आजचं मार्केट – १२ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १२ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६६.६५ प्रती बॅरल ते US $६७.२१ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.५१ ते US $१=Rs ६९.८८ या दरम्यान होते. US $निर्देशांक ९७.०९ होता. VIX १४.९१ होता. फीअर आणि ग्रीड मीटर ७८ होते. हे रिडींग लोकांची मार्केटविषयीची अनिश्चितता आणि भीती नाहीशी होऊन तेजीची चिंन्हे दर्शवते. 

आज GOOGLE DOODLE वर्ल्ड वाईड वेबचा ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. आपणही हॅपी बर्थडे WWW म्हणू या कारण हल्ली आपले प्रत्येक मिनिट त्यावरच अवलंबून आहे.

फेब्रुवारी २०१९ साठी CPI २.५७% ९ (जानेवारीमध्ये २.०५%) म्हणजेच महागाई वाढली आणि उत्पादन कमी झाले. त्यामुळे RBI आणखी एकदा रेट कट करण्याची शक्यता निर्माण झाली. आज बँक निफ्टीनेआणि सेन्सेक्सने ऑल टाइम हायचे रेकॉर्ड करून ब्ल्यू स्काय टेरिटरीत प्रवेश केला. निफ्टी PSU बॅंक्स आणि बँक निफ्टी मध्ये खूप फरक पडला. म्हणून PSU बँक निर्देशांकात CATCH UP रॅली आहे. FII ने काल खूपच खरेदी केली.

ब्रेक्झिटविषयी काही सकारात्मक हालचाल होत आहे.

१९ मार्च २०१९ रोजी GST कौन्सिलची बैठक आहे. या बैठकीत सामान्य माणसापर्यंत GST कौन्सिलच्या निर्णयांचा फायदा कसा पोहोचवता येईल यावर प्रामुख्याने विचार होईल.

जानेवारी २०१९ साठी IIP १.७% ( डिसेंबर २०१८ मध्ये २.४%) झाले. अनुमान २.२% चे होते.

आज गुजरात बेस असलेल्या कंपन्यांकडे मार्केटचे लक्ष होते. उदा GMDC, GSFC,GNFC, गुजरात गॅस, गुजरात पेट्रोनेट, PSP प्रोजेक्ट्स, अडानी ग्रुपचे शेअर्स.

स्टॅंडर्ड लाईफ आपला HDFC स्टॅंडर्ड लाईफ मधला ३.४७% स्टेक १२ मार्च २०१९ आणि १३ मार्च २०१९ रोजी विकणार आहे. फ्लोअर प्राईस Rs ३५७ ठरली आहे. जर OFS ला चांगला प्रतिसाद मिळाला तर स्टॅंडर्ड लाईफ आणखी २.९५ कोटी शेअर्स म्हणजेच १.४६% शेअर OFS मधून विकेल.

नाल्कोच्या अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट १२ मार्च २०१९ आहे. हा अंतरिम लाभांश ३१ मार्च २०१९ पर्यंत खात्यात जमा होईल.

सुंदरम क्लेटन या TVS ग्रुपच्या कंपनीने Rs १६ प्रती शेअर अंतरिम लाभांशाची घोषणा केली. या अंतरिम लाभांशासाठी १९ मार्च २०१९ ही रेकॉर्ड डेट आहे. मार्च २२ २०१९ पर्यंत लाभांश खात्यात जमा होईल.

पिरामलने मिटोगो इंजेक्शन बाजारात आणले.

PNB ने त्यांची बँक जेट एअरवेज या कंपनीला Rs २०८० कोटी कर्ज देणार आहे या बातमीबाबत असे स्पष्टीकरण दिले की जेट एअरवेजला कर्ज देणार्या कन्सॉरशियमची लीड बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे आम्ही जेट एअरवेजला कर्ज देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रमोटर्स बाहेर पडल्याशिवाय जेटच्या बाबतीत काही प्रगती होणार नाही असे मार्केटला वाटते. जेट एअरवेजने एतिहादकडे Rs ७५० कोटींसाठी विनंती केली आहे. DGCA च्या आदेशानुसार सर्व बोईंग ७३७ ग्राउंड झाली. इथिओपियात या विमानाला झालेल्या अपघातानंतर DGCA ने ही कार्यवाही केली.

KEC इंटरनॅशनल या कंपनीला Rs १३२३ कोटीची ऑर्डर मिळाली.

ऑरोबिंदो फार्माच्या हैदराबाद येथील युनिट नंबर ४ ला क्लीन चिट दिली.

नालंदा इंडिया इक्विटी फंड नेहेमी मोठा स्टेक दीर्घ मुदतीकरता घेतात. आज या फंडाने मॅट्रिमोनी डॉटकॉम मध्ये खरेदी केली.

NIIT आणि माईंड ट्री या दोन कंपन्यात मोठे डील होण्याची शक्यता आहे.

मॉन्सॅन्टोला भारतीय कंपन्यांनी द्यायची रॉयल्टी चार वर्षांतुन तीनवेळा कमी केली. आज ही रॉयल्टी ४९%नं कमी केली. ही रॉयल्टी Rs ३९ वरून Rs २० केली.

भारती एअरटेलचा भारती इंफ्राटेलमधील ३२% स्टेक NITTLE इन्फ्रा खरेदी करणार आहे

टायटननी FTS USA बरोबर घड्याळे बनवण्यासाठी करार केला.

महिंद्रा CIE ऑटोच्या औरंगाबाद इलेक्ट्रिकल्सच्या खरेदीसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी मंजुरी दिली.

नजीकच्या भविष्यात येणारे IPO

MSTC (मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन) या सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी कंपनीचा IPO
(प्राईस बँड Rs १२१ ते Rs १२८) १३मार्च ते १५ मार्चच्या दरम्यान ओपन राहील. या IPO द्वारे Rs २२६ कोटी जमा होतील. मिनिमम लॉट ९० शेअर्सचा असून किरकोळ गुंतवणूकदारांना Rs ५.५०डिस्कॉउंट आहे

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७५३५ NSE निर्देशांक निफ्टी ११३०१ बँक निफ्टी २८४४३ वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.