आजचं मार्केट – ५ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ५ मार्च  २०१९

आज क्रूड US $६५.०५ प्रती बॅरल ते US $६५.३९ प्रती बॅरल या दरम्यान रुपया US $१= ७०.४७ ते US $१=७०.९४ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.७१ होता.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिती थोडीशी निवळू लागली आहे. ही वादळापूर्वीची शांतता की वादळानंतरची शांतता हे मात्र माहीत नाही. सर्व राजकीय पक्ष्याची मोट बांधली जाणे दृष्टीपथात नाही. त्यामुळे तिहेरी लढती होतील थोड्या अधिक जागा मोदींना मिळतील आणि पंतप्रधानपदाच्या दुसर्या मुदतीसाटी पुन्हा नरेंद्र मोदी यशस्वी होतील असा मार्केटने अंदाज केला. त्यातच रुपया वधारला क्रूडचे दर कमी झाले. सोन्याचा दर हे Rs ३००ने कमी झाला आणि बुल्सना जोर आला.

USA आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉरचे भिजत घोंगडे तसेच आहे. पण ट्रम्पनी मात्र आपला मोर्चा भारताकडे वळवला. भारत आमच्या मालावर ड्युटी जास्त लावत आहे. येत्या ६० दिवसांत भारताने ही ड्युटी कमी केली नाही तर त्यांना GSP मधून बाहेर काढले जाईल.असा इशारा दिला. ट्रम्पच्या या विधानाकडे मार्केटने फारसे लक्ष दिले नाही. आज लार्जकॅप शेअरमधून बाहेर पडून स्वस्त्यात मिळणाऱ्या निवडक मिडकॅप आणि स्माल कॅप शेअर्सकडे मार्केटने मोर्चा वळवला असे जाणवले.

सेबीने कॉर्पोरेट DEBT रिस्ट्रक्चरिंगचे नियम कडक केले. जेट एअरवेजबाबतीत असे वाटले होते की ओपन ऑफर आणण्यापासून सुटका झाली. पण तसे नाही. फक्त लेंडर्सची सुटका ओपन ऑफरच्या नियमातून झाली. बाकीच्याना ओपन ऑफर आणावी लागेल.

११ मार्च २०१९ पासून निफ्टी IT ऑप्शनची साप्ताहिक एक्सपायरी सुरु होईल. निफ्टी IT मध्ये व्हॉल्युम कमी असतात. या साप्ताहिक ऑप्शनमुळे निफ्टी IT मध्ये लिक्विडीटी वाढेल.

शेल इंडिया सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन मधून बाहेर पडणार आहे. शेल इंडियाची हिस्सेदारी कोण खरेदी करणार आणि कोणत्या भावाला खरेदी करायची ह्यावर MGL ची पुढील हालचाल अवलंबून आहे.

USA चे अध्यक्ष ट्रम्प यांनी काल असे सांगितले की भारत USA मधून आयात होणाऱ्या मालावर खूप ड्युटी लावतो. त्यामुळे भारताला (जनरलाईज्ड सिस्टिम ऑफ प्रेफरन्सेस) मधून बाहेर केले जाईल याची दखल भारताने घ्यावी. या योजनेखाली काही भारतीय प्रॉडक्ट्स फ्री ऑफ ड्युटी USA मध्ये निर्यात होतात. भारत मुख्यतः ऍग्री प्रॉडक्ट्स, मसाले, पादत्राणे, झिंगे, ज्युवेलरी, गारमेंट्स आणि क्लोदिंग USA ला निर्यात करतो. भारताच्या अर्थसचिवांनी सांगितले की जरी असे झाले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. मार्केट थोडा वेळ मंदीत होते पण अर्थसचिवांच्या या खुलाश्यानंतर मार्केटवरील मळप दूर झाले आणि तेजी परत आली.

केंद्र सरकारनी वेदांताच्या बारमेर क्षेत्रात जो गॅस मिळतो तो GAIL या कंपनीने खरेदी करावा असे सांगितले.

आज टाटा मोटारीची विक्री USA मध्ये लँड रोव्हर ची विक्री १९%नी तर USA मध्ये जाग्वारची विक्री २९% आणि युरोप मध्येही विक्री वाढल्यामुळे टाटा मोटर्स आणि टाटा मोटर्स DVR हे शेअर्स तेजीत होते.

रिलायन्स इन्फ्राला AAI ( एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) कडून राजकोट विमानतळासाठी Rs ६४८ कोटींची ऑर्डर दिली.

ITC ने आपल्या विविध ब्रॅण्ड्स च्या सिगारेटचे भाव वाढवले.

RBI ने नियमांचा भंग केला म्हणून अलाहाबाद बँकेला Rs २ कोटी दंड केला.

IDBI बँकेच्या ‘टर्न अराउंड’ साठी LIC ने योजना सादर केली. यासाठी LIC ला IDBI फेडरलमधील आपला स्टेक १०% ने कमी करावा लागेल.

आंध्रच्या राज्य सरकारने २० सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची बैठक घेतली. या कंपन्यांनी सिमेंटच्या किमतीत Rs २० वाढ केली आहे.

गती या कंपनीचे प्रमोटर्स गतीमधील २४% स्टेक TVS लॉजिस्टीक्सला विकणार आहे.

MSTC (मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन) या नवरत्न कंपनीचा IPO येण्याची शक्यता आहे.

नॅशनल हौसिंग बँकेने हौसिंग फायनान्स कंपन्यांसाठी CAD ( कॅपिटल ADEQUACY) रेशिओ वाढवावा अशी सूचना केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६४४२ NSE निर्देशांक निफ्टी १०९८७ बँक निफ्टी २७५५४ वर बंद झाले

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – ५ मार्च  २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.