आजचं मार्केट – ६ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ६ मार्च  २०१९

आज क्रूड US $६५.३२ प्रती बॅरल ते US $ ६५.५७ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.५० ते US $१=Rs ७०.५४ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९६.९५ होता.

काल USA चे अध्यक्ष ट्रम्प भारत आणि तुर्कस्थानवर मोर्चा वळवला होता. आता ट्रम्पचे लक्ष जपानकडे गेले आहे. जपानने आपल्या येन या करन्सीमध्ये हवा तसा बदल करणे ट्रम्पना मान्य नाही. ट्रम्प यांनी असेही सांगितले की जर उत्तर कोरियाने डिन्यूक्लिअरायझेशनचा कार्यक्रम पार पाडला नाही तर उत्तर कोरियावर निर्बंध घालावे लागतील.कोणाच्याही धमक्यांना न घाबरता आज बुल्सनी उत्तम चढाई केली.बुल्सना क्रूड, रुपया आणि VIX या तिघांनीही साथ दिली. ७ फेब्रुवारी २०१९ नंतर निफ्टीने प्रथमच ११००० चा टप्पा पार केला एवढेच नाहीतर ११००० च्या वर निफ्टी आज क्लोज झाला.

आज मार्केटमध्ये चहा,साखर, आणि पेपर उद्योगातील शेअर्स तेजीत होते. तर IT क्षेत्रातील शेअर्समध्ये किंचित मंदी होती. काल प्रथम मार्केट पडले होते त्यामुळे’ रिस्क रिवॉर्ड रेशियो’ चांगला होता. क्रिकेटच्या भाषेत फुलटॉस होता त्यामुळे मार्केटने सिक्सर मारली. आज नव्याने एन्ट्री करणे योग्य नव्हते. सर्वांनी थोडे थोडे प्रॉफिट बुकिंग करावे, ‘TRAILING स्टॉप लॉसेस’ चा उपयोग करावा. सध्या Rs ५० पेक्षा कमी CMP असलेल्या शेअर्समध्ये तेजी सुरु झाली आहे.. त्यामुळे ट्रेडर्सनी ‘हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी’ असे करू नये कारण सध्या चालू असलेल्या तेजीच्या संगीत खुर्चीचे संगीत कधी थांबेल हे सांगता येत नाही.

११ मार्चला सुरु होणाऱ्या आठवड्यात निवडणूक आयोग सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे उद्या होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक असेल. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथेनॉल ब्लेंडींग, साखर कारखान्यांना इथेनॉल साठी दिल्या जाणार्या सॉफ्ट लोन मध्ये वाढ आणि कर्जावरील व्याजाच्या दरात सबसिडी देण्याचा विचार होण्याची शक्यता आहे.

सरकारचा ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील ७३.४७% स्टेक Rs ५१० प्रती शेअर या भावाने विशाखापट्टणम, दिन दयाळ उपाध्याय, जवाहरलाल नेहरू, पारादीप पोर्ट ट्रस्ट हे चार पोर्ट ट्रस्ट खरेदी करतील. आता या शेअरमध्ये ओपन ऑफर आणण्याची गरज नाही.

एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीची ऑफर फॉर सेल QIB साठी आजपासून सुरु झाली.उद्या ही ऑफर रिटेल इन्व्हेस्टर्स साठी ओपन होईल. फ्लोअर प्राईस Rs ११०० आहे. प्रमोटर्सचा स्टेक ८२.४% आहे. ते आपल्या या स्टेकपैकी ७.५% स्टेक विकणार आहेत. सेबीच्या नियमानुसार प्रमोटर्सचा स्टेक जास्तीतजास्त ७५% राहू शकतो त्यामुळे कंपनीला OFS आणणे भाग पडले. ( OFS या कॉर्पोरेट एक्शनविषयी सविस्तर माहिती माझ्या ‘मार्केट आणि मी’ या पुस्तकात दिली आहे.

क्विक हिल ही कंपनी Rs २७५ प्रती शेअर या भावाने ६३.६० लाख शेअर्सचा BUY बॅक करण्यासाठी Rs १७५ कोटी खर्च करेल.

ग्रासिम ही कंपनी एक होल्डिंग कंपनी असली तरी तिचे स्वतःचे व्यवसाय आहेत. ह्या कंपनीने ‘सोकटास इंडिया’ ही कंपनी Rs १६५ कोटींना खरेदी केली.

HDFC म्युच्युअल फंडाने अशोका बिल्डकॉन या कंपनीत २.०५ % स्टेक खरेदी केला.

मारुती लिमिटेड चे फेब्रुवारी २०१९ या महिन्यात उत्पादन ८.३% कमी होऊन १.४८लाख युनिट एवढे झाले. मारुती लिमिटेडने आपली नवी ‘S -CNG WAGON R’ ही कार बाजारात आणली.

DHFL या NBFC च्या बाबतीत कोब्रा पोस्टने जे आरोप केले होते ते रद्द झाले.

किरण अग्रवाल यांची हिंदुस्थान झिंक या कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.

टाटा कम्युनिकेशन ही कंपनी 5G सपोर्टसाठी IPX नेटवर्क लाँच करत आहे.

आपला माल निर्यात करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या ऍग्री एक्स्पोर्टसाठी होणारा वाहतुकीचा खर्च सरकार करेल याचा फायदा गुजराथ अंबुजा एक्स्पोर्ट या कंपनीला होईल.

एडेलवाईस या NBFC मध्ये पेन्शन फंड Rs १८०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. पेन्शन फंड दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करतात. एडेलवाईजच्या दृष्टीने हे चांगले आहे.त्यामुळे एडेलवाईसचा शेअर वधारला.

सेबीने सन फार्माकडे आदित्य मेडिसेल्सच्या माध्यमातून Rs ४२००० कोटी ट्रान्स्फर करण्याविषयी स्पष्टीकरण मागवले.

इंडियम ह्यूम पाईप या कंपनीला रायपूर नगर निगम कडून Rs २५५ कोटींच्या दोन ऑर्डर मिळाल्या.

उत्तर अमेरिकेत क्लास 8 ट्रकची विक्री ५८% ने कमी झाली. ट्रकसाठी ऑर्डर ४०२०० ट्रक्स वरून १६७०० ट्रक्स इतकी झाली. याचा परिणाम भारत फोर्जच्या शेअरवर झाला. .

कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची लाभांशावर विचार करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी बैठक आहे. कोल इंडियाच्या लाभांशाची रेकॉर्ड डेट २५ मार्च २०१९ असेल. NMDC या कंपनीची लाभांशावर विचार करण्यासाठी १२ मार्च २०१९ रोजी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६३६ NSE निर्देशांक निफ्टी ११०५३ बँक निफ्टी २७६२६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.