आजचं मार्केट – १९ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १९ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६६.२२ प्रति बॅरल ते US $ ६६.६४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $ १=Rs ७१.६४ या दरम्यान होते.US $ निर्देशांक ९७.१२ होता VIX १८.४६ होते.

मार्केटमधील पडझड आज थांबेल असा अंदाज होता. मार्केट ओव्हरसोल्ड झोनमध्ये होते. पण क्रूडमधील दरवाढ, रुपयांची घसरण, VIX मधील वाढ सुरूच राहिली. याला न जुमानता मार्केटने किल्ला लढवला काही काळ मार्केट २०० पाईण्टपेक्षा जास्त तेजीत होते. या तेजी मध्ये साखर उत्पादक कंपन्या आणि रिअल इस्टेट आणि सिमेंट क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होता. पण ही तेजी टिकू शकली नाही आणि मार्केट मंदीतच बंद झाले.

आज निफ्टीमध्ये इन्व्हर्टेड हॅमर हा पॅटर्न फॉर्म झाला. हा पॅटर्न डाउनट्रेंडमध्ये फॉर्म होतो. ट्रेंड बदलण्याची शक्यता दर्शवतो. या चार्टमध्ये हॅमर पॅटर्नच्या बरोबर उलट आकृती दिसते. हा पॅटर्न अपट्रेन्ड सुरु असताना झाला तर याला शूटिंग स्टार म्हणतात. अपर शॅडो रिअल बॉडीच्या दुप्पट असावी लागते. जर बुधवारी मार्केट तेजीत बंद झाले तर ट्रेंड बदलला असे समजता येईल. आज निफ्टी १०६६० ला ओपन झाला. इंट्राडे हाय १०७५५ झाला. तर इंट्राडे लो १०५९० तर क्लोज १०६१६ वर झाला. आज मार्केटने १०५८० ते १०६०० या सपोर्ट लेव्हलला रिस्पेक्ट दिला.

ग्राफाइट इंडियाचे बंगलोर युनिट २३ फेब्रुवारी २०१९ पासून पूर्णतः बंद करण्यात येईल. याची सूचना कंपनीने कर्नाटक राज्य सरकारला दिली आहे.

START UP क्षेत्राच्या बर्याच दिवसापासून काही मागण्या होत्या. आता सरकारने असे सांगितले की कंपनी बनल्यापासून १०वर्षे कंपनीला स्टार्टअपचा दर्जा दिला जाईल. मात्र कंपनीचा दरवर्षीचा बिझिनेस Rs १०० कोटीपेक्षा कमी असायला पाहिजे.जर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालू केलेली असेल तर DPIIT( डिपार्टमेंट फोर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड) ची मंजुरी लागेल. स्टार्टअप कंपनी आपली कंपनी स्टार्टअप असल्याचे डिक्लरेशन DPIIT ला देईल. नंतर ही ऑथॉरिटी CBDT ला त्याप्रमाणे कळवेल. स्टार्टअप मध्ये कोणत्या कंपन्यांनी गुंतवणूक केली तर कर आकारला जाईल आणि कोणत्या कंपन्यांनी गुंतवणूक केली तर कर आकारला जाणार नाही याची CLEAR व्याख्या केली. जर स्टार्टअपमध्ये गुंतवणुकी करणारी कंपनी डायमंड उद्योग किंवा रिअल इस्टेटमधील असेल तर एंजल टॅक्स लागेल.

रिलायन्स पॉवरमधील प्रमोटर्सचा १८% ते १९% स्टेक विकून Rs २५०० कोटी उभारले जातील.

२१ फेब्रुवारी २०१९ रोजी GST कौन्सिलची मीटिंग आहे. त्यात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी GOM ( ग्रुप ऑफ मिनिस्टर्स) ने केलेल्या शिफारशींना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रिअल स्टेट क्षेत्रातील शेअर्स च्या किमती वाढल्या.

डिव्हीज लॅब या कंपनीच्या हेडऑफिसवर आयकर विभागाने घातलेल्या धाडीत मोठ्या अनियमितता मिळाल्या नाहीत.

BOSCH या कंपनीचा शेअर BUY बॅक उद्या बंद होईल.

आज संध्याकाळी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खालील योजनांवर चर्चा होऊन त्या मंजूर होण्याची शक्यता आहे
(१) KUSUM :- किसान सुरक्षा ऊर्जा उत्थान महाअभियान
(२) रुफटॉप सोलर ग्रीड फेज II
(३) कोल लिलावाचे नियम सोपे करणे.
(४) नॅशनल इलेक्ट्रॉनिक पॉलिसी
(५) सिंगल ब्रँड रिटेलसंबंधी नियम सोपे करणे

वेध उद्याचा

उद्या महिंद्र CIE आणि वरून बिव्हरेजीस या कंपन्यांचे निकाल येतील

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५३५२ NSE निर्देशांक निफ्टी १०६०४ बँक निफ्टी २६६८४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.