आजचं मार्केट – ८ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आपल्या शेअर मार्केट च्या क्लास ची पुढची batch ९-१० मार्चला आहे. अधिक माहिती तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळेल – https://wp.me/pa5o7Y-NB . हा कोर्से फक्त ५ जणांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला तुमची जागा कन्फर्म करायची असेल तर या पोस्ट वर कंमेंट किंवा फेसबुक वर message करा. मी तुम्हाला payment details पाठवीन. तुम्ही तुमची seat Rs १००० pay करून कन्फर्म करू शकता. Seats first come first serve या तत्त्वांवर देण्यात येतील!!

आजचं मार्केट – ८ मार्च  २०१९

आज क्रूड US $६५.२४ प्रती बॅरल ते US $ ६५.५३ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८२ ते US $१=७०.२१ या दरम्यान होते. US $ निर्देशांक ९७.३७ होता.

खरे पाहता आज ग्लोबल मार्केट्स मंदीतच होती. ECB ने आपला ग्रोथबद्दल असलेला अंदाज कमी केला. आणि मंदीची शक्यता वर्तवली. पण भारताच्या दृष्टीने वधारलेला रुपया आणि क्रूडच्या भावामध्ये आलेले स्थैर्य यामुळे मार्केटमध्ये खूप किंवा जाणवण्यासारखी मंदी आली नाही. पण ११००० चा टप्पा गाठताना आलेली मार्केटची थकावट दूर व्हायला थोडा वेळ लागेलच. थोडे टाईम करेक्शन झाल्यावर मार्केट आपली दिशा ठरवेल. FII चा पैसा मार्केटमध्ये येतो आहे. मार्केटमध्ये वातावरण सकारात्मक आहे. निफ्टीमधील तेजी थांबली असली तरी मिडकॅप, स्माल कॅप मध्ये तेजी आहे. आज हॉटेल क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी होती काल निफ्टीमध्ये तयार झालेला हँगिंग मॅन पॅटर्न हीच स्थिती दर्शवतो आहे.

अजीज प्रेमजी यांनी विप्रोचे २.६७ कोटी शेअर्स विकले. त्यामुळे विप्रोचा शेअर मंदीत होता.

जेट एअरवेजची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे. त्यांच्या ११९ विमानांपैकी ५२ विमाने ग्राउंड झाली आहेत. एतिहादने स्टेक घेण्याबाबत पुन्हा माघार घेतली. ११ फेब्रुवारी २०१९ रोजी जेट एअरवेज ची एतिहाद बरोबर बैठक आहे. त्यात काहीतरी तोडगा निघेल अशा आशेवर मार्केट आहे.

ONGC ला राजस्थानमधील ‘चिंनेवाला तिब्बा’ गॅस फिल्ड मिळाले.

लक्ष्मी विलास बँकेचा QIP Rs ६५.९६ प्रती शेअर या भावाने झाला.

अरविंद फॅशन ही अरविंद लिमिटेड मधून डीमर्ज झालेल्या कंपनीचे आज Rs ५९१ ला लिस्टिंग झाले.

ग्रॅनुअल्स या कंपनीच्या प्रमोटरनी ५० लाख शेअर्स विकले.

RBI ने UCO बँकेला स्विफ्ट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल Rs ३ कोटी दंड केला.

ED (एन्फोर्समेंट डायरेकटोरेट) ने गॉडफ्रे फिलिप्स ची तपासणी सुरु केली. फिलिप मॉरिस यांनी नियमांकडे दुर्लक्ष केले म्हणून ही कारवाई चालू आहे.

CERC ने FY २०२० ते FY २०२४ या वर्षांसाठी पॉवर टॅरिफ रेग्युलेशन जाहीर केले. ‘PEEK HOURS’ मध्ये पॉवर कंपन्यांसाठीचे इन्सेन्टिव्ह वाढवले. थर्मल पॉवरसाठी ROE रेट १५.५% कायम ठेवला.

अशोक लेलँड या कंपनीला गुजरात रोडवेज कडून १२९० बससाठी ऑर्डर मिळाली.

ज्युबिलण्ट लाइफला रुरकी युनिटसाठी चेतावणी पत्र जारी केले.

वरुण बिव्हरेजीसच्या पंजाब युनिटमध्ये ट्रायल प्रॉडक्शन सुरु झाले.

सरकार SUUTI मधील L &T चे शेअर्स विकणार आहे.

आता थोडे शेअरमार्केटमध्ये भावनेचा परिणाम कसा होतो ते बघू. हिंदुस्थान लिव्हर या मल्टिनॅशनल कंपनीने आपली ब्रूक बॉण्ड रेड लेबल चहासाठी जाहिरात दिली. त्यात एक तरुण आपल्या वृद्ध बापाला कुंभ मेळ्यात कायमचा सोडून देण्यासाठी येतो. काही वेळाने त्याला पश्चात्ताप झाल्यावर तो बापाला शोधतो आणि दोघेजण ब्रूक बॉण्ड रेड लेबल चहाचा आस्वाद घेऊन आपले पुनर्मीलन साजरे करतात. या जाहिरातीत कुंभमेळ्यामध्ये वृद्ध माणसे आणि लहान मुले यांना सोडून देतात असे सूचित केल्यामुळे HUL विरुद्ध एकच गदारोळ माजला. HUL ने नंतर मुलगा आणि बाप यांच्यातील संवाद (कॅप्शन) बदलला. पण म्हणतात नं! ‘बूंदसे गयी वो हौदसे नही आती’ असा काहीसा प्रकार झाला. बर्याच लोकांनी सोशल मीडियावर HUL च्या प्रॉडक्टवर बहिष्कार घाला असे आवाहन केले आहे. हे जाहिरातीचे प्रकरण कोठपर्यंत ताणले जाईल हे माहीत नसल्यामुळे ट्रेडर्सनी शेअर्स विकून टाकले असावेत. शेअरमार्केटने हा लोकभावनेचा धागा पकडला आणि HUL चा शेअर पडायला सुरुवात झाली.आणि पडत राहिला. म्हणजेच शेअरचा भाव हा आर्थीक, राजकीय, भौगोलिक, सामाजिक अशा सर्व गोष्टींवर अवलंबून असतो. पण भाव वाढला किंवा कमी झाला तर आपण त्याचे कारण शोधले पाहिजे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३६६७१ NSE निर्देशांक निफ्टी ११०३५ बँक निफ्टी २७७६१ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – ८ मार्च  २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.