०२०० पर्यंतही निफ्टी जाऊ शकतो.

HT कॉटन सीडचा बेकायदेशीर उपयोग केल्याबद्दल आंध्र प्रदेश राज्य सरकारने कावेरी सीड्स या कंपनीला नोटीस पाठवली. सीड सॅम्पलमध्ये अवैध जीनचा वापर केला. त्यामुळे आंध्र प्रदेश राज्य सरकारने कावेरी सीड्स या कंपनीचे लायसेन्स १ वर्षाकरिता रद्द केले. कंपनीने असे सांगितले की या लायसेन्स रद्द करण्याचा कंपनीच्या कारभारावर जास्त परिणाम होणार नाही. रद्द केलेलं लायन्सस दोन ते तीन महिन्यात रिन्यू केले जाईल.

सुप्रीम कोर्टाने NGT (नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल) च्या वेदांताचा तुतिकोरीन प्लांट पुन्हा चालू करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

JSPL या कंपनीला रेल्वेकडून ३०००० टन स्टीलची ऑर्डर मिळाली.

IOC ने USA बरोबर FY २० मध्ये US $ १५० कोटींचे ३० लाख टन क्रूड आयातीसाठी करार केला.

रिलायन्स इंफ्राच्या DMRC च्या Rs ५८०० कोटींच्या आर्बिट्रेशन खटल्यात दिल्ली HC च्या आदेशाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील केले. सुप्रीम कोर्ट ह्या अर्जाची सुनावणी करण्यास तयार झाले.

दक्षिण आणि पश्चिम भारतात पेप्सिकोचे विक्री आणि डिस्ट्रिब्युशनसाठी फ्रँचाइज राईट्स विकत घेण्यासाठी वरूण बिव्हरेजीस या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने परवानगी दिली. BSE वर कॉटनमध्ये वायदा सुरु झाला.
अनिल अंबानी ग्रुपने रिलायन्स पॉवरमधील ३०% स्टेक विकण्यासाठी बोली मागवल्या. रिलायन्स पॉवर या कंपनीमध्ये रिलायन्स इन्फ्रा या ग्रुपकंपनीचा ४३% स्टेक आहे. अनिल अंबानी ग्रुपने कर्ज देणार्या बॅंका आणि इतर कर्ज देणार्या संस्थांबरोबर करार केला. या करारानुसार त्यांना अनिल अंबानी ग्रुपने कर्जासाठी गहाण ठेवलेले शेअर्स सप्टेंबर २०१९ पर्यंत विकता येणार नाहीत त्यामुळे अनिल अंबानी ग्रुपचे सर्व शेअर्स चांगलेच तेजीत होते .

RBI च्या १२ फेब्रुवारी च्या NPA संबंधातील सर्क्युलरविरुद्ध केलेल्या अर्जाची सुनावणी आता ६ मार्च २०१९ ला होईल.
टिटाघर वॅगनला इटालीमधील सबसिडीअरीमार्फत Rs १७४१ कोटीची ऑर्डर मिळाली.

चीन, दक्षिण कोरिया, जपानमधून आयात होणाऱ्या स्वस्त स्टीलवर सरकार (१) मिनिमम इम्पोर्ट प्राईस (२) सेफगार्ड ड्युटी (३) ऍन्टीडम्पिंग ड्युटी ( काही काळाकरता तात्पुरती) आकारून यापैकी काही किंवा सर्व उपाय योजून ही आयात बंद/कमी करण्याची शक्यता आहे.

टेक महिंद्राची शेअर BUY बॅक वर विचार करण्यासाठी २१ फेब्रुवारी २०१९ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे.

टाटा स्टीलच्या जाईंट व्हेंचरवर युरोपियन कमिशनने त्रुटी /हरकती नोंदवल्या.

CAREने वोडाफोन आयडिया चे रेटिंग AA वरून AA – केले.

इमामीच्या ३.९ कोटी शेअरमध्ये Rs ३५५ प्रती शेअर किमतीवर दोन ब्लॉक डील झाली.

जेट एअरवेजला त्यांच्या बिकट परिस्थिती मधून बाहेर काढण्यासाठी SBI च्या अधिपत्याखालील कन्सॉरशियम त्यांनी दिलेल्या Rs ६०० कोटीच्या कर्जाचे इक्विटीमध्ये Rs १ प्रती शेअर किमतीच्या शेअर्स मध्ये रूपांतर करणार. त्यामुळे या कन्सॉरशियमचा रिस्ट्रक्चर्ड जेट एअरवेजमध्ये ३२% स्टेक असेल. NIIF ( नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) हा १९.५% स्टेक घेणार आणि Rs १४०० कोटी गुंतवणार. अशाप्रकारे ५१.५% कंट्रोल सरकारच्या हाती येईल. अबुधाबी स्थित ऐतिहाद या कंपनीकडे २४% स्टेक आहे. ही कंपनी Rs १४०० कोटी इन्व्हेस्ट करणार आणी स्वतःचा स्टेक २४.९% करणार. जेट एअरवेज मध्ये Rs १५० प्रती शेअर प्रमाणे शेअर्स खरेदी करून एतिहाद त्यांचा स्टेक वाढवेल. तसेच जेट एअरवेज Rs १५० प्रती शेअर या भावाने राईट्स इशू आणणार. ह्या सर्व व्यवस्थापनानंतरही जे Rs ६००० कोटींचे कर्ज शिल्लक राहील त्याचे १० वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या कर्जात रूपांतर करणार. यामुळे ओपन ऑफर येणार नाही. नरेश गोयल यांचा स्टेक ५१%वरून २०% वर येईल. नरेश गोयल प्रमोटर म्हणून राहतील पण त्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर वर प्रतिनिधित्व राहणार नाही तसेच कंपनीच्या व्यवस्थापनात त्यांचा कोणताही सहभाग नसेल.

BSE चा निर्देशांक सेन्सेक्स ३५४९८ NSE निर्देशांक निफ्टी १०६४१ बँक निफ्टी २६६५४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.