आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – २७ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६५.२१ प्रती बॅरल ते US$ ६५.६५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.९४ ते US $१=Rs ७१.३२ होता. US $ निर्देशांक ९६.३४ होता. VIX १५.८१वरून १९.४५ होते.

आज मार्केटने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष वाढेल ही भीती मागे टाकली.मात्र जेव्हा जेव्हा या संबंधातील माहिती आली तेव्हा मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग झाले. आज VIX वोलॅटिलिटी निर्देशांक १५.८१ वरून १९.४५ झाला. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मोठे स्वरूप धारण करणार नाही असे तज्ञानी सांगितल्यावर मार्केट पुन्हा सावरत होते. ज्यांना एंट्री आणि एक्झिट पटापट करता येत असेल त्यांनी अशा मार्केटमध्ये ट्रेडिंग करावे.नाहीतर साईडलाईनला राहून फक्त अनुभव घ्यावा.

USA आता क्रूड निर्यात करत असल्याने क्रूडची किंमत कमी होण्यात त्यांना स्वारस्य नाही. ट्रम्प यांनी असे सांगितले चीनवरील निर्बंध लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे. USA चे अध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे किम जॉन्ग यांची बैठक आहे.

अलाहाबाद बँक, कॉर्पोरेशन बँक, धनलक्षमी बँक या तीन बँका PCA ( प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन) मधून बाहेर आल्या. आता या बँका त्यांच्या विस्तार योजना अमलात आणू शकतील, तसेच PCA खालील इतर निर्बंधही त्यांना लागू होणार नाहीत. त्यामुळे या बँकांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

मॅक्स (इंडिया) ही कंपनी मॅक्स बुपा मधील ५१% स्टेक विकणार आहे. याचा फायदा मॅक्स इंडिया आणि मॅक्स फायनान्सियल यांना होईल. या कंपनीचे Rs १००० कोटी व्हॅल्युएशन झाले त्यामुळे मॅक्स इंडियाला Rs ५०० कोटी मिळतील.

सरकार ४००० नवीन बसेसची ऑर्डर टाटा मोटर्स आणि अशोक लेलँड यांना देणार आहे.

केंद्र सरकारने सोलर पॅनलच्या ग्लासवर ५ वर्षांसाठी अँटी डम्पिंग ड्युटी US $११४.५८ प्रती टन लावली. याचा फायदा टेक्श्चरड आणि टेम्पर्ड ग्लास बनवणाऱ्या गुजरात बोरोसिल आणि ला ओपाला, बोरोसिल ग्लास यांना होईल.

P S .रेड्डी यांची MCX चे CEO म्हणून नेमणूक झाली आहे. P S रेड्डी यांना CDSL चा अनुभव आहे.

कॉन्फिडन्स पेट्रो आणि टाइम टेकनो यांनी LPG सिलेंडर संबंधात सरकारबरोबर करार केला.

ONGC ने CNG साठी जपान बरोबर करार केला. जपानमध्ये CNG चा खप खूप आहे.

HDFC AMC (Rs १२ प्रती शेअर लाभांश) आणि सनोफी (Rs ६६ प्रती शेअर लाभांश), मर्क ( Rs ४४० प्रती शेअर लाभांश ) यांचे निकाल चांगले आले.

रेन इंडस्ट्रीज चा निकाल असमाधानकारक होता. कंपनी फायद्यातून तोट्यात गेली.

BEML या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीला मेट्रो ट्रेन साठी Rs ४०० कोटींची ऑर्डर मिळाली.

आंध्र प्रदेशातील भोगापूरम ग्रीनफिल्ड एअरपोर्ट पप्रोजेक्टसाठी GMR इंफ्रानी सर्वात जास्त बोली लावली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५९०५ NSE निर्देशांक निफ्टी १०८०६ बँक निफ्टी २६७९९ वर बंद झाले

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.