आजचं मार्केट – १४ मार्च  २०१९

Like करा, शेअर करा आणि अवघ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचावा. रोजचं मार्केट विश्लेषण मिळवण्यासाठी आमचा blog subscribe आणि फेसबुक page like करायला विसरू नका

आजचं मार्केट – १४ मार्च  २०१९

आज क्रूड US $ ६७.८० प्रती बॅरल ते US $ ६७.८८ प्रती बॅरल या दरम्यान तर रुपया US $१=Rs ६९.५४ ते US $१=Rs ६९.६६ या दरम्यान होता. US $ निर्देशांक ९६.५२ होता. पुट/कॉल रेशियो १.३८ होता.

USA मधील क्रूडच्या उत्पादनात ३९ लाख बॅरलची घट झाली. ओपेक ने क्रूड उत्पादनात कपात केल्यामुळे क्रूडचा भाव ४ महिन्याच्या कमाल स्तरावर होता. UK आता कोणत्याही डील किंवा कराराशिवाय (युरोपियन युनियन मधून बाहेर पडणार) ब्रेक्झिट करणार हे आता जवळजवळ निश्चित झाले.

FII आणि इतर विदेशी इन्व्हेस्टर भारतामध्ये गुंतवणूक (यात शेअरमार्केटमधील गुंतवणूक आली) करत असल्यामुळे परदेशी चलनाचा ओघ भारतात येत आहे. त्यामुळे रुपया मजबूत होत आहे. कार्यक्षमता कमी होते. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आपली स्पर्धा करण्याची क्षमता कमी होते. निर्यात कमी होऊ लागते.आणि आयात वाढते. रुपया आणखी मजबूत होऊ नये यासाठी RBI ने आज स्वॅप विंडो उघडली.

तांत्रिक विश्लेषणाविषयी

काल निफ्टीमध्ये हँगिंग मॅन पॅटर्न तयार झाला होता.या मध्ये एकच कँडल असते. हा रिव्हर्सल पॅटर्न आहे. हा पॅटर्न हातोड्यासारखा दिसतो. हा पॅटर्न मंदी नंतर तयार झाल्यास याला हॅमर म्हणतात. आणि तेजीनंतर तयार झाल्यास हँगिंग मॅन म्हणतात. १ मार्च २०१९ पासून १३ मार्च २०१९ पर्यंत मार्केट ४७९ पाईंट वाढली. त्यामुळे करेक्शन गरजेचे होते. काही काळ मार्केट याच ठिकाणी स्थिरावले पाहिजे. कालपासून मार्केटमधील तेजीला थोडा अटकाव झाला असे दिसत आहे. हेच हा पॅटर्न दाखवत आहे.

आज निफ्टी ऑप्शन, बँक निफ्टी ऑप्शन आणि निफ्टी IT ऑप्शन यांची साप्ताहिक एक्स्पायरी होती.

काल HDFC बँकेच्या शेअरने Rs ६ लाख कोटी मार्केट कॅपिटलायझेशनची मर्यादा पार केली. रिलायन्स आणि टी सी एस नंतर HDFC बँक ही अशी तिसरी कंपनी आहे.

आज WPI चे आकडे जाहीर झाले. फेब्रुवारी २०१९ साठी WPI ( होलसेल प्राईस इंडेक्स) २.९३% ( जानेवारी २०१९ मध्ये २.७६%) राहिला. किरकोळ महागाई बरोबरच घाऊक बाजारातली महागाईही वाढली. अन्नधान्य, ऊर्जा इंधन यांची महागाई वाढली.

आज ज्युबिलंट फूडच्या प्रमोटर्सनी ४० लाख शेअर्सच्या ब्लॉक डीलसाठी फ्लोअर प्राईस Rs १२७२ प्रती शेअर ठरवली होती. हे शेअर्स Rs १३१२ प्रती शेअर या भावाने विकले गेले. अशा मोठ्या ट्रेडला ब्लॉक डील किंवा बल्क डील असे म्हणतात. क्लोजिंग प्राईसच्या १%+ते १%- या रेंजमध्ये शेअरची किंमत ठरवलेली असते. ब्लॉक डीलचा व्यवहार पार्टली होत नाही. ५ लाख शेअर्स किंवा Rs ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहाराला ब्लॉक डील असे म्हणतात.त्यासाठी स्पेशल ट्रेडिंग विंडो उघडली जाते. फक्त डिलिव्हरी ट्रेड होतो. ही विंडो सकाळी ९-१५ ते ९-५० या दरम्यान ओपन असते ५ लाखापेक्षा कमी संख्येच्या शेअरचा किंवा Rs ५ कोटीपेक्षा कमी रकमेच्या व्यवहाराला बल्क डील असे म्हणतात.

ल्युपिनच्या मन्डीदीप युनिटला USFDA ने वार्निंग दिली. ल्युपिनला ४%-५% उत्पन्न या युनिटमधून मिळते.

DCM श्रीरामचा एक पॉवर प्लांट (३० MW ) चा आज सुरु झाला.

स्टार सिमेंटला सबसिडी मिळाली.

मार्केटमध्ये एवढी तेजी आहे तर खरेदीविक्री वाढेल याचा फायदा ब्रोकर्सना होईल. ब्रोकिंगचा बिझिनेस असलेल्या शेअर्सकडे लक्ष ठेवावे. उदा :- एडेलवाईस, ICICI सिक्युरिटीज, JM फायनांशियल.

ब्ल्यू स्टार कंपनीने AC ची ७५ नवी मॉडेल बाजारात आणली. नवीन एअर प्युरिफायर ( किमतीची रेंज Rs ८९९० ते Rs Rs २३९९०) बाजारात लाँच केली.

दाइचीने सिंग बंधूंकडून (फोर्टिस हॉस्पिटलचे प्रमोटर्स) Rs ३५०० कोटी नुकसानभरपाई मागितली. कोर्टाने सिंग बंधूंना हे पेमेंट कसे करणार त्याची डिटेल्स सादर करावयास सांगितली.

BSE (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) लिमिटेड च्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची बैठक ७मे २०१९ रोजी आहे. या बैठकीत शेअर BUY बॅकवर विचार होईल.

पुट/कॉल रेशियो १.७५ च्या पेक्षा जास्त झाला तर ओव्हरबॉट पोझिशन होईल.

साखरेचे उत्पादन ७ लाख टन कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

PNB यांचा CRIF मधला स्टेक विकणार आहे.( CREDIT INFORMATION)

कोल इंडियाने आपल्या अंतरिम लाभांशासाठी २५ मार्च २०१९ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली. कोल इंडियाने Rs ५.८५ प्रती शेअर सेकंड अंतरिम लाभांश जाहीर केला. २९ मार्चपर्यंत हा लाभांश आपल्या खात्यात जमा होईल.

टाइड वॉटर ऑइल या कंपनीने Rs ८५ प्रती शेअर दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला.या अंतरिम लाभांशाची एक्स डेट २२ मार्च २०१९ आहे.

BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७७५५ NSE निर्देशांक निफ्टी ११३४३ बँक निफ्टी २८९२३, निफ्टी IT १५२६० वर बंद झाले.

भाग्यश्री फाटक

www.marketaanime.com – साध्या आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट

share करा पण क्रेडिट देऊन !!

 

2 thoughts on “आजचं मार्केट – १४ मार्च  २०१९

 1. Yogita Alhad Pratham

  नमस्कार मॅडम,
  मी योगिता प्रथम,
  तुमच्या ब्लॉग ची नवीन वाचक
  तुमचे blogs खूप छान आहेत.
  अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगता.

  I know the basic concepts of share market.
  Can you take one class / course for chart reading.

  Thank you

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.