Monthly Archives: February 2019

आजचं मार्केट – १५ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १५ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६४.७४ प्रती बॅरल ते US $ ६४.९९ प्रती बॅरल यांच्या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.२३ ते US $१=Rs ७१.४० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०७ होता.

पुलवामा अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या आपल्या सैनिकांचे पुण्यस्मरण करून आणि त्यांना श्रद्धांजली वाहून आजचे मार्केटचे विश्लेषण सुरु करत आहे.

सौदी अरेबिया आणि रशिया झपाट्याने आपले क्रूडचे उत्पादन कमी करत आहेत. परंतु USA मध्ये रेकॉर्ड स्तरावर क्रूडचे उत्पादन होत असल्यामुळे क्रूडचे भाव हळू हळू वाढत आहेत.

सरकारने साखरेची किमान विक्री किंमत Rs ३१ प्रती किलो केली. यामुळे साखर उत्पादकांना Rs ६००० कोटींचा फायदा होईल. पण दोन दिवसांपूर्वी पासून या बातमीचा अंदाज असल्यामुळे ‘SELL ON NEWS’ या न्यायाने सर्व साखर कंपन्यांचे शेअर्स कोसळले.

सरकारच्या विनिवेश लक्ष्य Rs ८०,००० कोटींच्या तुलनेत Rs ५९००० कोटी विनिवेश साध्य झाला. भारत २२ ETF ला सुंदर प्रतिसाद मिळाला. हा भारत २२ ETF चा दुसरा ट्रांच होता. हा इशू १० पट ओव्हर सबस्क्राईब झाला. आणि यातून सरकारला Rs १०,००० कोटी मिळाले.

इमामी या कंपनीने प्रमोटर्सचे ४८ लाख शेअर्स गहाण ठेवले.

सिमेन्स या कंपनीने त्यांची जमीन विकली त्याचे त्यांना Rs १९३ कोटी मिळाले.

डिव्हीज लॅब या फार्मा क्षेत्रातील कंपनीच्या हेडऑफिसवर आयकर विभागाने धाड टाकली.

डिशमन फार्माच्या नरोडा युनिटला USFDA ने क्लीन चिट दिली.

GSK कन्झ्युमर, इंडिया बुल्स रिअल, प्राईम फोकस, JK टायर यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

RPP इन्फ्रा आणि BGR एनर्जी या कंपन्या तोट्यातून फायद्यात आल्या.

नेस्ले या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल कमजोर आला.

तिसऱ्या तिमाहीच्या निफ्टी निर्देशांकातील कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांचे विवरण केले असता २३ कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले, १० कंपन्यांचे निकाल अपेक्षित निकालांच्या जवळपास आले, ४ अपेक्षेप्रमाणे आले. तर १० कंपन्यांचे निकाल खराब आणि असमाधानकारक आले

DR रेड्डीज विषयी थोडेसे

आज DR रेड्डीजच्या शेअरने दाणादाण उडवली. १७ वर्षाच्या किमान पातळीवर म्हणजे Rs १८७२ वर शेअरचा भाव पोहोचला. शेअरमध्ये आजचा व्हॉल्युम तीनपट होता. खरे पाहता अशी कोणतीही बातमी आज तरी नव्हती की ज्या मुळे शेअरमध्ये एवढी मंदी येईल. चारच दिवसापूर्वी बाचूपल्ली युनिटमध्ये USFDA ने ११ त्रुटी दाखवल्या हे समजले होते. त्यानुसार मार्केटने प्रतिक्रियासुद्धा दिली होती. आणि गेल्या चार दिवसात शेअर मंदितच होता. मग आज असे वेगळे काय घडले ? तर USFDA ने जी निरिक्षणे नोंदवली ती चिंताजनक होती. उदा प्रशिक्षित नसलेला कामगार वर्ग, आवश्यक त्या सोयी आणि सुविधांचा ( INFRASTRUCTURE) चा अभाव, रेकॉर्डकीपिंग मधील उणिवा, LACK ऑफ SPACE अँड LACK ऑफ VALVES IN DRAINS( हे निरीक्षण वारंवार आले) काही उत्पादनांसाठी योग्य तपमानाचा लॅबमध्ये अभाव, त्यामुळे नवीन लॅब उभारण्याची गरज आहे, त्यामुळे या प्लाण्टला क्लीन चिट मिळायला वेळ लागेल असे मार्केटमध्ये इम्प्रेशन झाले.LEVETIRACETAM हे इंजेक्शन कंपनीला US मार्केटमधून वारंवार रिकॉल करावे लागत आहे. पण शेअर स्वस्त मिळतोय म्हणून लोकांनी खरेदी केली असावी असे वाटले. कारण दिवस संपेपर्यंत शेअर बराच सुधारला.

वेध उद्याचा

अंबुजा सिमेंट(१८ फेब्रुवारी), लिंडे इंडिया(१९ फेब्रुवारी), सुमीत इंडस्ट्रीज, सनोफी,HDFC AMC (२६ फेब्रुवारी) ,व्हेसुव्हियस, रेन इंडस्ट्रीज(२७ फेब्रुवारी), ABB(१ मार्च) या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल येतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८०८ NSE निर्देशांक निफ्टी १०७२४ बँक निफ्टी २६७९४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १४ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६३.८६ बॅरल ते US $६४.५६ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.८० ते US $१= Rs ७१.१४ यास दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.०७ होता.

आजपासून चीन आणि USA यांच्यात बेजिंग येथे वार्तालाप सुरु होईल. निर्बंध लागू होण्याची तारीख ३१ मार्च २०१९ होती. ही मुदत आता वाढवण्याची शक्यता आहे. परदेशातील मार्केट्स तेजीत होते, पण आपल्या अंतर्गत समस्याच आपल्याला सतावत आहेत. आज क्रूडच्या US $६४ प्रती बॅरल ची पातळी ओलांडली. रुपया पुन्हा US $१=Rs ७१ च्या वर गेला त्यामुळे मार्केट मंदितच होते. किरकोळ महागाई, घाऊक महागाई. IIP या सर्वांमध्ये सुधारणा दिसत असूनही मार्केट मंदीत होते
आज WPI( WHOLESALE PRICE INDEX) चे आकडे आले. जानेवारीसाठी WPI २.७६% ( डिसेंबर २०१८ मध्ये ३.८०%) होता.

आज येस बँकेच्या संबंधात एक मोठी सकारात्मक बातमी आली. RBI ने आपल्या तपासणी रिपोर्टमध्ये असे सांगितले की त्यांनी ठरवलेल्या NPA च्या रकमेत आणि येस बँकेने ठरवलेल्या NPA रकमेत कोणताही फरक नाही. RBI च्या या नो डायव्हर्जन्स प्रमाणपत्रानंतर येस बँकेच्या शेअर्समध्ये खूपच तेजी आली.

भारत ETF २२ आजपासून ओपन झाला.

ल्युपिनला डायबेटीसच्या औषधासाठी जो बॅन लावला होता तो काढून टाकला.

कॅफे कॉफी डे हि कंपनी आपला माईंड ट्री आणि टेक पार्क मधला स्टेक विकणार होती. BLACK स्टोन बरोबर करार करणार आहे. माईंड ट्री या कंपनीचे ७४.९लाख शेअर्स आयकर खात्याने अटॅच केले होते ते रिलीज केले. कॅफे कॉफी डे या कंपनीच्या प्रमोटर्सचे ४६ लाख शेअर्स आयकर खात्याने अटॅच केले.

सन फार्माने ७ फेब्रुवारी २०१९ ते ११ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान गहाण ठेवलेले १.१कोटी शेअर्स सोडवले.

करूर वैश्य बँकेने नवे स्लीपेजिस जाहीर केल्याने हा शेअर थेट लोअर सर्किटला लागला.

L & T या कंपनीने NIELSAN+पार्टनर्स ही जर्मन कंपनी यूरो २.८ कोटीना खरेदी केली.

नाटको फार्माच्या डेहराडून युनिटला हॉलंडच्या रेग्युलेटरी ऑथॉरिटीने मंजुरी दिली.

रेल्वे विकास निगम आणि IRFC यांच्या संबंधात ३१ मार्च २०१९ पूर्वी लिस्टिंग होण्याची शक्यता दुरावली.

पेज इंडस्ट्रीज या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. कंपनीने Rs ४१ अंतरिम लाभांश आणि Rs ७० विशेष लाभांश प्रती शेअर जाहीर केला.

TNPL, ओरॅकल, गल्फ ऑइल, इलेक्ट्रोथर्म( कंपनी तोट्यातून फायद्यात आली), गोदरेज इंडस्ट्रीज, गॅब्रिएल (इंडिया),

MMTC, युनायटेड ब्रुअरीज,ONGC( इतर उत्पन्न Rs २२२४ कोटी, Rs ५.२५ अंतरिम लाभांश) जेट एअरवेज ( लॉस Rs ५८८ कोटी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ने DEBT RESOLUTION प्लान मंजूर केला.) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. व्होल्टासचे निकाल ठीक आले.

MMTC आणि STC हे दोन्ही शेअर्स जोडीने वाढतात आणि जोडीने पडतात. त्यामुळे STC चा शेअरही १०% वाढला.

आज मार्केट पहिल्या साप्ताहिक निफ्टी ऑप्शन एक्स्पायरीच्या अडजस्टमेन्टमध्ये गुंतले होते. याआधी फक्त बँक निफ्टीऑप्शनची साप्ताहिक एक्स्पायरी असायची आता निफ्टी ऑप्शन आणि बँक निफ्टी ऑप्शन या दोन्हींचीही साप्ताहिक एक्स्पायरी असेल. त्यामुळे पडणाऱ्या मार्केटमध्ये शेवटच्या एक तासात तेजी आली आणि मार्केटने झालेला बहुतांश लॉस भरून काढला.

प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी ( गुरुवारी सुट्टी असेल तर बुधवारी) निफ्टी ऑप्शन आणि बँक निफ्टी ऑप्शनची साप्ताहिक एक्स्पायरी असेल. त्यामुळे शेवटच्या एक तासात हे निर्देशांक एका विशिष्ट पातळीत ठेवण्यासाठी या निर्देशांकातील शेअर्सची खरेदी विक्री या शेवटच्या तासात होते. आपण या शेवटच्या तासात होणाऱ्या चढउतारात आपल्या शेअर्सची किंमत वाढली तर शेअर्स विकून फायदा मिळवू शकता.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३५८७६ NSE निर्देशांक निफ्टी १०७४६ बँक निफ्टी २६९७० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १३ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १३ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६२.९० प्रती बॅरल ते US # ६३.२९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.४८ ते US $ १= Rs ७०.६५ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.८३ होता.

ऍक्सिस बँकेची OFS ३.६८ पट ओव्हरसब्सक्राइब झाली. नॉन रिटेल कोट्यामध्ये ४.५६ कोटी शेअर्स साठी ११.६९ कोटी शेअर्सची बीड Rs ६९६ प्रती शेअर या भावाने आली.

काल मार्केट संपल्यानंतर जे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले म्हणजे कोल इंडिया,सन फार्मा, ऑइल इंडिया, बाटा, इंडियन हॉटेल्स, जिंदाल पॉली या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

१४ जानेवारीनंतर रुपयाच्या विनिमय दरात खूपच सुधारणा झाली. कारण वोडाफोन इंडिया, ऍक्सिस बँक OFS या सर्वांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली.

२० फेब्रुवारी २०१९ रोजी GST कॉऊन्सिल ची बैठक आहे. अपेक्षा आहे की GOM ( ग्रुप ऑफ मिनिस्टर्स) ने केलेल्या शिफारशींना या बैठकीत अंतिम मंजुरी मिळेल. यात अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट आणि बिना ITC ( इनपूट टॅक्स क्रेडिट) अफोर्डेबल हौसिंग वरील GST कमी करण्याची शिफारस समाविष्ट आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनी स्टॅम्प ड्युटीमध्ये १% वाढ केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात या GST कपातीचा फायदा घर खरेदी करणाऱयांपर्यंत फारसा पोहोचणार नाही.

JSPL या कंपनीच्या प्रमोटर्सनी ७४.४ लाख शेअर्स गहाण ठेवले.

अपोलो हॉस्पिटल त्यांचा म्युनिच रे बरोबरच्या अपोलो म्युनिच हेल्थ इंशुअरंस कंपनी या इन्शुअरन्स व्हेंचरमधील ४१% स्टेक US $ १७० मिलियनला विकणार आहे. या पैशाचा उपयोग कर्ज फेडण्यासाठी केला जाईल.

VASCON ENGG, फोर्स मोटार, ग्रीन लॅम, सॅकसॉफ्ट टेक्नॉलॉजी, गुजरात फ्ल्युओरीन, यांचे निकाल चांगले आले.
अडाणी गॅस, गुड इयर टायर, यांचे निकाल ठीक आले.

अडाणी ट्रान्समिशन, KCP ( फायद्यातून तोट्यात) यांचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

उद्या पहिल्या साप्ताहिक निफ्टीची आणि बँक निफ्टीची एक्स्पायरी आहे. 

उद्या ONGC, व्होल्टास, नेस्ले, ITDC, जेट एअरवेज, अशोक लेलँड या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील. उद्या तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे ९०० कंपन्यांचे निकाल जाहीर होतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०३४ NSE निर्देशांक निफ्टी १०७९३ बँक निफ्टी २६८८५ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.८० प्रती बॅरल ते US $६२.०१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७३ ते US $१=Rs ७१.१७ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.०८ होता.

आज सरकार आपला SUUTI ( स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया) मधील ऍक्सिस बँकेचा हिस्सा ओपन ऑफरच्या प्रक्रियेने विकणार आहे. या ओपन ऑफरची फ्लोअर प्राईस Rs ६८९.५२ ठेवली होती. ऑफर साईझच्या १०% शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले आहेत. १३/०२/२०१९ रोजी ही ऑफर फॉर सेल किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील. सरकार आपला १.९८% हिस्सा प्रथम विकेल आणि प्रतिसाद चांगला मिळाला तर राहिलेला १.०२ % हिस्सा विकेल. आज संस्थागत गुंतवणूकदारांसाठी OFS ओपन झाली आणि १००% सबस्क्राईब झाली. या OFS मधून सरकारला Rs ५३१६ कोटी मिळतील.

आज जानेवारी २०१९ मध्ये CPI २.०५% ( डिसेंबर २०१८ मध्ये २.१९%), IIP डिसेंबर २०१८ मध्ये २.४% ( नोव्हेंबर २०१८ मध्ये ०.५% होता)

PNB आपला PNB हौसिंग फायनान्स मधील २२% स्टेक GA पार्टनर, VARDE पार्टनर यांना Rs ३५०० कोटींना विकणार आहे.

F &O मधील काही शेअर्स साठी सेबी सर्किट फिल्टर लावण्याचा विचार करत आहे. काही शेअर्समध्ये अवाजवी व्हॉल्युम्स आणि किमतीमध्ये चढ उतार आढळून आले आहेत.

SBI ने एस्सार स्टील या NCLT मध्ये गेलेल्या कंपनीला दिलेले US २.२ बिलियन चे कर्ज विकायला बोली मागवल्या होत्या. परंतु योग्य खरेदी करणारा न मिळाल्यामुळे SBI ने आपला हे ऍसेट विकण्याचा निर्णय मागे घेतला.

इंद्रप्रस्थ गॅस आणि महानगर गॅस यांना मिळणारी सबसिडी सरकार बंद करणार आहे. आता ही सबसिडी सरकार आता ग्राहकांच्या खात्यात थेट जमा करेल.

भारत ईटीएफ २२ चा ट्रांच विक्रीला आणत आहे. यातून सरकार Rs ७०००कोटी उभारेल.

सरकार साखरेची किमान विक्री किंमत Rs २९ प्रती किलो वरून Rs ३१ पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी ही प्राईस Rs ३५ असावी अशी मागणी केली होती

पगार असलेले करदाते किंवा ज्या करदात्यांचा उत्पन्नाचा एकच स्रोत असेल आणि ज्यांचे आयकराची टीडीएस, ऍडव्हान्स टॅक्स, रिटर्न वेळेत भरणे, इत्यादी बाबतीत रेकॉर्ड क्लीन असेल अशा करदात्यांसाठी आता आयकर खाते प्रीफिल्ड आयकर रिटर्न करदात्याला सादर करेल. करदात्याने यातील सर्व माहिती व्हेरिफाय करून हा रिटर्न सबमिट करायचा. अशा करदात्यांना २४ तासाच्या आत आयकर रिफंड त्यांच्या खात्यात जमा होईल. ही सिस्टीम आयकर खाते १८ महिन्यात तयार करेल असे कळते.

टाटा मोटर्सची JLR आणि CV ची विक्री अनुक्रमे १२% आणि ९% कमी झाली.

HEG आणि हिंदाल्को+उत्कल ३ यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल खूप चांगले आले.
कॉर्पोरेशन बँक, PI इंडस्ट्रीज, IPCA लॅब, हायडलबर्ग सिमेंट, राईट्स, रेडिंग्टन, NCC, J कुमार इन्फ्रा, बजाज हिंदुस्थान ,

GE पॉवर ( तोट्यातून फायद्यात आली.) यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

हॉटेल लीला (ही कंपनी ब्रूकफील्ड ऍसेट मॅनेजमेंट कम्पनी Rs ४५०० कोटींना खरेदी करेल), मनाली पेट्रो, शक्ती पंप्स,

धनुका ऍग्रीटेक, इंडियन मेटल्स, डॉलर इंडस्ट्रीज, नाटको फार्मा ( Rs ३.५० अंतरिम लाभांश), यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

GNFC, करूर वैश्य बँक ( प्रॉफिट कमी झाले GNPA आणि NNPA वाढले) यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

वेध उद्याचा

भारत फोर्ज, फोर्स मोटर, गोदरेज इंडस्ट्रीज,NBCC,ओरॅकल फायनान्स,रिलायांस कॅपिटल या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

आज आलेले CPI आणि IIP चे आकडे अनुक्रमे कमी होणारी महागाई आणि औद्योगिक उत्पादनात झालेली वाढ दर्शवतात. या अर्थव्यवस्थेतील दोन चांगल्या प्रकारच्या प्रगतीमुळे उद्या मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण असेल

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६१५३ NSE निर्देशांक निफ्टी १०८३१ बँक निफ्टी २७०११ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ११ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.५२ बॅरल ते US $ ६१.५५ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.१५ ते US $१=Rs ७१.२४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.६९ होता.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांचे शिष्टमंडळ आणी चीनचे शिष्टमंडळ यांच्यात टॅरिफ संबंधी चर्चा चालू आहे. USA मधील क्रूड आणि शेल गॅस चे उत्पादन वाढल्यामुळे नजीकच्या भविष्यात क्रुडमध्ये मोठा चढ उतार होईल असे वाटत नाही. एप्रिल १७ आणि १८ २०१९ ला ओपेकची महत्वाची बैठक व्हिएन्ना येथे होणार आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे त्यांनी तयार केलेल्या सुधारित ब्रेक्झिट प्लॅनसाठी ब्रिटनच्या पार्लमेंटची २७ फेब्रुवारीपर्यंत मंजुरी घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सरकार गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक्सटाईल उद्योगाला मोठी सूट देण्याची शक्यता आहे. एका स्कीमद्वारे या उद्योगाला राज्य आणि केंद्र सरकार आकारत असलेल्या करातून मुक्त केले जाईल. तर निर्यातीसाठी असलेलया योजनेची मुदत ३१ मार्च पर्यंत वाढवली जाईल.

सरकार पंतप्रधानांच्या शुभ हस्ते शेतकऱयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचा आरंभ २४ फेब्रुवारी २०१९ पासून करेल तर २५ मार्च २०१९ पासून मजूर पेन्शन योजनेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

ल्युपिनच्या गोवा युनिटच्या केलेल्या तपासणीत USFDA ने २ त्रुटी दाखवल्या.

DR रेड्डीज या कंपनीच्या हैदराबाद ( बचुपली फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट III ) प्लांट च्या तपासणीत ११ त्रुटी दाखवल्या.

आयकर विभागाने DHFL च्या खात्यात काही संशयास्पद व्यवहार आढळल्यामुळे या व्यवहारांविषयी स्पष्टीकरण मागवले.

टी सी एस ने JDA सॉफ्टवेअर बरोबर सप्लाय चेन सोल्युशनसाठी करार केला.

सुप्रीम कोर्टाच्या एस्सार स्टीलच्या संबंधातील निर्णयामुळे आर्सेलर मित्तल या आंतरराष्ट्रीय कंपनीला एस्सार स्टील विकत घेण्याचा मार्ग सुलभ झाला.

तीन दिवसात १०० उड्डाणे रद्द केल्याच्या संबंधात DGCA ने इंडिगो या कंपनीकडे स्पष्टीकरण मागवले. यातील बहुतांश उड्डाणे खराब हवामानामुळे रद्द झाली होती.

अपोलो हॉस्पिटलने गेल्यावर्षी पेक्षा ५% जास्त शेअर्स गहाण ठेवले. म्हणून शेअर ११% पडला.

महाराष्ट्र सीमलेस, कॅपलीन पाईंट, PFC ( Rs ६४१ कोटी ONE टाइम गेन),मदर्सन सुमी, थरमॅक्स, सूप्राजीत इंजिनीअरिंग, यांचे निकाल चांगले आले.

KNR कन्स्ट्रक्शन, नेक्टर लाईफसायन्सेस इंडिया सिमेंट्स यांचे निकाल ठीक आले.

जयश्री टी (प्रॉफीटमधून लॉसमध्ये) ,सोमाणी सिरॅमिक्स, आरती ड्रग्ज, प्रताप स्नॅक्स,यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक आले.

आयशर मोटर्स या कंपनीचे मार्जिन २०१६ नंतर प्रथमच ३०% पेक्षा कमी आले.

स्पाईस जेट उत्पन्न वाढले, पण नफा कमी झाला. मार्जिनवर दबाव आहे.

वेध उद्याचा

उद्या अमृतांजन, बाटा, कोल इंडिया, लक्स इंडस्ट्रीज, काँकॉर, क्रिसिल, धनुका एग्रीटेक, HEG , हायडलबर्ग सिमेंट, IPCA लॅब्स, जिंदाल पॉलि, KRBL ह्या कंपन्या त्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.
उद्या CPI आणि IIP चे आकडे येतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६३९५ NSE निर्देशांक निफ्टी १०८८८ बँक निफ्टी २७२२७ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक 

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ८ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ८ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.१८ प्रति बॅरल ते US $ ६१.३१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.०३ ते US $१= Rs ७१.३२ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.५७ होता. VIX १५.५५ होते.

USA चे अध्यक्ष ट्रम्पनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरची मीटिंग रद्द केली. HUAWEI च्या संबंधात ट्रम्पनी युरोपमधील देशांना इशारा दिला की HUAWEI कंपनी बरोबर जे देश व्यापार करतील त्या देशांना USA ने घातलेल्या निर्बंधांना सामोरे जावे लागेल. चीनने USA मधून क्रूड आयात करायला सुरुवात केली. युरोप, उत्तर अमेरिका खंडातील देशांमध्ये थंडी वाढत आहे.त्यामुळे नैसर्गीक वायूसाठी मागणी वाढत आहे पण ही स्थिती थोड्या दिवसांकरता टिकते. क्रूडचे भाव मर्यादित रेंजमध्ये राहतील अशी अपेक्षा आहे

आज जानेवारी २०१९ या महिन्यातील एकूण ऑटो विक्रीचे आकडे आले. पॅसेंजर कार्सची विक्री २.७% इतकी कमी झाली, TWO व्हिलर्सची विक्री ५.२% कमी होऊन १६ लाख युनिट्स, कमर्शियल वाहनांची विक्री २.२% ने वाढून ८७५९१ युनिट्स, वाहनांची निर्यात १३.३% वाढून ३.४४ लाख युनिट झाली.

अर्थ मंत्रालयाने आज सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी बँकांना RBI ने केलेल्या रेट कट चा फायदा कर्जदारांना त्वरित पास ऑन करायला सांगितला. म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँकाही हा फायदा कर्जदारांना पास ऑन करतील असे सांगितले.
या सोमवारपासून म्हणजेच ११ फेब्रुवारी २०१९ पासून निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी सुरु होईल. पहिली एक्स्पायरी १४ फेब्रुवारी २०१९ला होईल आणि त्यानंतर दर आठवड्यात गुरुवारी निफ्टीची साप्ताहिक एक्स्पायरी होईल. या साप्ताहिक एक्स्पायरीसाठी निफ्टीचा लॉट ७५ युनिटचा असेल.

रिअल्टी क्षेत्रातली GST कमी करण्यावर विचार करण्यासाठी GST कॉऊन्सिलने एक GOM ( ग्रूप ऑफ मिनिस्टर्स) ची नियुक्ती केली होती. या GOM ने खालीलप्रमाणे शिफारशी केल्या.

अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर ५% GST लावला जाईल तर बिना इनपुट टॅक्स क्रेडिट अफोर्डेबल हौसिंगवर ३% GST लावला जाईल. या शिफारशी मार्च २०१९ मध्ये होणाऱ्या GST कौन्सिलच्या बैठकीत मंजूर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या घोषणेनंतर रिअल्टी क्षेत्रातील कंपन्या तसेच त्या क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्स मध्ये तेजी आली.

रेमंड्स या कंपनीचे डायरेक्टर सिंघानिया यांचा ९१ % स्टेक असलेल्या एन्टिटीने रेमंड्स कडून Rs ९९३ कोटींची खरेदी केली आणि या एंटीटीने रेमंड्सला Rs १६१३ कोटींची विक्री केली. असे एका व्हिसलब्लोअरने जाहीर केले. यावर रेमंड्सने सांगितले वरील पार्टी रिलेटेड व्यवहार कंपनीच्या बिझिनेसशी निकट संबंधात असून पूर्णपणे पारदर्शकरीत्या केलेले आहेत आणि ते कंपनीने जाहीर केलेले आहेत. हे व्यवहार ‘प्रिंसिपल टू प्रिंसिपल’ बेसिस वर आणि स्पर्धात्मक किमतीला केलेले आहेत. कंपनीने वरील स्पष्टीकरण दिल्यावर शेअर पडायचा थांबला आणि त्यात चांगली वाढ झाली.

ब्रिटानिया या कंपनीचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. पण व्हॉल्युम ग्रोथ व्हावी तेवढी झाली नाही. कंपनीने सांगितले की त्यांना रूरल मार्केट्स मध्ये WEAKNESS जाणवत आहे.

आता टाटा मोटर्स विषयी थोडेसे

टाटा मोटर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते. तंत्रज्ञान फार वेगाने बदलत आहे. ऍसेट आणि इन्व्हेस्टमेंटची किमत खूप कमी झाली असेल तर ती बॅलन्सशीट मध्ये वर्षानुवर्षे ठेवण्यापेक्षा त्या किमतीतल्या तफावतीसाठी फायद्यातून प्रोव्हिजन करून ती ‘राईट ऑफ’ करणे यालाच ‘इम्पेअरमेन्ट’ म्हणतात. घरात रेडियो टेपरेकॉर्डर, डेक,जुने मोबाईल या गोष्टी मालमत्ता म्हणून दाखवल्या जातात पण विकायला गेल्यास त्यांना फारशी किमत येत नाही. बॅलन्सशीटमध्ये असेट्स वर्तमान बुक व्हॅल्यूवर दाखवले की त्यामुळे डेप्रीसिएशन प्रोवाइड करावे लागते,रेव्हेन्यूवर परिणाम होतो. जे ऍसेट जुने, उत्पन्न मिळवण्यास निरुपयोगी, तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ‘आऊट ऑफ डेट, झाले असतील त्यांच्या व्हॅल्यूमध्ये होणारी घट म्हणजेच ‘इम्पेअरमेंट’ होय.

या प्रक्रियेमुळे घराची असो किंवा उद्योगाची असो ‘रिअल व्हॅल्यू’ बॅलन्सशीटमध्ये जाहीर होते. या बरोबरच थोडासा टाटा मोटर्सचा ग्राहकांबरोबरचा संवाद कमी झाला आहे असे वाटते कारण त्यांनी मार्केटमध्ये दाखल केलेल्या मॉडेल्सला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.

जेट एअरवेजने SBI कडून घेतलेल्या कर्जाचे शेअर्समध्ये रूपांतर करण्यासाठी करार केला.हे मार्केटला पटले नाही.सध्या पडणाऱ्या थंडीमुळे आणि धुक्यामुळे तसेच मुंबईत काही रनवेची दुरुस्ती चालू असल्यामुळे विमान कंपन्यांना चांगले दिवस नाहीत.

CEAT च्या हलोल प्लांट मध्ये कमर्शियल उत्पादन सुरु झाले.

गुजरात गॅस, ऍपेक्स फ्रोझन फूड्स, IRCON, टिमकीन, SCI, महिंद्रा आणि महिंदा ( इतर उत्पनात वाढ), कल्याणी स्टील, JB केमिकल्स, टी व्ही टुडे, अल्केम लॅब,EIL (Rs ३.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), DR लाल पाथ लॅब, दिलीप बिल्डकॉन यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले. SAIL चाही तिसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला आला.

VARROC ENGG, इंगरसोल रँड, REC यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

एक्सेल कॉर्प, GSPL, झुआरी ऍग्रो, प्रिकॉल ( फायद्यातून तोट्यात), यूको बँक (NPA वाढले), VIP या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उदयाचा

आता मार्केटसाठी सर्व ट्रिगर संपले.बर्याच कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल लागले आता होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका हाच एक मुख्य ट्रिगर असेल. जागतिक मार्केटमधील कमी होणारी मागणी,USA आणि चीनमधील तणाव, ब्रेक्झिट, आणि हवामानातील होणारे प्रतीकूल बदल यांचा परिणाम मार्केटवर होत राहील. त्यातून काल डोजी पॅटर्न झाला होता.फिबोनासि सिरीजप्रमाणे काल ६१.८ ही RETRACEMENT लेव्हल आली होती. त्यामुळे मार्केटचा ट्रेंड बदलला. या प्रकारच्या मार्केटमध्ये विचारपूर्वक शेअर्सची निवड करून ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करावी. थोड्या प्रमाणात काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. शक्यतो मार्केटच्या ट्रेंडबरोबर राहावे. म्हणजे आपले भांडवल सुरक्षित राहून भांडवल कायम वाढत राहील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५४६ NSE निर्देशांक निफ्टी १०९४३ बँक निफ्टी २७२९४ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ७ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $ ६२.४४ प्रती बॅरल ते US $ ६२.६८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.३४ ते US $१=Rs ७१.७६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.४४ होता.

चीन, तायवान चे बाजार ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत बंद राहतील. हॉंगकॉंगचे बाजार आज बंद होते. ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या सेंट्रल बँकांनी असे सांगितले की मार्केटला उत्तेजन देण्याची गरज आहे. म्हणून आम्ही रेट कट करू.

आज RBI ने आपले द्विमासिक वित्तीय धोरण जाहीर केले. RBI नी रेपोरेटमध्ये ०.२५% कपात केली आता ६.२५% झाला. रिव्हर्स रेपोरेट ६% तर CRR ४% वर कायम ठेवला. RBI ने आपला स्टान्स कॅलिबरेटेड वरून न्यूट्रल केला. ग्रोथ रेट आणि महागाईचा स्तर लक्षात घेऊन भविष्यात रेट कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सूचित केले. RBI अर्थव्यवस्थेतील लिक्विडीटी वर लक्ष ठेवेल आणि लिक्विडीटी सामाधानकारक स्तरावर राहील याची खबरदारी घेईल असे सांगितले. पेमेंट गेटवे साठी एक वेगळी रेग्युलेटरी ऑथोरिटी नेमू असे सांगितले. करन्सी मार्केटसाठी एक टास्क फोर्स नियुक्त केला जाईल.
बल्क डिपॉझिटची व्याख्या Rs २ कोटी आणि त्यावरील रकमेची डिपॉझिट्स अशी बदलली. या आधी Rs १ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या डिपॉझिटला बल्क डिपॉझिट अशी व्याख्या होती.

अर्बन सहकारी बँकांसाठी एक अम्ब्रेला ऑथॉरिटी निर्माण केली जाईल. ही ऑथॉरिटी अर्बन सहकारी बँकांच्या अडचणी आणि समस्यांचे निराकरण करील.

NBFC चे आता नव्या निकषांप्रमाणे वर्गीकरण केले जाईल. फेब्रुवारी २०१९ अखेर NBFC साठी नवीन नियम करून अमलात आणले जातील तसेच NBFC ना दिलेल्या कर्जाचे रिस्क ऍसेट वेटेज १०० ऐवजी NBFC च्या रेटिंग वर अवलंबून राहील. यामुळे बँकांना NBFC ला दिलेल्या लोनसाठी कमी कॅपिटलची तरतूद करावी लागेल.

शेतीसाठी शेतकऱयांना देण्यात येणाऱ्या विनातारण कर्जाची मर्यादा Rs १ लाखावरून Rs १.६० लाखापर्यंत वाढवली.
RBI ने जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ मध्ये महागाई (CPI) २.८% तर एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये ३.२% ते ३.४% या दरम्यान तर ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ याकाळात महागाई ३.९% राहील असा अंदाज व्यक्त केला.

FY २०१९-२०२० मध्ये पहिल्या अर्धवर्षात GDP ग्रोथ ७.२% ते ७.४% राहील असे सांगितले. तर वर्षभरात GDP ग्रोथ ७.४% राहील असे सांगितले. FY २०१९-२०२० मध्ये कृषी उत्पादनात घट होईल असे भाकीत केले.

बँकांना PCA मधून बाहेर काढण्यासाठी असलेल्या नियमांचे कसोशीने पालन करून मगच एखाद्या बँकेला PCA च्या बाहेर काढले जाईल असे सांगितले. तसेच RBI आपले सर्व निर्णय कोणत्याही राजकीय किंवा अन्य तऱ्हेच्या कारणांसाठी नव्हे तर ठरवलेल्या धोरणाप्रमाणे आणि नियमात बसतील असे आणि वास्तवतेवर ( फॅक्टस) आधारित असे घेईल असे सांगितले.
RBI ने जाहीर केलेला रेट कट कर्जदारांकडे पास ऑन करण्यासाठी RBI बँकांशी चर्चा करेल पण बँकांना हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहील असे सांगितले. याप्रमाणे RBI ने आपले वित्तीय धोरण ग्रोथ आणि महागाई यांचा समन्वय साधेल तसेच RBI चे धोरण आणि सरकारचे धोरण यात कोणताही संघर्ष राहणार नाही असा संकेत दिला

आज मन्नापूरम फायनान्स, बजाज इलेक्ट्रिकल ( उत्पन्न, प्रॉफिट, प्रॉफिट मार्जिन वाढले.) , सीमेक, वालचंदनगर इंडस्ट्रीज ( तोट्यातून फायद्यात आली.), ASTRAZENEKA ( तोट्यातून फायद्यात), फ्युचर कंझ्युमर्स, इंद्रप्रस्थ गॅस, कमिन्स, ENIL, MRF ( इतर उत्पन्नात लक्षणीय वाढ, नफा, विक्री कमी), अडाणी एंटरप्रायझेस( नफा कमी उत्पन्न वाढले) , कॅडीला हेल्थकेअर, मेरिको या कंपन्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

मजेस्को, वेलस्पन इंडिया, प्रॉक्टर अँड गॅम्बल,अरविंद, ग्रासिम यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक होते.

अडानी ग्रीन, वोडाफोनआयडिया ( तोटा Rs ५०००/-कोटी), श्रीराम EPC,यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

टाटा मोटर्सचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल आले. उत्पन्न Rs ७७००१ कोटी, EBITDA Rs ६५२२ कोटी, तोटा Rs २६९९१ कोटी झाला (यात Rs २७८३८ कोटींचा ONE टाइम लॉस आहे). मार्जिन ८.५% राहिले. चीनच्या मार्केटमध्ये मागणी कमी झाल्यामुळे कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला.

IREDA (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी) चा IPO सप्टेंबर २०१९ पर्यंत येईल.

आज ‘CHALET हॉटेल’ या कंपनीच्या शेअर्सचे Rs २६५ वर लिस्टिंग झाले. हा IPO मध्ये Rs २८० ला शेअर दिला होता.

वेध उद्याचा

उद्या महिंद्रा आणि महिंद्रा, टाटा स्टील,ABBOT लॅब, अल्केम लॅब,DR लाल पाथ लॅब्स, MIDHANI आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९७१ NSE निर्देशांक निफ्टी ११०६९ बँक निफ्टी २७३८७ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ६ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ६ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६१.९४ प्रती बॅरल ते US $६२.०४ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५३ ते US $१=Rs ७१.६४ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.१० होता.

आज मार्केटने जणू काही निफ्टी ११००० ही लक्ष्मणरेषा पार केली. गेले दोन महिने निफ्टी ११००० ला स्पर्श करून मागे फिरत होता. आज निफ्टीने ११००० वर क्लोज दिला. शॉर्ट कव्हरिंग रॅली आज मार्केट मध्ये आली. आता मार्केटमधील ट्रेडर्स गुंतवणूकदार आणि विशेषज्ञ निफ्टीसाठी वरची टार्गेट देण्यासाठी मोकळे झाले. जरी निफ्टीने आज ११००० च्यावर क्लोज दिला तरी मिडकॅप शेअर्स आणि स्माल कॅप शेअर्सना तर सोडाच पण निफ्टीमधीलसुद्धा सर्व शेअर्सनाही या तेजीने स्पर्श केला नाही. त्यामुळे काही निवडक मोठ्या CMP च्या शेअर्सपुरतीच ही रॅली मर्यादित आहे. त्यामुळे बहुतेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ तोट्यात आहेत. सर्वसाधारण गुंतवणूकदारांनाच नव्हे तर म्युच्युअल फंडांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. त्यांचे NAV ( नेट ऍसेट व्हॅल्यू) आणि निफ्टी आणि सेन्सेक्स यांच्यात तफावत पडत आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केली की USA आता ऑइल आणि नैसर्गिक वायू यांचे सर्वात जास्त उत्पादन करणारा देश होईल. थोड्याच काळात USA या दोन वस्तूंची निर्यात करू लागेल.त्यांनी असेही सांगितले की चीनबरोबरच्या वाटाघाटी सुरळीतपणे चालू आहेत. सौदी अरेबिया, UAE, आणि रशिया हे तीन देश ओपेकला समांतर अशी संस्था स्थापन करेल . ही संस्था या देशांच्या क्रूड उत्पादनाचे धोरण ठरवेल.

सरकारने इथेनॉलच्या उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी Rs १२००० कोटींचे पॅकेज मंजूर केले.या पूर्वी Rs ६००० कोटी मंजूर केले आहेत. यात इथेनॉल उत्पादनासाठी प्लांट उभारणाऱ्या साखर उत्पादक कंपन्यांना तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यां ज्या इथेनॉल प्लांट लावण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना कमी व्याजाच्य दराने कर्ज दिले जाईल. साखर उत्पादक कंपन्या उसाच्या मळीपासून तसेच उसाच्या रसापासून इथेनॉल बनवू शकतील. कर्जावर पहिली पांच वर्षे व्याजाच्या दरात ६% सूट दिली जाईल.

ज्युबिलण्ट फूडने प्रमोटर्सना ‘ज्युबिलण्ट’ या ब्रँडसाठी रॉयल्टी देण्याचा निर्णय रद्द केला. कारण हा निर्णय रद्द केला नसता तर म्युच्युअल फंडांनी या शेअरची विक्री केली असती. शेअर वाढला नाही कारण प्रमोटर्सचा हा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना पसंत पडला नाही.

PVR या कंपनीने त्यांची पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेमधील विस्तार योजना रद्द केली त्रिवेणी इंजिनीअरिंग या कंपनीने ‘शगुन’ या ब्रँड खाली आटा आणि मैदा मार्केट मध्ये लाँच केला.

सरकारने आपला ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील ७३.४७% स्टेक चार मोठ्या पोर्ट ऑथॉरिटीजना विकण्याची प्रक्रिया पूर्ण केली. या व्यवहारातून सरकारला Rs १०५० कोटी मिळाले.

FITCH या रेटिंग एजन्सीने JLR च्या विक्रीवर UK च्या ब्रेक्झिटचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन टाटा मोटर्सचे रेटिंग निगेटिव्ह केले.

हिंदुस्थान कॉपरने वायर रॉड ची किंमत ३% ने कमी केली.

हॅवेल्सने लॉईड्स AC ची नवीन सिरीज ‘ग्रँड’ या नावाने लाँच केली.

ग्लेनमार्क फार्माने ग्रँड फार्माबरोबर ‘RYALTRIS’ या औषधाची चीन मध्ये विक्री करण्यासाठी करार केला.

IDBI फेडरल लाईफ या IDBI च्या इन्शुअरन्स आर्ममध्ये IDBI बँकेचा ४८% स्टेक आहे. हा स्टेक विकत घेण्यात काही खाजगी बँकांनी स्वारस्य दाखवले आहे. ही स्टेकची विक्री IDBI बँकेला Rs ३००० कोटी ते Rs ३५०० कोटी मिळवून देऊ शकेल.

अल्केम लॅब च्या SAINT लुइस युनिटमध्ये USFDA ने ८ त्रुटी दाखवल्या.

युनायटेड हेल्थने केलेल्या प्राईस फिक्सिंगच्या आरोपाचा DR रेडीज या कंपनीने इन्कार केला.

DHFL या कंपनीवर व्हिसलब्लोअरने केलेल्या आरोपांची चौकशी प्रथम रजिस्ट्रार ऑफ कंपनीजचे ऑफिस करेल. या

ऑफिसने आपला रिपोर्ट दिल्यानंतर SFIO ( सिरीयस फ्रॉड इव्हेस्टिगेशन ऑफिस) चौकशी करेल असे MCA (मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स)ने जाहीर केले.

आज ल्युपिनने आपल्याला तिसर्या तिमाहीच्या निकालात Rs १५१ कोटी तोटा झाला असे जाहीर केले. कंपनीला ‘PERINDOBRIL’ या औषधाच्या बाबतीत झालेल्या कायदेशीर कारवाईमध्ये Rs ३४२ कोटी ONE टाइम लॉस झाला.
टेक महिंद्र, V -MART, शोभा, मिंडा इंडस्ट्रीज, वेंकीज, BLUE स्टार, वर्धमान टेक्सटाईल्स, मुथूट फायनान्स, ग्राफाइट इंडिया, सिमेन्स, S H केळकर, अडाणी पोर्ट्स, झायडस वेलनेस, JSW स्टील याचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल चांगले आले.
सिप्ला,गेटवे डिस्ट्रिपार्क यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल सर्वसाधारण आले.

बॉम्बे डाईंग ( फायद्यातून तोट्यात), टाटा केमिकल्स, मंगलोर केमिकल्स आणि फर्टिलायझर्स, अडानी पॉवर ( तोटा झाला), अलाहाबाद बँक ( तोटा कमी झाला पण NPA वाढले) यांचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

  • उद्या ब्रिटानिया, ऑरोबिंदो फार्मा, कॅडीला हेल्थकेअर, अडानी एंटरप्रायझेस, टाटा मोटर्स या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील.
  • उद्या सकाळी ११-४५ वाजता RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल. RBI नजीकच्या भविष्याविषयी, GDP विषयी, इन्फ्लेशनविषयी तसेच रेट कट विषयी काय धोरण अवलंबते यावर मार्केटचे लक्ष असेल. RBIचे नवीन गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या कडून मार्केटला बर्याच अपेक्षा आहेत.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६९७५, NSE निर्देशांक निफ्टी ११०६२ बँक निफ्टी २७४०२ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ५ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ५ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US $६२.४० प्रती बॅरल ते US $६२.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७१.५७ ते US $१=Rs ७१.८१ या दरम्यान होते. US$ निर्देशांक ९५.८५ तर विक्स १५.६६ होते.

ट्रेड वॉर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आज क्रूड वाढतच होते. रुपया घसरत होता. आणि मार्केटमध्ये फारसे व्हॉल्युम नव्हते. अगदी मोजके शेअर्स तेजीत होते. बाकी मार्केट मंदीतच होते असे म्हटले तर चालेल. वाडिया ग्रुपचे शेअर्स म्हणजे ब्रिटानिया, BBTC, नॅशनल पेरॉक्ससाईड, बॉम्बे डायिंग या कंपन्यांचे शेअर्स पडले.

टाटा मोटर्सची JLR विक्री १.४% ने घटली.

ज्युबिलण्ट फूड्स या कंपनीने GST मध्ये केलेल्या कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही म्हणून अँटी प्रॉफीटीअरिंग ऑथॉरिटीने कंपनीला Rs ४२ कोटी जमा करायला सांगितले. ज्युबिलण्ट फूड मध्ये प्रमोटर्स होल्डिंग ( भरतीया कुटुंबीय) ४५% आहे. कंपनी ज्युबिलंट या शब्दाचा वापर करत असल्यामुळे आणि हा शब्द ब्रँड असल्यामुळे प्रमोटर्सनी आपल्याला विक्रीच्या ०.५% रॉयल्टी मिळावी असे सांगितले आहे. वर्तमान विक्रीचा विचार केला तर या हिशेबाने कंपनीला Rs १५ कोटी रॉयल्टी द्यावी लागेल. ही कंपनी विक्रीच्या ३.३% रक्कम आधीच डॉमिनोज या कंपनीला फ्रँचाइज फी म्हणून देत आहे. या दोन्ही बातम्यांमुळे ज्युबिलण्ट फूड हा शेअर खूप पडला.

कोल इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी ४.४६ कोटी शेअर्स Rs २३५ प्रती शेअर्स या भावाने शेअर्स BUY बॅक करेल. कंपनी या BUY बॅक साठी Rs १०५० कोटी खर्च करेल.

सरकारने सेबीला रेटिंग एजन्सीजची जबाबदारी, पारदर्शकता,आणि योग्य वेळेला रेटिंग बदलण्याची जरुरी या बाबतचे नियम याबाबत अभ्यास करून नवीन नियम बनवायला सांगितले आहेत. आतापर्यंत बहुतांश केसेस मध्ये असे आढळून आले की रेटिंग एजन्सीजची ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी परिस्थिती असते. शेअर मार्केट,मार्केटमधील तज्ज्ञ, कर्ज देण्याऱ्या वित्तीय संस्था आणि काही वेळेला सरकारने या कंपन्यांबाबत काळजी व्यक्त केल्यावर रेटिंग एजन्सी जाग्या होतात आणि या कंपन्यांचे रेटिंग बदलतात. यामुळे किरकोळ गुंतवणूकदाराचे नुकसान होते त्यामुळे त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबीने यात लक्ष घालावे असे सरकारने सुचवले आहे.

दक्षिण भारतात सिमेंटचे भाव पोत्यामागे Rs ६० वाढवले त्यामुळे इंडिया सिमेंट, अल्ट्राटेक, रामको, ओरिएंट सिमेंट या कंपन्यांना फायदा होईल.

PNB या सार्वजनिक क्षेत्रातील ३ नंबरच्या सरकारी बँकेने आज आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँक लॉस मधून प्रॉफिट मध्ये आली. ग्रॉस NPA आणि नेट NPA यांच्यात थोडी सुधारणा झाली. NII वाढले आणि प्रोव्हिजन कमी करावी लागली. बँकेने गेल्या तिमाहीत Rs १६००० कोटींची वसुली केली.

ट्रेन्ट, CESC ( मार्जिन कमी झाले, Rs १७ प्रती शेअर अंतरिम लाभांश), कामत हॉटेल्स, ACC ( Rs १४ प्रति शेअर अंतरिम लाभांश) अपोलो टायर्स ( Rs ६० कोटींचा ONE टाइम लॉस) ट्यूब इन्वेस्टमेंट्स, गेल ( Rs ६.२५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), इनॉक्स लिजर, स्नोमॅन लॉजिस्टिक, टेक महिंद्रा, मेरिको ( Rs २.७५ प्रती शेअर अंतरिम लाभांश), टाटा ग्लोबल बेव्हरेजीस या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले.

सिम्फनी, सेंच्युरी प्लायवूड, BHEL,लक्ष्मी विलास बँक, यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल असमाधानकारक होते.

वेध उद्याचा

अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अलाहाबाद बँक, आर्चिज, सिप्ला, कमिन्स इंडिया, ग्राफाइट इंडिया, IGL, JSW स्टील, इंडियन ह्यूम पाईप, ल्युपिन, मुथूट, मन्नापुरम, PTC, सीमेन्स, वेंकीज या कंपन्या आपले तिसर्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६१६, NSE निर्देशांक निफ्टी १०९३४, बँक निफ्टी २७२७१ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

आजचं मार्केट – ४ फेब्रुवारी २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ४ फेब्रुवारी २०१९

आज क्रूड US #६२.६९ प्रती बॅरल ते US $ ६२.८८ प्रती बॅरल आणि रुपया US $१=Rs ७१.२४ ते Rs ७१.७७ या दरम्यान होते.

या आठवड्यात बहुतेक देशांच्या सेंट्रल बँकेच्या मीटिंग आहेत. USA चा फार्मरोल डाटा चांगला आला. ओपेक आणि रशिया क्रूडचे उत्पादन कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रूडचा भाव वाढत होता. USA चे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण वेळ आली तर आणीबाणी जाहीर करू असे सांगितले. आज चीन, तायवान, आणि कोरियाची मार्केट्स बंद होती. कोरियाचे मार्केट ६ फेब्रुवारी पर्यंत बंद राहील.

७ फेब्रुवारी २०१९ ला दुपारी ११-४५ वाजता RBI आपले वित्तीय धोरण जाहीर करेल

IDBI आणि एल आय सी च्या संदर्भात IDBI ऑफिसर्स असोसिएशनने केलेल्या अर्जाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज आहे.

ONGC आणि ऑइल इंडिया यांना सबसीडीचा वाटा उचलावा लागणार नाही त्यामुळे हे शेअर्स वाढले.

DHFL च्या प्रमोटर्सनी आधार हौसिंग फायनांसमधील आपला स्टेक विकणार असे सांगितले.

LAURS LAB च्या विशाखापट्टणम युनिटला USFDA कडून क्लीन चिट मिळाली.

RCOM या ADAG ग्रुपच्या कंपनीने NCLT मध्ये इंसॉल्व्हंसी साठी अर्ज केला. याचा परिणाम म्हणून ADAG ग्रुपचे सर्व शेअर्स पडले.

CYIENT ही IT क्षेत्रातील कम्पनी Rs ७०० प्रती शेअर या भावाने शेअर BUY बॅक करणार आहे. कंपनी यासाठी Rs २०० कोटी खर्च करेल. हा BUY बॅक ओपन मार्केट पद्धतीने केला जाईल.

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. टाटा मोटर्स आणि हिरो मोटो याची विक्री कमी झाली. TVS मोटर्सची विक्री ४%ने वाढली. बजाज ऑटो ची एकूण विक्री १५%ने वाढली. TWO व्हिलर्स ची विक्री २१% ने वाढली. निर्यातही वाढली.

आज कोल इंडियाची शेअर BUY बॅकवर विचार करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक होती.

NHPC ने J &K युटिलिटी बरोबर JV केले.

गॉडफ्रे फिलिप्स, MOIL, रामकृष्णा फोर्जिंग्ज, सिंडिकेट बँक ( ही बँक तोट्यातून फायद्यात आली), BEML, डिव्हीज लॅब, टायटन, इन्सेकटीसाईड इंडिया, कॅपॅसिटे इन्फ्रा, फर्स्ट सोअर्स इन्फॉर्मेशन, एक्साइड, टेक्सरेल, व्हर्लपूल या कंपन्यांचे तिसर्या तिमाहीचे निकाल चांगले आले. GSK फार्माचे तिसर्या तिमाहीचे निकाल ठीक आले.

ABN ऑफशोअर आणि IDBI बँक यांचे निकाल असमाधानकारक होते. IDBI बँकेच्या NPA च्या परिस्थिती किंचितशी सुधारणा दिसत असली तर NII समाधानकारक नव्हते..

HEG च्या BUY बॅक विषयी :-

२७ नोव्हेंबर २०१८ रोजी १३६३६३६ शेअर्स किंवा कंपनीच्या पेड अप कॅपिटलच्या ३.४१% शेअर्स Rs ५५०० प्रती शेअर या भावाने Rs ७५० कोटींचा शेअर BUY बॅक HEG (हिंदुस्थान ग्राफाइट) या कंपनीने जाहीर केला होता. या शेअर BUY बॅक ची रेकॉर्ड डेट ९ फेब्रुवारी २०१९ आहे. पण त्यावेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात महदंतर पडले आहे. कारण १६ ऑक्टोबर २०१८ रोजी शेअरची किंमत Rs ४९५५ होती. १४ डिसेंबर २०१७ रोजी शेअरचा भाव Rs १८४५ होता. याचा विचार करून BUY बॅक ची शेअर प्राईस Rs ५५०० ठरवली. ती योग्य होती. त्यामुळे हा शेअर BUY BACK कंपनी करेल की नाही यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याचा ऍक्सेप्टन्स रेशियो कमी आहे, प्रमोटर्सही BUY BACK मध्ये भाग घेतील. त्यामुळे आपल्याजवळ १० शेअर्स असतील तर आपल्याकडून जास्तीतजास्त १ शेअर BUY बॅक केला जाईल. आजची CMP Rs २३६९ आहे. या भावाने घेतलेले ९ शेअर्स तुमच्याकडे पडून राहतील. मार्केट मध्ये असलेल्या अस्थिरतेचा विचार करता शेअरचा भाव Rs २००० पर्यंत कमी होऊ शकतो त्यामुळे ह्या शेअरचा BUY बॅक फायदेशीर वाटत नाही. कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आणि इलेक्ट्रोड या त्यांच्या पक्कयामालाच्या किमती स्पर्धेमुळे कमी झाल्या. चीनही त्यांची उत्पादनक्षमता वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे स्पर्धा वाढून मार्जिनही कमी होईल. त्यामुळे गुंतवणूकदारांनी विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

MSTC (मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन) ह्या मिनिरत्न कंपनीने IPO साठी DRHP सेबीकडे दाखल केले.

साखरेचे उत्पादन १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या दरम्यान ८% जास्त झाले.

वेध उद्याचा

  • ACC, अपोलो टायर्स, BHEL,इनॉक्स लिजर, मेरिको, PNB, शोभा, सिम्फनी, ट्रेंट, V -मार्ट या कंपन्या आपले तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६५८२ वर NSE निर्देशांक १०९१२ वर बँक निफ्टी २७१८६ वर बंद झाले.

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!