Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका
आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch २७-२८एप्रिलला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!
आजचं मार्केट – २९ मार्च २०१९
आज क्रूड US $ ६७.९९ प्रती बॅरल ते US $ ६८.१९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.११ ते US $ १= Rs ६९.२० या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.१६ होता.
USA आणि चीनमधील टॅरिफ वॉर वरील वाटाघाटी सकारात्मक दिशेने प्रगती करत आहेत.
सरकारने नैसर्गिक वायूची किंमत एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या काळासाठी US $ ३.६९ प्रती MMBTU (METRIC MILLION BRITISH THERMAL UNIT) अशी ठरवली. या आधी ही किंमत US $ ३.३६ प्रती MMBTU होती. या नैसर्गिक वायूच्या किमतीतील वाढीचा फायदा ONGC, OIL, RELIANCE, MGL, IGL, अडाणी गॅस, पेट्रोनेट LNG, गुजरात गॅस यांना होईल. याचा तोटा पॉवर उत्पादन करणाऱ्या कंपन्या, टाईल्स, फर्टिलायझर्स उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांना होईल.
सरकार आता सर्व सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपन्यांचे DVR ( डिफरंशियल वोटिंग राईट्स) शेअर्स इशू करणार आहे. या शेअर्सना वोटिंग राईट्स नसतात तसेच DVR शेअर्सची किंमत कंपनीच्या रेग्युलर शेअर्स पेक्षा कमी असते. एक वोटिंगचा अधिकार सोडून बाकीचे सर्व फायदे मिळतात.
१ एप्रिल पासून GST मध्ये केलेले सर्व बदल लागू होतील. यामुळे रिअल्टी क्षेत्रातील कंपन्या, सिमेंट क्षेत्रातील कंपन्या तसेच गृह कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल.
आज F & O मधील एप्रिल सिरीजची सुरुवात झाली. एप्रिल २०१९ सिरीजचा आज पहिला दिवस होता. एप्रिल १८ ची सिरीज चांगली गेली होती. जवळ जवळ ५% रिटर्न या सीरिजने दिले होते.
आजपासून ब्रिटानिया इंडस्ट्रीज निफ्टीमध्ये समाविष्ट होईल आणि HPCL निफ्टीतुन बाहेर पडेल.
IDBI बँकेला LIC ने घेतल्यामुळे LIC त्यांची विमा प्रॉडक्टस IDBI बँकेमार्फत विकू शकते. या मुळे IDBI बँकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.
VARDE पार्टनर्सना PNB आपला PNB हौसिंग फायनान्स मधील १.०९ कोटी शेअर विकणार आहे. हा सौदा फारशा चांगल्या भावाला होत नाही आहे. PNB आपला ‘एक्स्पेरियन’ मधला स्टेक विकणार आहे.
MSTC या सरकारी कंपनीचे लिस्टिंग ४% डिस्कॉउंटवर म्हणजे Rs ११५ वर झाले.
TTK प्रेस्टिज या कंपनीने ५ शेअर्सवर एक बोनस शेअर जाहीर केला.
कोलगेट या कंपनीने Rs ७ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
आज व्होडाफोन आयडिया एक्स राईट्स झाली.
WABCO होल्डिंग या कंपनीला ZF ही कंपनी Rs ७ बिलियन ला खरेदी करणार आहे.
कॉग्निझंट या कंपनीचे प्रेसिडंट लार्सन आणि टुब्रो जॉईन करत आहेत.
इन्फोसिस ही कंपनी ABN AMRO बँकेच्या सबसिडीअरी मधील ७५% स्टेक यूरोज ५ मिलियन म्हणजे Rs ९८९ कोटींना घेणार आहे
वेदांता या कंपनीला कृष्णा गोदावरी बेसिनमध्ये ऑइल मिळाले.
गोवा विमानतळ बांधण्यासाठी GMR इन्फ्रा या कंपनीला सुप्रीम कोर्टाने परवानगी नाकारली.
बजाज फायनान्स या कंपनीने लक्ष्मी विलास बँकेत १.८९% स्टेक घेतला.
टाटा स्टीलने Rs ६४२ प्रती शेअर या भावाने टाटा मेटॅलिक्स मधील २८ लाख शेअर्स खरेदी केले.
जेट एअरवेजने लिक्विडीटी क्रंच मुळे ECB चे पेमेंट केले नाही तसेच HSBC कडून घेतलेल्या US $ १०९ मिलियन कर्जाचे रिपेमेंटही केले नाही.
वेध पुढील आठवड्याचा
- १ एप्रिल २०१९ रोजी ऑटो विक्रीचे आकडे येतील. तसेच GST मधील सुधारणा लागू होतील.
ऑटो क्षेत्रात BSVI नॉर्म्स लागू होतील. तसेच आपण आतापर्यंत आपल्याकडील फिझिकल फॉर्ममधील शेअर्स डिमटेरिअलाइझ्ड केले नसतील तर ते तुम्हाला विकता येणार नाहीत. - २ एप्रिलला मोंन्टेकार्लो या कंपनीच्या BUY बॅकची मुदत संपेल.
- ४ एप्रिल रोजी RBI आपले द्वैमासिक वित्तीय धोरण जाहीर करेल.. यावेळी RBI ०.२५% रेट कट करेल अशी सर्व तज्ज्ञाची अटकळ आहे.
- ५ एप्रिल २०१९ पासून टेक महिंद्राचा BUY बॅक इशू बंद होईल.
आता थोडेसे मार्केटविषयी.
आपण सहसा मार्केटच्या प्रवाहाविरुद्ध जाऊ नका. मार्केटने आपल्याला फसवले असा ग्रह करून घेऊ नका. तुम्हाला अनुकूल प्रवाहाची वाट पहा. आणि आपला फायदा करून घ्या. ‘TREND IS OUR FRIEND’ हे लक्षात ठेवा.
वर्ष २०१८-२०१९ साठी सेंसेक्स १७.११ % PSU बँक निर्देशांक १६.१८% निफ्टी १४.६२% तर बँक निफ्टी २५% वाढला. म्हणजेच हे वर्ष मार्केटला फायदेशीर गेले.
२९ मार्च २०१९ हा दिवस शेअर मार्केटसाठी वर्षातील. मार्च महिन्यातील आणि या आठवड्याचा शेवटचा दिवस तर एप्रिल सिरीजचा पहिला दिवस होता.
ACCENTURE या IT क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपनीचा निकाल चांगला आला. त्यानी पुढील वर्षांसाठी गायडन्सही चांगला दिला. यावरून IT क्षेत्रातील भारतीय कंपन्यांच्या वार्षिक निकालांविषयी आशावादी राहायला हरकत नाही
१ एप्रिल हा वित्तीय वर्ष २०१९-२०२० चा पहिला दिवस. हे येणारे वित्तीय वर्ष आपल्याला शेअर मार्केट आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यश, संपत्ती, समाधान आणि स्वास्थ्य देवो ही शुभेच्छा !
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३८६७२, NSE निर्देशांक निफ्टी ११६२३ बँक निफ्टी ३०४२६ वर बंद झाले.
भाग्यश्री फाटक
www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट
share करा पण क्रेडिट देऊन !!