आजचं मार्केट – १ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – १ मार्च  २०१९

आज क्रूड US $६६.५१प्रती बॅरल ते US $६६.७९ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.७६ ते US $१=Rs ७०.९७ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.२४ होता. आज मार्केटमधील मार्च सिरीजचा पहिला दिवस होता. मिडकॅपमध्ये तसेच सिमेंट,खते,मेडिया, IT या क्षेत्रात चांगले रोलओव्हर झाले. फेब्रुवारीचा रोलओव्हर ६१% झाला. मार्च सिरीजविषयी ट्रेडर्स आशादायी आहेत. या सिरीजमध्ये रिस्क रिवॉर्ड रेशियो चांगला असेल.

काल सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयामुळे साखर, EV उत्पादन करणाऱ्या कंपन्या, मायनिंग कंपन्या, इलेक्ट्रिक बॅटरी बनवणार्या कंपन्या तसेच अंतरिम लाभांश चांगला मिळेल म्हणून काही PSU कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढले.

ल्युपिनला त्यांची बोनमॅरोसाठी उपयोगात येणाऱ्या औषधाला USFDA ने परवानगी दिली. पण या औषधासाठीचे मार्केट खूप मोठे नाही US $ १० कोटी एवढेच आहे.

ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद युनिट IV च्या USFDA ने ३ डिसेंबर २०१८ ते १४ डिसेंबर २०१८ या काळात केलेल्या इन्स्पेक्शन मध्ये २ त्रुटी दाखवल्या.

CA EMARLD ने SBI लाईफ इन्शुअरन्सचे ९ कोटी शेअर्स खरेदी केले.

कॅस्ट्रोल इंडियाने फोर्ड बरोबर ऑईल इंजिन पुरवण्याचा करार केला.

REC या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने Rs ११ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला. यासाठी रेकॉर्ड डेट १२ मार्च २०१९ आहे.

अजंता फार्मा या कंपनीची शेअर BUY BACK २८ फेब्रुवारी २०१९ पासून १४ मार्च २०१९ पर्यंत ओपन राहील.

RITES या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची ११ मार्च २०१९ रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी बैठक बोलावली आहे

भारती एअरटेल ही टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी प्रती शेअर Rs २२० या भावाने राईट्स इशू आणणार आहे. आपल्याजवळ जर कंपनीचे ६७ शेअर्स असतील तर आपल्याला राईट्स इशूमध्ये १९ शेअर्स मिळू शकतील.

EPC इंडस्ट्रीजचे नाव बदलून महिंद्र EPC इंडस्ट्रीज असे ठेवले.

HDFC म्युच्युअल फंडाने सोनाटा सॉफ्टवेअरमध्ये २% स्टेक खरेदी केला.

SBI म्युच्युअल फंडाने टाटा मोटर्सचे ३८ लाख DVR शेअर्स खरेदी केले.

CEAT मध्ये आमंता होल्डिंगने स्टेक वाढवली.

मायनिंग पॉलिसी मध्ये मायनिंग उद्योगाला इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा दिला. याचा फायदा हिंदुस्थान कॉपर, वेदांता, डेक्कन गोल्ड आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांना होईल.

वेदांताला २०१४ या वर्षी गोव्यामध्ये एक झिंकची खान मिळाली होती. ती आता ऑपरेशनला होत आहे.

साखर उत्पादक कंपन्यांना त्यांच्या जवळ जेवढा साखरेचा स्टॉक असेल त्याचे व्हॅल्युएशन करून तेवढे कर्ज या कंपन्यांना मिळेल.

अरुण ३ प्रोजेक्ट मध्ये सरकार गुंतवणूक करणार आहे. याचा फायदा SJVN ला होईल.

अरविंद लिमिटेडमधून अनूप इंजिनीअरिंग ही कंपनी डीमर्ज झाली. आज या कंपनीचे BSE आणि NSE या स्टॉक एक्स्चेंजवर झाले. लिस्टिंग Rs ४७०च्या जवळपास झाले.

जेट एअरवेजची एकूण १३ विमाने विमानांचे भाडे न दिल्यामुळे ग्राउंड झाली. या कंपनीचे प्रमोटर हे कंपनीची मालकी सोडायला आणि त्यांचा या पुढे व्यवस्थापनात कोणताही सहभाग असणार नाही या दोन अटींना कबुल झाले. आता एतिहाद ही कंपनी जेट एअरवेजमधील स्टेक वाढवेल. ATF या विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीमध्ये ८.२% वाढ झाल्यामुळे विमानकंपन्यांची कॉस्ट वाढेल. आता एतिहाद ला ओपन ऑफर आण्याची गरज राहणार नाही

आज ऑटो विक्रीचे आकडे आले. मारुतीची देशांतर्गत विक्री १.३६ लाख युनिट तर एकूण विक्री १.४८ लाख युनिट झाली.
अशोक लेलँड ची विक्री १८२४५ युनिट्स झाली. देशांतर्गत विक्री १७३५२ झाली. M &HC वाहनांची विक्री १३२९१ युनिट्स झाली.

एस्कॉर्टसची विक्री १२% ने वाढली तर एक्स्पोर्ट्स ९२.८% ने वाढले. बजाज ऑटोची विक्री १०% आणि निर्यात १९% ने वाढली. महिंद्रा आणि महिंद्रा ची विक्री १०% ने वाढली. आयचर मोटर्सची विक्री ६.७%ने कमी झाली. SML ISUZU ची विक्री ३२.८% ने वाढून १२८१ युनिट एवढी झाली. अतुल ऑटो या कंपनीची विक्री १३.४% ने वाढून ११०६ युनिट झाली. यांच्या परिणामस्वरूप मारुती आणि अशोक लेलँड आणि आयचर मोटर्सचे शेअर्स पडले. याउलट एस्कॉर्टस, बजाज ऑटो, SML इसुझू, महिंद्रा आणि महिंन्द्रा, आणि अतुल ऑटो या कंपन्यांचे शेअर्स वधारले.

रामको सिमेंट या कंपनीच्या प्रमोटर्सनी २१ लाख शेअर्स गहाण ठेवले.

आज सेबीच्या बैठकीत म्युच्युअल फंडांना कमोडिटी वायडामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी परवानगी दिली गेली.

REITS InvITS मध्ये कोणत्याही प्रोजेक्टमध्ये ७०% पर्यंत गुंतवणूक करू शकते.

IBC मध्ये गेलेल्या कंपन्या विकत घेण्याच्या वेळी ओपन ऑफर आणण्याचे नियम बदलले. आता खरेदी करणाऱयांना ओपन ऑफर आणण्याची गरज नाही.

१ कोटीच्या व्यवहारावर Rs १० ब्रोकर फी मध्ये सूट मिळेल. आणि स्टॉक एक्स्चेंजच्या रेग्युलेटरी फी मध्ये ८०% ची सूट मिळेल.

BEL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीने ९ मार्च रोजी अंतरिम लाभांशावर विचार करण्यासाठी आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक बोलावली आहे.

ABB या कंपनीचा चौथ्या तिमाहीचा निकाल चांगला आला. कंपनीने Rs ४.८० प्रती शेअर लाभांश दिला.

JBM ऑटो ही कंपनी इलेक्ट्रिक बस बनवते सरकार कडून या कंपनीला सबसिडी मिळेल.

ADVANCE (अग्रीम) आयकर भरण्यासाठी शेअर मार्केटमध्ये ११ ते १२ मार्च पर्यंत विक्री करतात. त्यामुळे मार्केट पडण्याची शक्यता असते.

MRSS या मदर्सन सुमीच्या फुल्ली ओन्ड सबसिडीअरीने BOMBARDIER ट्रान्सपोर्टेशन ही मोबाईल सोल्युशन पुरवणारी कंपनी खरेदी केली

आज BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६०६३ NSE निर्देशांक निफ्टी १०८६३, बँक निफ्टी २७०४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

2 thoughts on “आजचं मार्केट – १ मार्च  २०१९

  1. संध्या बेले

    खुपच detail आणि महत्वाची,powerful information थैंक्स

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.