आजचं मार्केट – २० फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – २० फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६६.३६ प्रती बॅरल ते US $६६.६१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१० ते US $१=Rs ७१.३४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५२ होता.

गेल्या ८ दिवस सुरु असलेली मंदी झुगारून देऊन आज मार्केटने तेजीचा झेंडा रोवला. याला कारण (१) रुपया वधारला, (२) चीन आणि USA यांच्यामधील ट्रेड वॉर संपुष्टात चिन्हे दिसू लागली आणि (३) सरकार सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांमध्ये भांडवल घालणार आहे याचा लागलेला सुगावा ही होय. 

चीन आणि USA मधील मुख्य मुद्दा आहे चलनाचा. चीन आपले युआनचे डिव्हॅल्युएशन करून ट्रेंड वॉर चालू ठेवते. आता मात्र चीनने आश्वासन दिले आहे की आता आम्ही आमची करन्सी स्थिर ठेवू. ट्रम्पनी निर्बंध लावण्याची तारीख पुढे ढकलण्याचे संकेत दिले.

UK मध्ये ब्रेक्झिट डील त्यांची संसद मंजूर करत नसल्यामुळे २९ मार्च २०१९ रोजी UK ला कोणत्याही निश्चित डीलशिवाय युरोपियन युनियन मधून बाहेर पडायला लागण्याची शक्यता आहे. यामुळे गोंधळाचे,अनिश्चिततेचे आणि काहीसे असुरक्षिततेचे वातावरण UK मध्ये तयार होईल अशी भीती त्या देशातील उदयोगांना वाटत आहे.

आज होणारी GST कॉऊन्सिलची मीटिंग सर्व राज्यांचे अर्थमंत्री हे प्रत्यक्ष हजर असताना चर्चा होऊन झाली पाहिजे असे बर्याच राज्यांच्या अर्थमंत्र्याचें म्हणणे असल्यामुळे आज होणारी GST कौन्सिलची मीटिंग आता २४ फेब्रुवारी २०१९ रविवार रोजी होईल. आजच्या मीटिंगमध्ये काही अर्थमंत्र्याचे असे म्हणणे होते की बिल्डर GST मधील दरातील कट घर खरेदी करणाऱयांपर्यंत पोहोचवणार नाहीत त्यामुळे घरांच्या किमती कमी होणार नाहीत पण राज्य सरकारांचा रेव्हेन्यू मात्र कमी होईल. रिअल्टी क्षेत्रावरील GST कमी होण्याचा निर्णय आजच्या GST कौन्सिल मीटिंग मध्ये झाला नाही त्यामुळे तेजीत असलेले रिअल्टी क्षेत्रातील शेअर्स पडले.

सरकार लवकरच १२ पब्लिक सेक्टर बँकात सुमारे Rs ४८२३९ कोटी भांडवल घालेल.

PNB ला Rs ५९०८ कोटी. अलाहाबाद बँकेत Rs ६८९६ कोटी, युनियन बँकेला Rs ४११२ कोटी, बँक ऑफ इंडिया मध्ये Rs ४६३८ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रला Rs २०५ कोटी. कॉर्पोरेशन बँकेला Rs ९०८६ कोटी, आंध्र बँकेला Rs ३२५६ कोटी, सिंडिकेट बँकेला Rs १६०३ कोटी, सेंट्रल बँकेला Rs २५६० कोटी, IOB ला Rs ३८०६ कोटी, युनायटेड बँकेला Rs २८३९ कोटी, UCO बँकेला Rs ३३३० कोटी भांडवल सरकार पुरवेल.

आंध्र बँक, सेंट्रल बँक, देना बँक,आणि अलाहाबाद बँक या बँका PCA मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

अनिल अंबानी यांना सुप्रीम कोर्टाची अवमानना केल्याबद्दल एरिक्सन विरुद्धच्या खटल्यात दोषी ठरवले. त्यामुळे ADAG ग्रुपचे शेअर्स खूपच पडले.

भूषण पॉवर या कंपनीचे रिजोल्यूशन झाल्यामुळे PNB ला Rs ३००० कोटी वसुलीच्या स्वरूपात मिळतील. PNB आपला

PNB हौसिंग मधील स्टेक विकण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच PNB मेट लाईफ इन्शुअरन्स मधील आपला स्टेक विकण्यासाठी PNB ने बोली मागवल्या आहेत.

DR रेडीज, येस बँक, टाटा मोटर्स, झी एंटरप्रायझेस हे शेअर्स जुलै एक्स्पायरी पासून फिझिकल सेटलमेंटमध्ये जाणार होते पण आता नव्या व्यवस्थेप्रमाणे ते मे २०१९ एक्स्पायरी पासून फिझीकल सेटलमेंटमध्ये जातील.

आंध्र बँक इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुअरन्स कंपनीमधील पूर्ण स्टेक किंवा ३०% स्टेक विकून Rs ९०० कोटी उभारेल.

ICICI PRU या कंपनीने EIL आणि NALCO मध्ये स्टेक घेतला.

काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय झाले.

कॅप्टिव्ह कोल माईन्सच्या बाबतीत नियम सोपे केले. आता कंपनीने जरी कॅप्टिव्ह वापरासाठी कोल माईन घेतली असली तरी उत्पादनाच्या २५% कोळसा ते विकू शकतील. यामुळे आता कोल इंडियाची या क्षेत्रातील मक्तेदारी कमी होईल.

ऑइल आणि गॅस धोरणातील बदल मंजूर केले. याचा फायदा जिंदाल ड्रिलिंग, ऑइल कंट्री टॅब्यूलर, डॉल्फिन ऑफशोअर, आणि सेलन एक्स्प्लोरेशन यांना होईल.

सरकारने नवीन इलेक्ट्रॉनिक पॉलिसीला मंजुरी दिली. याचा फायदा BEL, डिक्सन, BPL, ITI, PG इलेकट्रो, या आणि इतर कंपन्यांना होईल.

सरकारने ग्रिड कनेक्टेड रुफटॉप सोलर पॉवर कार्यक्रमाला मंजुरी दिली.

IL &FS चे प्रकरण थोडक्यात आटपत नाही असे वाटते. यामध्ये Rs ३०,००० कोटी NPA होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक ऑफ बरोडा चा शेअर पडला.

BJP ने AIDMK बरोबर गठबंधन केले त्याचा फायदा राज टी व्ही ला होईल.

वेध उद्याचा

  • उद्या निफ्टीची आणि बँक निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी असेल. २१ फेब्रुवारी २०१९ ला RBI आणि त्यांच्या कंट्रोल खाली असलेल्या बँकांची बैठक आहे. यामध्ये RBI ने केलेला रेट कट आपल्या कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या कर्जावरील व्याजाच्या
  • दरामध्ये पास ऑन करण्याविषयी RBI बँकांबरोबर चर्चा करेल.
  • उद्या टेक महिंद्राची शेअर BUY BACK वर विचार करण्यासाठी बैठक आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५७५६ NSE निर्देशांक निफ्टी १०७३५ बँक निफ्टी २६९५५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.