आजचं मार्केट – ७ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ७ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६६.१३ प्रती बॅरल प्रती बॅरल ते US $ ६६.२१ या दरम्यान तर रुपया US $१=Rs ७०.०० ते Rs ७०.०६ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९६.८८ होता.

भारतात निवडणुका असल्यामुळे नियमांमध्ये थोडी ढिलाई दिली जात आहे सवलतींची बरसात केली जात आहे .गेले तीन ते चार दिवस मार्केट तेजीत असल्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशियो योग्य नव्हता म्हणून बुल्सची पकडसुद्धा ढिली झाली. आज मार्केट निफ्टी ११०७८ ला तेजीत उघडले आणि ११०५८ ला बंद झाले.

ट्रम्प आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत असे दिसते. २०२० मध्ये USA मध्ये निवडणुका आहेत. ट्रम्प ‘मार्केट कसे चालले आहे’ याची चौकशी करत आहेत. म्हणजे आता मार्केट पडेल असे निर्णय ते घेणार नाहीत असे वाटते. युरोपियन सेंट्रल बँकेची पण आज बैठक आहे. फेडनेसुद्धा रेट वाढवण्यात पॉज घेतला आहे. ग्लोबल ग्रोथ मंदावत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसे टाकले पाहिजेत. आता जगातील सेंट्रल बँक थोडे नरमाईचे धोरण स्वीकारतील. USA ची ट्रेड डेफिसिट १० वर्षांच्या कमाल स्तरावर आहे. ब्रेक्झिटची प्रक्रिया तीन आठवड्यावर येऊन ठेपली आहे.

आज मंत्रिमंडळाची महत्वाची आणि शेवटची बैठक होती. निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल. त्यानंतर आचार संहिता लागू होईल. आचार संहिता लागू झाल्यानंतर सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाही.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले

(१) इथेनॉल उत्पादन, प्लांट उभारणी या करता सॉफ्ट लोन देण्यासाठी सरकारने Rs १५००० कोटींची तरतूद केली . या सॉफ्ट लोनवर कमाल ५% व्याज आकारले जाईल.
(२) सरकारने तोट्यात चालणाऱ्या थर्मल पॉवर प्रोजेक्टना काही सवलती दिल्या.
(३) हैड्रो पॉवर प्रोजेक्टना रिन्यूएबल एनर्जी सेक्टरचा दर्जा दिला. त्यामुळे त्यांना कर्ज उभारणे सोपे जाईल.
(४) इलेट्रीकल व्हेहिकलसाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी मंजूर केली. याचा फायदा एक्साईड, अमर राजा बॅटरी, यांना होईल.
(५) चिनार व्हॅली प्रोजेक्ट साठी NHPC ला तर बक्सार येथे १३२० MV थर्मल प्रोजेक्टसाठी NTPC ला मंजुरी दिली.

टेक्सटाईल सबसिडी योजनेची मुदत Rs ६३०० कोटी गुंतवणुकीसकट ३ वर्षे वाढवली. तसेच या सब्सिडीसाठी योग्य अशा वस्तूंची संख्या वाढवली. त्यामुळे आता टेक्सटाईल आणि गारमेंट सेक्टरची बर्याच करातून सुटका होईल.याचा फायदा लक्स, रूपा, डॉलर, अरविंद ,सेंच्युरी आणि रेमंड या कंपन्यांना होईल

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने आज फॉक्सवॅगन या कंपनीला कमी प्रदूषण दाखवणारी सिस्टिम कारमध्ये बसवण्याबाबतीत Rs ५०० कोटी दंड केला. दोन आठवड्यात हा दंड भरण्यास सांगितले.

USFDA ची कमिशनर श्री SCOTT GOTTLIEB यांनी आज दोन वर्षांनंतर अचानक राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे भारतीय फार्मा क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली. नव्या येणाऱ्या कमिशनरचा जनरिक ड्रग प्राइसिंग,औषधाना मंजुरी देण्याची गती, आणि रेग्युलेटरी इन्स्पेक्शन या बाबतीत काय पवित्रा असेल याबाबत अंदाज येत नाही म्हणून फार्मा क्षेत्रातील शेअर्स आज मंदीत होते.

बायोकॉनच्या बंगलोर प्लांटची तपासणी USFDA ने केली. त्यात ६ त्रुटी दाखवल्या. या प्लांटमध्ये ओरल इन्शुलिन बनवतात.
मार्कसन फार्माच्या गोवा युनिटचे USFDA ने इन्स्पेक्शन केले. त्यांनी ८ त्रुटी दाखवल्या. अरविंदमधून ज्या कंपन्या बाहेर पडल्या त्यापैकी अनूप इंजिनीअरिंगचे लिस्टिंग झाले. उद्या अरविंद फॅशनचे लिस्टिंग होणार आहे.

रिलायन्स कॅपिटल Rs १२००० चे कर्ज दोन ते तीन महिन्यात फेडेल. सध्या कंपनीवर Rs १८००० कोटींचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी रिलायन्स NIPONमधील ४३% आणि रिलायन्स जनरल इन्शुअरन्समधील स्टेक विकणार आहे.
टेक सोल्युशन या कंपनीला BSE ने ‘B’ ग्रुपमधून ‘A’ ग्रुप मध्ये टाकले.

पॉवर ग्रिडने Rs ५.८३ प्रती शेअर तर HDFC STANDARD लाईफ ने Rs १.६३ प्रती शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला.
टाटा मोटर्सच्या व्यवस्थापनाने पुढील दोन वर्षांसाठी चांगले संकेत दिले. एकदा चार्ज झाल्यावर ३०० किलो मीटर जाऊ शकेल अशा इलेक्ट्रिक बसेस मार्केटमध्ये आणणार आहेत. ७ सीटरची SUV बाजारात आणणार आहेत. तसेच आपला JLR मधील स्टेक विकण्याचा विचार नाही असे सांगितले.

महिंद्रा लाईफ स्पेस ने पुण्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट लाँच केली.

होंडाने आज आपली ‘CIVIC’ ही नवी कार लाँच केली.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६७२५ NSE निर्देशांक निफ्टी ११०५८ वर बँक निफ्टी २७७६४ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

2 thoughts on “आजचं मार्केट – ७ मार्च  २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.