आजचं मार्केट – ११ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – ११ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६६.०१ प्रती बॅरल ते US $६६.४१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.८४ ते US $१=Rs ७०.०० या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९७.३५ होता.

जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. USA मध्ये जॉब डेटा खराब आला. चीन आणि USA मध्ये क्रूडला वाढती मागणी आहे. क्रूडचा दर US $६५ प्रती बॅरल ते US $६६ प्रती बॅरल या दरम्यान आहे.
आज निफ्टी आणि बँक निफ्टीच्या साप्ताहिक एक्स्पायरी बरोबर निफ्टी IT ची साप्ताहिक एक्स्पायरी सुरु झाली. या तिन्ही निर्देशांकांची साप्ताहिक एक्स्पायरी या आठवड्यात १४ मार्च २०१९ रोजी असेल.

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांतील वेगवेगळ्या राज्यातील मतदानाच्या तारखा जाहीर केल्या. ११ एप्रिल २०१९ ला मतदान सुरु होऊन ते सात फेऱ्यांनंतर १९ मे २०१९ रोजी शेवटची मतदानाची फेरी संपल्यावर संपेल. २३ मे २०१९ रोजी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत ३८ दिवस लागणार आहेत या तारखा जाहीर झाल्यावर मार्केटमध्ये निवडणूक रॅली सुरु झाली. निफ्टी मध्ये कन्सॉलिडेशन आहे पण बँक निफ्टी मात्र स्ट्रॉंग आहे. निफ्टी ११५०० पर्यंत निवडणुका संपेपर्यंत जाऊ शकेल अशी शक्यता मार्केट मधील तज्ज्ञ वर्तवत आहेत. बँक निफ्टी २८००० ओलांडेल असा अंदाज आहे.

१५ मार्च २०१९ ही ऍडव्हान्स आयकर भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे १५ तारखेच्या जवळपास मार्केटमध्ये विक्री होण्याची शक्यता आहे.DII आणि FII मार्केटमधून पैसे काढतील. त्या नंतर पुन्हा मार्केटमध्ये पैसा यायला सुरुवात होईल.
मार्केट गोल्ड पॉलिसीची वाट पहात होते. पण ११ मार्च २०१९ पासून निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाल्यामुळे आता नवीन सरकार स्थापन होईपर्यंत वाट पाहावी लागेल

टाटा मोटर्सचा भाव काही दिवस Rs १७५ प्रती शेअर ते Rs २०० प्रती शेअर या रेंजमध्ये राहील असा अंदाज आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने १ मे २०१९ पासून आपल्या Rs १.०० लाख आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या डिपॉझिट आणि ओव्हरड्राफ्टवरील व्याजाचा दर रेपोरेट वर आधारित असेल असे सांगितले. सध्या रेपोरेट ६.२५% आहे. SBI च्या या निर्णयामुळे त्यांचा मार्केट शेअर वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चितोडगढच्या एरियामध्ये NGT ने मायनिंग बॅन केले आहे. याचा परिणाम बिर्ला कॉर्पवर होईल.

मंगलम टिम्बर आणि मंगलम सिमेंट यांचे मर्जर होणार आहे.

शारदा मोटर्स आपला शिपिंग कारभार डीमर्ज करणार आहे.

IDBI बँक ही लाईफ इन्शुअरन्स आणि AMC मधील आपला स्टेक विकणार आहे.

एस्सार स्टीलसाठीची बोली आर्सेलर मित्तल यांनी जिंकली. याचा फायदा या कंपनीला कर्ज देणाऱ्या एडेलवाईस, कॅनरा बँक, IDBI आणि कन्सॉरशियममधील इतर कर्ज देणाऱ्यांना होईल.

जेट एअरवेजला PNB कडून Rs २०८० कोटी कर्ज मिळण्याची शक्यता आहे.

मॅकलाईड रसेल ही चहाच्या व्यवसायात असलेली कंपनी आसाममधील बोराई टी इस्टेटमधील पूर्ण स्टेक विकून टाकणार आहे. जरी या विक्रीमधून कंपनीला पैसे मिळणार असले तरी उत्पन्नाचा मुख्य स्रोत नाहीसा झाल्यावर कंपनीचे पुढे काय होणार हा प्रश्नच आहे.

नीती आयोगाने सरकारला MTNL ही सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनी पुनर्जीवित करण्याची शक्यता नसल्यामुळे बंद करण्याची शिफारस केली आहे. तसेच या कंपनीची मालमत्ता विकण्याची शिफारस केली आहे.

सरकारने ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील आपला स्टेक चार पोर्ट ट्रस्टना Rs ५३० प्रती शेअर या भावाने विकून टाकला.

तांत्रिक विश्लेषणाविषयी

गोल्डन क्रॉस :- हा कँडलस्टिक पॅटर्न आहे आणि तेजीचा संकेत देतो. शॉर्ट टर्म मूव्हिंग एवरेजसची रेषा लॉन्ग टर्म DMA च्या रेषेला छेदून वरच्या दिशेला जाते. याला बुलिश क्रॉसओव्हर असे म्हणतात. पण ज्यावेळी या रेषा एकमेकीला छेदतात तेव्हा व्हॉल्युम जास्त असले पाहिजेत. आज असे युनियन बँकेच्या शेअरच्या बाबतीत घडले. युनियन बँकेचा २०० DMA ८०.८३ आणि ५० DMA ८१ आहे. त्यामुळे ५० DMA च्या रेषेने २०० DMA च्या रेषेला वरच्या दिशेने क्रॉस केले. यामुळे गोल्डन क्रॉस तयार झाला. बाकी सर्व गोष्टी सारख्या राहिल्या तर गोल्डन क्रॉसच्या सिद्धांताप्रमाणे तेजीची शक्यता नाकारता येत नाही. शेअर मध्ये किंवा निर्देशांकांत गोल्डन क्रॉस झाल्यास बेअर मार्केट संपून बुल मार्केट सुरु होण्याची चिन्हे दिसतात.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७०५४ NSE निर्देशांक निफ्टी १११६८ बँक निफ्टी २७९६६ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

One thought on “आजचं मार्केट – ११ मार्च  २०१९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.